PM Svanidhi Yojana In Marathi समाजातील विविध घटकांना लक्षात घेऊन देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या होत्या. केंद्राची पीएम स्वनिधी योजनाही (PM Svanidhi Scheme) त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचं काम सुरू करण्यासाठी आणि त्यांचं काम वाढवण्यासाठी केंद्र सरकार 10 हजारांचं विनातारण कर्ज देत आहे, तर यानंतर 50 हजारांपर्यंतचं विनातारण कर्जही घेता येणार आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली.
PM Svanidhi Yojana In Marathi
रस्त्यावरील विक्रेते हे शहरी अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. शहरवासीयांना परवडणाऱ्या किमतीत सेवा आणि वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.
रस्त्यावरील विक्रेते हे विक्रेते, ठेलेवाला, फेरीवाले, थेलीफडवाला, रेहरीवाला, इत्यादी विविध क्षेत्रांत आणि संदर्भांमध्ये ओळखले जातात. ते भाजीपाला, रेडी टू इट स्ट्रीट फूड, फळे, पकोडे, चहा, ब्रेड, कापड, पादत्राणे, कपडे, कारागीर उत्पादने, स्टेशनरी इत्यादी वस्तूंचा पुरवठा करतात. त्यांच्या सेवांमध्ये सलून दुकाने, पान शॉप्स, मोची, लॉन्ड्री सेवा इ. त्यामुळे त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना खेळत्या भांडवलासाठी कर्ज देण्याची तातडीची गरज निर्माण झाली. PM Svanidhi Yojana In Marathi
PM स्वनिधी योजनेची उद्दीष्टे
योजनेंतर्गत फेरीवाल्यांना विनातारण 10,000 कर्ज घेता येणार आहे, तर पुढेही 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येईल. |
लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणं हा त्याचा उद्देश आहे. |
घेतलेलं कर्ज 1 वर्षाच्या आत हप्त्यांमध्ये फेडता येतं. |
डिजिटल पेमेंटवर कर्जदारांना 1,200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जातो. |
या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक अर्जदारांना कर्ज मिळालं आहे. PM Svanidhi Yojana In Marathi |
PM स्वनिधी योजनेची पात्रता
भाजी विक्रेते |
फळ विक्रेते |
चहा विक्रेते |
सुपारीची दुकाने (पानवडी) |
लॉन्ड्री दुकाने (धोबी) |
नाईचे दुकान |
मोची |
स्ट्रीट फूड |
ब्रेड, पकोडे व अंडी विकणारे |
कपडे विकणारे फेरीवाले |
कारागीर उत्पादने |
पुस्तक विक्रेते (स्टेशनरी) |
PM स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईझ फोटो
आधार कार्ड
पॅन कार्ड
शिधापत्रिका
बँकेचे खाते
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा पुरावा
PM Svanidhi Yojana Online Apply | अर्ज करण्याची लिंक
PM स्वनिधी योजना ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाइट pmsvanidhi.mohua.gov.in वर जा. |
होमपेजवर जाऊन Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा. |
आता तुमचा मोबाईल नंबर नोंदवा, तुमच्या मोबाईलवर SMSच्या माध्यमातून एक OTP येईल. |
OTP पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल. |
याचे प्रिंट आऊट काढून घ्या. |
यानंतर संपूर्ण फॉर्म भरा, सर्व आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा. |
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रांवर जाऊन फॉर्मसहित सर्व आवश्यक कागदपत्रं जमा करा. |
पडताळणीनंतर स्वनिधी योजनेंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल. PM Svanidhi Yojana In Marathi |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PM Svanidhi Yojana In Marathi