Union Bank Of India Recruitment 2024 In Marathi : “युनियन बँक ऑफ इंडिया” मध्ये 1500 रिक्त जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) या पदासाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवविण्यात येत आहे. या भरतीसाठी जर तुमचे शिक्षण हे कोणत्याही शाखेत पदवी पास असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मित्रांनो बँकेने भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. विविध क्षेत्रातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. या सुवर्णसंधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा.
Union Bank Of India Recruitment 2024 In Marathi
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पास असल्यास तुमच्यासाठी “युनियन बँक ऑफ इंडिया” मध्ये स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) या पदासाठी बँकेत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीमध्ये एकूण 1500 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी, ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Union Bank Of India Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव | पदसंख्या |
स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) | एकूण रिक्त जागा 1500 |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी/मुदत :
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 24 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 13 नोव्हेंबर 2024 |
भरतीसाठी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व वेतनश्रेणी
वयोमर्यादा |
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्ष असावे. |
ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट |
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
PwBD उमेदवारांना 10 वर्षाची सूट |
माजी सैनिक उमेदवारांना 15 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क/फी |
GEN /EWS /OBC प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये 850 /- (GST सह) |
SC /ST /PwBD प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये – 175 /- (GST सह) |
वेतनश्रेणी/पगार : 48,480/- ते 85,920/- रुपये (मासिक वेतन) |
युनियन बँक भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी पास, उमेदवाराकडे वैध मार्कशीट असणे आवश्यक आहे. पदवीधर प्रमाणपत्र (Certificate) आवश्यक |
Union Bank Of India Recruitment 2024 Online Apply ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.