PM विश्वकर्मा योजना काय आहे? 3 लाखापर्यंत कोणत्याही हमीशिवाय सरकारी कर्ज, जाणून घ्या PM विश्वकर्मा योजना | PM Vishwakarma Yojana In Marathi

PM Vishwakarma Yojana In Marathi भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कुशल कारागिरांना 03 लाखापर्यंत कोणत्याही हमी शिवाय कर्ज सरकारकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. हि योजना कारागिरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Vishwakarma Yojana अशी योजना आहे कि, प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने हि योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत कशी आहे या सर्वांची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. सदर योजनेची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. PM Vishwakarma Yojana In Marathi

PM Vishwakarma Yojana In Marathi

भारत देशातील 140 हुन अधिक जातीच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदरात 03 लाख रुपयांपर्यन्त कर्ज दिले जाते. या योजनेत 17 हुन अधिक कारागीर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी (ईओ) करतील. PM Vishwakarma Yojana In Marathi

PM Vishwakarma Yojana eligibility | योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

  • PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.
  • पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार
सुतार  बोट किंवा नाव बनवणारे 
लोहार  टाळे बनवणारे कारागीर 
सोनार  कुंभार 
शिल्पकार  मेस्त्री 
मच्छिमार  टूल किट निर्माता 
दगड फोडणारे मजूर  मोची कारागीर 
टोपली, चटई, झाडू बनवणारे  बाहुली आणि इतर परिपरिक खेळणी उत्पादक 
न्हावी  हार बनवणारे 
धोबी  शिंपी 

 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे 

या योजनेमध्ये एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांना कर्ज मिळणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो.
या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील.
याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.
या योजेने अंतर्गत, लोहार, चांभार, माळी, शिंपी अश्या एकूण 140 जातींना याचा लाभ मिळणार आहे.
शिल्पकार, कारागीर याना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल ज्यामुळे याना नवी ओळख मिळेल.

 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅनकार्ड, मतदान कार्ड 
उत्पन्न प्रमाणपत्र 
जात प्रमाणपत्र 
ओळखपत्र 
पत्त्याचा पुरावा 
पासपोर्ट आकाराचा फोटो 
बँक पासबुक 
वैध मोबाइल नंबर (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)
PM Vishwakarma Yojana online apply |ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.  
मुख्य HOME पेजवर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजना पर्याय असेल.
येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना मिळणार 4500 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि यादी

PM Vishwakarma Yojana Online Apply Link | योजनेसाठी अर्ज करण्याची लिंक 
PM विश्वकर्मा योजना माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment