Raigad DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत 200 लिपिक (क्लर्क) जागांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. जर तुम्हाला सरकारी आणि चांगल्या पगाराची कायमस्वरूपाची नोकरी हवी असल्यास ही सुवर्णसंधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज करा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक मर्यादित या बँकेकरिता 200 लिपिक (क्लर्क) रिक्त पदे सरळसेवा भरती मार्फत भरण्याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून निवड सूचीनुसार विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. बँकेच्या अधिसूचनेनुसार सर्व निकष पूर्ण करून उमेदवारांनी त्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करावेत. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यात यावे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्व उमदेवरानी नोंद घ्यावी. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अंतिम मुदत, कागदपत्रे, प्रमाणपत्रे व इतर सर्व माहिती आपण खालील पाहणार आहोत.
Raigad DCC Bank Bharti 2024 Notifications
जिल्हा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीची अधिसूचना जरी करण्यात आलेली आहे त्यानुसार जिल्हा बँकेत लिपिक या पदासाठी 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहे आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट जारी करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात PDF नीट वाचून त्यातील निकष पूर्ण करून ऑनलाईन अर्ज भरावा. या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार कायमस्वरूपाची नोकरी शोधत असाल तर थोडा सुद्धा वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज सबमिट करा.
Raigad DCC Bank Bharti 2024 Online Last Date
रायगड जिल्हा बँकेच्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
तपशील | दिनांक |
संकेत स्थळावर अर्ज भरण्यासाठी दिनांक | 14 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 |
ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक | 25 ऑगस्ट 2024 |
ऑनलाईन परीक्षा दिनांक | बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड | बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या ईमेल मार्फत प्रसिद्ध करण्यात येईल. |
Raigad DCC Bank Bharti 2024 वयोमर्यादा व परीक्षा शुल्क
रायगड जिल्हा बँकेच्या लिपिक (क्लर्क) या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे दिली आहे.
- लिपिक (क्लर्क) पदासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष व कमाल 42 वर्ष
परीक्षा शुल्क
- उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्क रुपये 500 + GST 90 असे एकूण 590 /- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय राजिट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेत स्थळावर UPI / QR मार्फत भरता येईल.
Raigad DCC Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल)
- दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
लिपिक (क्लर्क) पदासाठी दिली जाणारी वेतनश्रेणी
रायगड जिल्हा बँकेच्या अधिसूचनेनुसार लिपिक (क्लर्क) पदासाठी दिली जाणारी वेतनश्रेणी खालील प्रमाणे
- वेतनश्रेणी अंदाजे एकत्रित वेतन – २५,000 /- रुपये
ही पण भरतीची माहिती वाचा⇓
मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा नोकरभरती | पात्रता – पदवीधर, आजच ऑनलाईन करा
जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर
Raigad DCC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
जिल्हा बँकेच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी खाली सविस्तर माहिती दिली आहे.
बँक भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक | येथे क्लीक करावे ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
नोंद : ऑनलाईन अर्ज करण्याआधी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- जिल्हा बँकेच्या लिपिक पदाकरिता बँकेच्या https://www.rdccbank.com/ किंवा https://www.raigaddccbrecruitment.com/ या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील.
- इतर कोणत्याही प्रकारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना चालू असणारा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर देण्यात यावा. कारण भरतीची सर्व माहिती आणि सर्व अपडेट हे ईमेल आयडीवर आणि मोबाईलवर देण्यात येतील.
- ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली असावी.
- उमेदवाराने सर्व प्रथम संकेत स्थळावरील भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यात यावा.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरच फॉर्म सबमिट होईल त्याशिवाय फॉर्म भरला जाऊ शकणार नाही.
- अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा अर्ज बँकेच्या संकेत स्थळावरून स्वतःच्या माहितीसाठी सबमिट केलेला फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.
- ऑनलाईन अर्ज व अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत चालू राहणार असून त्यानंतर संकेत स्थळावरील लिंक बंद करण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारांना ई-मेल / एस एम एस मार्फत कळविण्यांत येईल.
- ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती व सुविधा सूचना केवळ बँकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध होतील.

भरतीची निवड प्रक्रिया
Raigad DCC Bank Bharti 2024 लिपिक पदाच्या भरतीची निवड प्रक्रिया ही तीन पद्धतीने केली जाईल १) ऑनलाईन परीक्षा २) कागदपत्रे पडताळणी ३) मुलाखत
ऑनलाईन परीक्षा
- लिपिक पदाकरिता संगणकामार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
- सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे 90 गुणांची परीक्षा राहील.
- ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
- गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था संगणक माहिती बुद्धिमापन चाचणी इत्यादी.
- ऑनलाईन परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल.
कागदपत्रे पडताळणी
- परीक्षा नंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबधीत मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस ईमेल मार्फत मुलाखत पत्र उपलब्ध करून दिले जाते.
- कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणार उमेदवारच बँक धोरणाप्रमाणेच मुलाखरीस पात्र होईल.
मुलाखत
- कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल.
- उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र होणार नाही.
- सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणाचे भाराकंन बँक धोरणानुसार असेल.
- 10 पैकी 5 गुण शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील आणि उवर्रीत 5 गुण मुलाखतीस देण्यात येतील.
Raigad DCC Bank Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला
- उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली
- शैक्षणिक कागदपत्रे
- MSCIT प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र असल्यास
- इतर संबधीत शैक्षणिक प्रमाणपत्र
भरती संबधीत महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भार्याचा आहे.
- उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेत स्थळावर UPI / QR मार्फत भरायची आहे
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वतःचा ई-मेल आयडी मोबाइल क्रमांक व आधार कार्ड अचूक देणे.
- उमेदवारांनी अर्ज भरताना लिपिक पदासाठी आवश्यक पात्रता धारक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरावा.
FAQ’s
प्रश्न : रायगड जिल्हा बँकेत कोणती रिक्त पदे आहे?
उत्तर : रायगड जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत 200 लिपिक (क्लर्क) पदे
प्रश्न : अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज अंतिम मुदत 25 ऑगस्ट 2024
प्रश्न : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे?
उत्तर : https://www.rdccbank.com/ किंवा https://www.raigaddccbrecruitment.com/ या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन नोकरी अपडेट मिळविण्यासाठी आजच आपल्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
वरील रायगड जिल्हा सरकारी बँक लिमिटेड भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद |||
1 thought on “Raigad DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती बँकेत 200 लिपिक (क्लर्क) पदांची नोकरभरती | आजच ऑनलाईन अर्ज करा”