इंडियन बँकेत 300 बँक अधिकारी भरती जाहीर, पात्रता पदवीधर | Indian Bank Recruitment 2024

Indian Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन बँक स्थानिक बँक अधिकारी 2024 भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना इंडियन बँकेची अधिकृत वेब साईट www.indianbank.in वर 300 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. फॉर्म भरण्याची मुदत ही 13 ऑगस्ट 2024 ते 02 स्पेटंबर सप्टेंबर 2024 पर्यंत सक्रिय आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Bank Recruitment 2024 अधिसूचना 

सरकारी आणि बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या युकांसाठी ही सुवर्णसंधी आहे कारण इंडियन बँकेने 13 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेब साईटवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी (Local Bank officer) 300 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. यामध्ये ही भरती तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यात केली जाणार आहे. इच्छुक पात्र  उमेदवारांनी 02 सप्टेंबर 2024 तारखेच्या आत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ही माहिती तुमच्या जवळच्या लोकांना पर्यंत नक्की शेअर करा.

इंडियन बँक स्थानिक बँक अधिकारी (Local Bank officer ) 2024 या भरतीमध्ये कन्नड, मराठी, गुजराती आणि तेलगू भाषेत पारंगत असणाऱ्या अनेक उमदेवारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यांसाठी कुठेही जाण्याची गरज पडणार पात्र उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून उमेदवार पदवीधर असावा. वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष दिलेले आहे. रिक्त झालेल्या पदांसाठी आज ऑनलाईन अर्ज करा. भरतीसाठी कोणती पात्रता, अर्ज शुल्क, अर्जची मुदत, नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा कशा पद्धतीने घेणार आहे ह्या सर्वांची माहिती खाली रीतसर दिलेली आहे. 

Indian Bank Recruitment 2024 अर्जाची मुदत व वयोमर्यादा 

इंडियन बँकेने अधिसूचनेत अर्जाची मुदत आणि वयोमर्यादा संपूर्ण माहिती दिलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे. 

तपशील  दिनांक 
अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि अर्जात बदल करणे  13 ऑगस्ट 2024 ते 02 सप्टेंबर 2024
ऑनलाईन पेमेंट करणे  02 सप्टेंबर 2024

 

अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची वयाची अट / वयोमर्यादा : किमान 20 वर्ष पूर्ण व 30 वर्षाच्या आत
वयाच्या मर्यादेत सूट खालीलप्रमाणे :

Category  वयाची सूट 
अनुसूचित जाती / अनुसूचिती जमातीचे उमेदवार  5 वर्ष 
इतर मागासवर्गीय / OBC 3 वर्ष 
बेंचमार्क अपंग उमेदवार  10 वर्ष 
माजी सैनिक  5 वर्ष 
1984 दंगलीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्ती  5 वर्ष 

 

Indian Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता  

वय शैक्षणिक पात्रता / आणि कामाचा अनुभव यासाठी पात्रता पूर्ण करण्याची आहे. 01 जुलै 2024 .

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
स्थानिक बँक अधिकारी (Local Bank officer) कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) मान्यता प्राप्त विद्यापीठातून  

 

Indian Bank Recruitment 2024 रिक्त जागांचा तपशील 

इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer ) भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ही भरती विविध राज्यात होणार आहे एकूण 300 जागांसाठी ही भरती होणार आहे. खालील माहितीवरून राज्य निहाय आणि श्रेणी निहाय रिक्त जागा तपशील देण्यात आला आहे.

राज्य  अनुसूचित जाती  एस टी  OBC  EWS  GEN एकूण 
महाराष्ट्र  06 03 10 04 17 40
तामिळनाडू  24 12 43 16 65 160
कर्नाटक  05 02 09 03 16 35
आंध्रप्रदेश  07 03 13 05 22 50
गुजरात  02 01 04 01 07 15
एकूण  44 21 79 29 127 300

 

ही पण भरतीची माहिती वाचा ⇓
जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर

इंडियन बँक भरती 2024 अर्ज फी 

इंडियन बँकेत स्थनिक बँक अधिकारी (Local bank Officer ) या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अर्जाची फी सुद्धा ऑनलाईन भरण्याची आहे. SC / ST / PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी 175 /- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आणि इतर उमेदवारांना 1000 /- अर्ज शुल्क भरावे लागेल. फॉर्मची जमा करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

श्रेणी  अर्ज फी 
SC / ST / PwBD उमेदवार रुपये – 175 /-
इतर उमेदवार  रुपये – 1000 /-

 

इंडियन बँक भरती 2024 निवड प्रक्रिया 

इंडियन बँक अंतर्गत घेण्यात येणारी स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer ) भरतीमध्ये निवड प्रक्रिया दोन टप्प्यातून जावे लागेल एक टप्पा म्हणजे लेखी/ ऑनलाईन चाचणी आणि दुसरा टप्पा मुलाखत. रिक्त पदाच्या संख्येवर अवलंबून, एकुण गुणावरील कट ऑफ ठरवले जातील. आणि अनआरक्षित वर्गासाठी एकूण रिक्त पदांच्या एकूण संख्येच्या तीन पट आणि राखीव श्रेणीतील रिक्त पदाच्या पाच पट उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठी बोलवले जातील.  

  1. पहिला टप्पा : लेखी / ऑनलाईन चाचणी 
  2. दुसरा टप्पा : मुलाखत 
Indian Bank Recruitment 2024 अर्ज भरण्यासाठी लिंक्स 

भरतीची अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक्स दिल्या आहेत. 

भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा 
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लीक करा 
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 

नोंद : भरतीसाठी ऑनलाईन भरण्याच्या आधी जाहिरात PDF पाहूनच ऑनलाईन अर्ज करा

Indian Bank Recruitment 2024 ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 

इंडियन बँकेच्या भरती 2024 या अंतर्गत स्थनिक बँक अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा खालील प्रमाणे त्याची प्रोसेस दिलेली आहे. 

  1. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत www.indianbank.in वेबसाईटला ओपन करावी आणि करियर या ऑप्शनवर क्लीक करावे. आणि नंतर Indian Bank Officer 2024 वर क्लीक करावे.

  2. अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लीक करा आणि नंतर नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. सिस्टिममार्फत तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड स्क्रीनवर डिस्पले केला जाईल. पासवर्ड आणि तात्पुरता नोंदणी क्रमांक ई-मेल आणि मोबाइलवर पाठविला जाईल.

  3. उमेदवार एकाच वेळेस अर्ज भरू शकत नसेल तर तो सेव्ह आणि नेस्ट टॅब निवडून आधीच फिल्प केलेला डाटा जतन करू शकतो. उमेदवार अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जातील माहितीमध्ये बद्दल करू शकता परंतु एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात बद्दल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  4. अर्जातील माहितीची खात्रीशीर पडताळणी केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. अंतिम बटनावर क्लीक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही.

  5. अर्जामध्ये उमेदवाराचे किंवा तिचे वडील / पती इत्यादींचे नाव प्रमाणपत्र / गुणपत्रिकेत दिसते तसे अचूकपणे लिहिलेले असावे त्यामध्ये कोणताही बदल आढळ्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.

  6. तुमची संपूर्ण माहिती नीट तपासा आणि तुमची माहिती सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लीक करा.

  7. फोटो आणि स्वाक्षरी सकॅनिंग आणि अपलोड करण्याच्या माहितीनुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.

  8. उमेदवार अर्जाचा इतर तपशील भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात.

  9. पेमेंट टॅबवर क्लीक करा आणि ऑनलाईन पेमेंटसाठी पुढे क्लीक करा.

  10. अर्जाची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होते जेव्हा फी भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी बँकेकडे ऑनलाईन पद्धतीने फी जमा केली जाते.

  11. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची आणि पेमेंट पावतीची प्रिंटआऊट काढून घ्यावी.

इंडियन बँक स्थानिक बँक अधिकारी परीक्षा माहिती 
  • इंडियन बँक भरतीमध्ये उमेदवारांना परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न असतील. (Option )

  • परीक्षा एकूण २०० गुणांची असेल एकूण विचारले जाणारे प्रश्न हे 155 असतील.

  • परीक्षेत निगेटिव्ह मार्क आहेत. परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क वजा केले जातील.

  • परीक्षेत प्रत्येक विषयाचा कालावधी 60 मिनिटे असणार आहे. 

विषय  प्रश्नाची संख्या  कमल गुण वेळ कालावधी 
तर्क आणि संगणक अभियोग्यता  45 60 60 मिनिटे 
सामान्य / बँकिंग जागरूकता  40 40 35 मिनिटे 
इंग्रजी भाषा  35 40 40 मिनिटे 
डेटा विशलेषण आणि व्याख्या  35 60 45 मिनिटे 
एकूण  155 200 180 मिनिटे 

 

Indian Bank Recruitment 2024 वेतन/ पगार किती असेल 

इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer ) या पदावर नियुक्त झाल्यावर उमेदवारांना रुपये 48,480 /- ते 85,920 इतका मासिक पगार / वेतन असेल. यासोबतच उमेदवारांना महागाई भत्ता DA , शहर भरपाई भत्ता CCA , घर भाडे भत्ता HRA रजा सवलत, वैद्यकीय मदत, हॉस्पिटल लाभ, सेवानिवृत्ती लाभ आणि इतर अतिरिक्त फायदे मिळतील 

पोस्टचे नाव  पगार / वेतन 
स्थानिक बँक अधिकारी  48,480 /- ते 85,920 रुपये. 

 

Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Recruitment 2024

FAQ’s

प्रश्न : Indian Bank Recruitment 2024 मध्ये किती रिक्त पदाची भरती जाहीर केली आहे?
उत्तर : इंडियन बँकेकडून स्थानिक बँक अधिकारी रिक्त जगासाठी 300 रिक्त पदे भरली जाणार आहे.


प्रश्न : इंडियन बँक लोकल ऑफिसर भरती प्रक्रिया कशी आहे ?
उत्तर : लेखी/ ऑनलाईन चाचणी आणि दुसरा टप्पा मुलाखत.


प्रश्न : इंडियन बँक भरती 2024 अर्ज कसा करता येतो?
उत्तर : इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येतो www.indianbank.in


प्रश्न : स्थानिक बँक अधिकारी पदासाठी पात्रता काय आहे?
उत्तर : उमेदवार पात्र होण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.


प्रश्न : इंडियन बँक भरती 2024 अंतिम मुदत किती?
उत्तर : 02 सप्टेंबर 2024


प्रश्न : स्थानिक बँक अधिकारी पगार किती असेल?
उत्तर : 48,480 /- ते 85,920 रुपये. 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि नवीन अपडेट माहितीसाठी आजच आपल्या Whatsapp ग्रुप आणि Telegram ग्रुप जॉईन करा. 

Indian Bank Recruitment 2024 अंतर्गत भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्राना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद ||

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment