सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे 06 उत्तम पर्याय, सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणता? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Best gold investment options in marathi

Best gold investment options in marathi : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे उत्तम असा पर्याय मनाला जातो. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक हि एकदम सुरक्षित गुंतवणूक असून त्याचा चांगला परतावा सुद्धा गुंतणूकदारांना मिळतो. पूर्वीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणं म्हणजे प्रत्यक्षात दागिने व कॉइन खरेदी करणे मानलं जात होत. परंतु बदल्यात काळानुसार सोने खरेदीचे पर्याय सुद्धा बदलत चाले आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करण्याचे कोणते कोणते पर्याय तुम्हाला माहिती आहे काय ? याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best gold investment options in marathi

मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी, खाजगी नोकरी किंवा छोटा, मोठा व्यवसाय, किंवा उद्योग धंदा करत असाल तर थोडीफार तरी बचत करत असणार सर्व पैसे खर्च करून वाचलेल्या पैशांचा उपयोग साधारणपणे आपण गुंतवणूक करण्यासाठी करतो. शक्यतो हि गुंतवणूक सोने खरेदीमध्येच सर्वाधिक केली जाते. भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा फार जुनी आहे आणि ती एकदम सुरक्षित मानली जाते. कारण यामध्ये केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. 

सोन्याचे दागिने अंगावर परिधान करता येतात आणि अडचणीच्या काळात ते आपल्याला प्रचंड उपयोगी पडतात, दिवाळीला, सणासुदीला, लग्नात किंवा इतर कोणत्याही कुटुंबिक कार्यक्रमा निमित्त सोने खरेदी केले जाते. 

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चाले आहे सोने खरेदीचे अनेक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा सोने खरेदी करू शकतात. सोने खरेदी करण्याचे 06 उत्तम पर्याय आहेत त्याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

सोने खरेदी करण्याचे 06 उत्तम पर्याय

  • दागिने 
  • फिजिकल गोल्ड (सोने)
  • डिजिटल गोल्ड (सोने)
  • स्वाव्हरीन गोल्ड बॉण्ड 
  • गोल्ड ETF
  • गोल्ड सेव्हिंग योजना 

दागिने

दागिने सोनं खरेदीचा बहुतेक लोकांकडून वापरला जाणारा मार्ग आहे भारतातील सर्वात जास्त वापरला जाणार हा पर्याय आहे. सर्वत्र वापरला जाणार असा हा पर्याय आहे या प्रकारचे सोने खरेदीचे काही फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. 

पहिला फायदा दागिने खरेदीचा हे दागिने तुम्ही वापरू शकता म्हणजे तुमची हि गुंतवणूक कपाटात पडून राहू शकत नाही. दागिण्याच्या खरेदीतून होणार तोटा असा कि हे सोनं दागिन्यांच्या रूपात देताना तुम्हाला घडणावळ म्हणजेच मेकिंग चार्जेस द्यावे लागतात जे 10 % पेक्षा जास्त असू शकतात. 

तसेच दागिने खरेदीवर 3 % GST आकाराला जातो. दागिन्यांसोबत एक भावनिक नाते तयार होते त्यामुळे ते अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगाच्या काळात ते विकण्याचा, गुंतवणुकी सारखा वापरण्याचा विचार केला जातो . अशा प्रकारे विकताना जवलर्स त्यातून घट काढतात. 

फिजिकल गोल्ड (सोने)

सोने खरेदी करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे फिजिकल गोल्ड (सोने) या पर्यायमध्ये सोन्याचे वळ, नाणं किंवा बिस्कीट यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावा लागत नाही आणि शुद्धतेची गॅरंटी सुद्धा असते. या प्रकारच्या खरेदीमध्ये सोन्याच्या नाण्यावर BIS हॉलमार्क असतो. हि नाणी जवलर्स, बँक आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध असतात. या प्रकारच्या सोन्याचा खरेदीवर 3 % GST आकाराला जातो.

डिजिटल गोल्ड (सोने)

या पर्यायांमध्ये सोने डिजिटल गोल्डच्या रूपात देखील सोन्याची खरेदी करता येते. यामध्ये तुम्ही विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून सोने खरेदी करू शकता अनेक प्रकारच्या पेमेंट अँपवरूनही डिजिटल गोल्ड विकत घेता येत यामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल तर डिजिटल गोल्ड मध्ये तुम्हाला 50 ते 100 रुपयापासून लहान रक्कमेचीही गोल्ड खरेदी करू शकता. यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. 

थोडं थोडं सोनं खरेदी – विक्री तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता. यावरही तुम्हाला 03 % GST लागेल. हे डिजिटल गोल्ड व्हच्युअली घेतलेलं असल्याने सोन्याची काळजी घेण्याची तुमची जबवाबदारी तुमच्या नसते. काही जवलर्स तुम्ही घेतलेलं डिजिटल गोल्ड दुकानात exchange करून प्रत्यक्षात सोनं घेण्याचा पर्यायही देतात. 

स्वाव्हरीन गोल्ड बॉण्ड

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा सरकारने दिलेला एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही घेत असलेल्या गोल्ड बॉण्डसाठी सरकारकडून हमी दिली जाते त्यामुळे तुमचे पैसे बुडण्याची जोखीम नसते. सोन्याचा भाव जसा जसा वाढेल तसा तसा तुम्हाला फायदा होतो आणि सोबत एक ठराविक व्याजही मिळते. 

दर काही कालावधी नंतर सरकारकडून असे गोल्ड बॉण्ड विक्रीसाठी आणले जातात आणि आठवडा भरासाठी हि योजना गुंतवणुकीसाठी खाली केली जाते. शिवाय सेकेंडरी मार्केटमधूनही तुम्ही गोल्ड बॉण्ड विकत घेऊन शकता.

गोल्ड ETF

Gold Exchange Traded Fund (Gold ETF ) ही एक ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीम आहे यामध्ये ९९.५% शुद्धतेच्या गोल्ड बुलियन मध्ये गुतंवणूक केली जाते. या प्रकारच्या सोने खरेदी सोबतच शेअर्स सारखं त्यांचं ट्रेडिंग करता येते. कारण एखाद्या कंपनीच्या शेअर्स सारखं या Gold ETF च  स्टॉक exchange मध्ये ट्रेडिंग होत आणि गुंतणूकदार या गोल्ड ETF च्या युनिट्सची खरेदी किंवा विक्री करू शकतात. 

या प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा म्हणजे सोनं चोरी होण्याची भीती नसते. 

गोल्ड सेव्हिंग योजना

अनेक सोनार ही जवलेरी चेन स्टोर्स हा पर्याय देतात. यामध्ये दरमहा तुम्ही ठरविक रक्कम त्यांच्याकडे जमा करायची आहे. यामध्ये तुमच्या योजनेचा कालावधी संपताना त्या ज्व्लेरकडून एखादा हफ्ता किंवा बोनसची भर घातली जाते आणि तुम्ही या एकूण रक्कमेचा अपार करत सोनं खरेदी करू शकता. दरमहा थोडी थोडी बचत करून एखादी मोठी गोष्ट घेण्यासाठी हा एकदम सोपा आणि सर्व सामान्य पर्याय अनेकांकडून वापरला जातो. 

या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत .  

महत्वाच्या लिंक्स
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment