सरकारी नोकरी : महिला व बाल विकास विभागात नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरु, पात्रता 10 वी व पदवीधर, असा करा अर्ज | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत विविध विभागामध्ये एकूण 236 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबधीत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भारण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत गट-ब व गट -ड या संवर्गातील लघुलेखक (उच्चश्रेणी), गट -क लघुलेखक (निमश्रेणी), गट- क वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट -ड स्वयंपाकी, कनिष्ठ काळजी वाहक व इतर रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण 10 वी ते पदवीधर झाले असल्यास तुम्हाला महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी या संधी नक्की फायदा घेऊन आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत विविध विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे जाण्याची गरज पडणार नाही. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत

पदांचा तपशील 
पदाचे नाव  पदसंख्या 
सरंक्षण अधिकारी  02
लघुलेखक (उच्चश्रेणी) 01
लघुलेखक (निमश्रेणी) 02
परिवीक्षा अधिकारी  72
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक  56
सरंक्षण अधिकारी (कनिष्ठ) 57
वरिष्ठ काळजी वाहक  04
कनिष्ठ काळजी वाहक  36
स्वयंपाकी  06
एकूण  236

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक  14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  03 नोव्हेंबर 2024

 

भरतीसाठी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व वेतनश्रेणी

वयोमर्यादा 
खुल्या प्रवर्गासाठी वय 18 ते 38 वर्ष असावे.
SC /ST प्रवर्गासाठी वय 18 ते 43 वर्ष असावे.
अंशकालीन उमेदवारासाठी कमाल वय मर्यादा 55 वर्ष 
माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वय मर्यादा 45 वर्ष 
खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वय मर्यादा 43 वर्ष 
प्रकल्पग्रस्त/अनाथ उमेदवारांसाठी कमाल वय मर्यादा 43 ते 45 वर्ष 

 

परीक्षा शुल्क/फी 
खुला प्रवर्ग रुपये – 1000 /-
मागासवर्गीय प्रवर्ग रुपये – 900 /-

 

वेतनश्रेणी/पगार 
पदाचे नाव  वेतनश्रेणी (रुपये)
सरंक्षण अधिकारी  ३८,६०० – १,२२,८००/-
लघुलेखक (उच्चश्रेणी) ४४,९०० – १,४२,४००/-
लघुलेखक (निमश्रेणी) ४१,८०० – १,३२,३००/-
परिवीक्षा अधिकारी  ३८,६०० – १,२२,८००/-
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक  २५,५०० – ८१,१००/-
सरंक्षण अधिकारी (कनिष्ठ) १९,९०० – ६३,२००/-
वरिष्ठ काळजी वाहक  १६,६०० – ५२,४०० /-
कनिष्ठ काळजी वाहक  १५,००० – ४७,६००/-
स्वयंपाकी  १६,६००-५२४००/-

 

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : सरंक्षण अधिकारी – सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयांमधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील. समाज कार्य विषयांमधील किमान तीन वर्षाचा अनुभव

 

पदाचे नाव :लघुलेखक (उच्चश्रेणी) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २. लघुलेखन किमान वेग 120 शब्ध प्रति मिनिट, इंग्लिश टंकलेखन 40 शब्द किंवा मराठी किमान वेग 30 शब्द 

 

पदाचे नाव : लघुलेखक (निमश्रेणी) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २. लघुलेखन किमान वेग 120 शब्ध प्रति मिनिट, इंग्लिश टंकलेखन 40 शब्द किंवा मराठी किमान वेग 30 शब्द 

 

पदाचे नाव : परिवीक्षा अधिकारी – सांविधिक विद्यापीठाचीकोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील

 

पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक – सांविधिक विद्यापीठाचीकोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील

 

पदाचे नाव : सरंक्षण अधिकारी (कनिष्ठ) – सांविधिक विद्यापीठाचीकोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील

 

पदाचे नाव : वरिष्ठ काळजी वाहक – 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

पदाचे नाव : कनिष्ठ काळजी वाहक – 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

पदाचे नाव : स्वयंपाकी – 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन भरण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत

वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.  https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड 
  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
  • 10 वी मार्कशीट 
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment