BMC Clerk Recruitment 2024 : मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 क्लार्क पदाची मेगा भरतीची जाहिरात निघाली आहे. जर तुम्हाला सरकारी आणि चांगली कायमस्वरूपाची नोकरी हवी असल्यास पात्र उमेदवारांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. BMC Clerk Recruitment 2024 या भरती मार्फत सुमारे 1846 रिक्त पदे सरळसेवेत भरती केले जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू इच्छित आहेत त्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि कायमस्वरूपी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध विभागात आस्थापनेवरील गट क मधील ‘कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक ) या पदांकरिता सुमारे 1846 मेगाभरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फॉर्म भरायची मुदत 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत 09 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
BMC Clerk Recruitment 2024 Notifications
मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार बृन्हमुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये सुमारे 1846 गट क मधील कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक ) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरायची आहेत. सदर भरतीची माहिती बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तुत जाहिरात खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी खालील नमूद संकेत स्थळावर कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक ) पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
“कार्यकारी सहाय्यक” (पूर्वीचे नाव लिपिक ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की, आपण अर्ज करण्यासाठी करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता आपण पात्र आहोत. या लेखात आपण शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्जाची मुदत, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि इतर सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
BMC Clerk Recruitment 2024 online last date/ अर्जाची मुदत
बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या भरतीच्या जाहिरातीनुसार कार्यकारी सहाय्यक ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे दिले आहे.
अ. क्र. | तपशील | दिनांक व वेळ |
1 | ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक सुरु होण्याचा दिनांक | 20 ऑगस्ट 2024 |
2 | ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक व वेळ | 09 सप्टेंबर 2024 वेळ रात्री 11.59 वाजेपर्यंत |
BMC Clerk Recruitment 2024 Apply Online/ वयोमर्यादा
मुंबई महानगरपालिकेची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, पात्र उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेत असावा.
- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – किमान 18 वर्ष व कमाल 45 वर्ष
भरतीसाठी इतर उमेदवारांसाठी वयामध्ये देण्यात आलेली सूट कोणा कोणाला देण्यात आलेली आहे ते खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | आरक्षण | किमान वयोमर्यादा वर्ष | कमल वयोमर्यादा वर्ष |
1 | अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवार | 18 | 38 |
2 | मागास प्रवर्गातील उमेदवार | 18 | 43 |
3 | माजी सैनिक उमेदवार | – | सशस्त्र दलात केलेली सेवा + 3 वर्ष कमाल वय 45 |
4 | माजी सैनिक दिव्यांग उमेदवार | – | 45 |
5 | प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी | 18 | 45 |
6 | भूकंपग्रस्त उमेदवार | 18 | 45 |
7 | खेळाडू उमेदवार | 18 | 45 |
8 | अंशकालीन पदवीधर (सुशिक्षितीत बेरोजगार) उमेदवार | 18 | 55 |
9 | अनाथ उमेदवार | 18 | 45 |
10 | दिव्यांग उमेदवार | 18 | 45 |
11 | स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार | 18 | 45 |
ही पण भरतीची माहिती वाचा⇓
10 वी, डिप्लोमा तरुणांना सरकारी शिपयार्डमध्ये नोकरीची संधी
पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी 0682 पदाची भरती सुरु | जाणून घ्या संपूर्ण माहिती
BMC Clerk Recruitment 2024 ऑनलाईन परीक्षा शुल्क
भरती जाहिरातीनुसार ऑनलाईन परीक्षा शुल्क / फी खालीलप्रमाणे आकारली जाईल.
- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रुपये – 1000/- (GST सह )
- मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रुपये – 900/- (GST सह )
- ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केले जाणार नाही.
- ऑनलाईन परीक्षेच्यावेळी सदर ई-पावतीची झेरॉक्स प्रत प्रवेशासोबत सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही. कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रिया रद्ध झाल्यास उमेदवारास शुल्क परत केले जाणार नाही.
BMC Clerk Vacancy 2024 रिक्त जागा
सरळसेवा पद्धतीने “कार्यकारी सहाय्यक” (पूर्वीचे नाव लिपिक) या संवर्गाची भरावयाची पदे खालीलप्रमाणे दिली आहे. पात्र उमेदवारांनी रिक्त पदे व्यवस्तीत पाहून घेणे.
अ. क्र. | प्रवर्ग | एकूण भरवायची पदे |
1 | अनुसूचित जाती | 142 जागा |
2 | अनुसूचित जमाती | 150 जागा |
3 | विमुक्त जाती – अ | 49 जागा |
4 | भटक्या जमाती – ब | 54 जागा |
5 | भटक्या जमाती – क | 39 जागा |
6 | भटक्या जमाती – ड | 38 जागा |
7 | विशेष मागास वर्ग | 46 जागा |
8 | इतर मागासवर्ग | 452 जागा |
9 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 185 जागा |
10 | सामाजिक व शैक्षिणिक मागासवर्ग | 185 जागा |
11 | खुला प्रवर्ग | 506 जागा |
एकूण | 1846 |
BMC Clerk Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
- उमदेवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, कला, विज्ञान विधी किंवा समकक्ष शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 % गुणांसह उत्तीर्ण असावा. सोप्या भाषेत कोणत्याही शाखेचा उमेदवार पदवीधर असावा.
- पात्र उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे (टायपिंग) प्रत्येकी किमान 30 (WPM ) शब्द प्रति मिनिटे वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
- पात्र उमेदवाराकडे MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.
टीप: कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहील.
BMC Clerk Recruitment 2024 वेतन/मानधन
कार्यकारी सहायक पदासाठी बृहन्मुबई महानगरपालिकडून मिळणारे वेतन/मानधन खालीलप्रमाणे
- पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक)
- वेतन / मानधन : 25,500/- ते 81,100/- रुपये
BMC Clerk Recruitment 2024 निवड प्रक्रिया
- बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या अधिसूचनेनुसार कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक ) पदाच्या भरती नियमामध्ये विहित केलेली अर्हता व अटी धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा, संगणकावर घेण्यात येईल.
- या पदासाठी बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या सामान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे दिले आहे.
अ. क्र | परीक्षेचा विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्यम |
1 | मराठी भाषा व व्याकरण | 25 | 50 | मराठी |
2 | इंग्रजी भाषा व व्याकरण | 25 | 50 | इंग्रजी |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | मराठी |
4 | बॊधिक चाचणी | 25 | 50 | मराठी |
एकूण | 100 | 200 | – |
- ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 180 मिनिटे असणार आहे.
- मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.
- इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयांची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. आणि मराठी व व्याकरण, सामान्य ज्ञान, आणि बॊधिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
BMC Clerk Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व जाहिरात PDF
BMC भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करावे |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करावे |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे |

नोंद : ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात PDF पूर्णपणे नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरा.
BMC Clerk Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
- कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
BMC Clerk Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो स्कॅन
- स्वाक्षरी स्कॅन अपलोड करण्यासाठी
- जातीचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- इंग्रजी व मराठी टायपिंग प्रमाणपत्र
- इतर आवश्यक प्रमाणपत्र
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना किंवा भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या वतीने कॉल सेंटर फोन नंबर दिला आहे 9513253233 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता कॉल सेंटरचा time सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त असेल. (दुपारी 01:30 ते 02:00 जेवणाची वेळ) सोमवार ते शुक्रवार उपलब्ध.
कार्यकारी सहाय्यक पदासाठी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षेची ठिकाणे मुंबई, कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती
FAQ’s
प्रश्न : BMC Clerk Recruitment 2024 मध्ये कोणत्या पदाची भरती निघाली आहे?
उत्तर : बृन्हमुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक) या पदासाठी भरती निघाली आहे.
प्रश्न : मुंबई महानगरपालिकेत किती रिक्त जागा आहे?
उत्तर : कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नाव लिपिक) या पदासाठी 1846 रिक्त जागा आहे.
प्रश्न : ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : 09 सप्टेंबर 2024
प्रश्न : भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे?
उत्तर : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी नोकरी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेट मिळविण्यासाठी आजच आमचा ग्रुप Whatsapp व Telegram जॉईन करा.
बृहुंमुंबई मगनगरपालिकेच्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना ही भरतीची माहिती आजच शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद ||
1 thought on “BMC Clerk Recruitment 2024 ; मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा नोकरभरती | पात्रता – पदवीधर, आजच ऑनलाईन करा”