Germany Jobs For Maharashtra Government : मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने अधिकृत रित्या शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्याणानुसार महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत तब्ब्ल 10 हजार तरुण आणि तरुणींना रोजगार दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील तरुणांनी 30 विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये 10 हजार रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायिककरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत राज्यातील प्रमुख सरकारी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत दिनांक २५.२.२०२४ रोजी सामंजस करार झाला आहे.
Germany Jobs For Maharashtra Government माहिती
युरोपीय युनियनमधील बहुतांश देश औधोगिक दृष्ट्या संपन्न आहेत पण मागील काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठा प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय जे रोजगार उपलब्ध आहे त्यातून समाधानकारक वेतन भेट नाही असे दिसून आले आहे.
राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियन मधील देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यामध्ये तरुणांना संधीही मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आणि दोन्ही देशातील संबंध सदृढ होतील. चला तर मग जाणून घेऊ या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, पात्र काय आहे, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Germany Jobs For Maharashtra Government for Freshers
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, कुशल आणि अकुशल उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू असून यामध्ये आवश्यक असणारे ट्रेनिंग महाराष्ट्र सरकार मार्फत दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि PDF जाहिरात खाली दिलेली आहे. पात्र उमदेवरानी जाहिरात PDF माहिती नीट वाचून मगच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.
विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग आणि जर्मन भाषेचे ज्ञान उमेदवारांना महाराष्ट्र सरकार मार्फत मोफत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्य धारित व्यवसायसाठी राज्यातील अनुरूप व्यवसायिक पात्रता धारण केलेले उमेदवाराचं हा अर्ज करू शकतात.
Germany Jobs For Maharashtra Government पदांची नावे
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनी मध्ये 10 हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे तुमची चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. जर्मनीमध्ये चांगल्या पगाराची आणि चांगल्या कामाची ही एक चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमदेवरानी आजच ऑनलाईन नोंदणी करून घ्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.
ही भरतीची माहिती वाचा⇓
रेल्वेत 1376 रिक्त जागांसाठी सुरु झाले ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती
ITI, Diploma, पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी | आजच ऑनलाईन अर्ज करा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत भरती केली जाणारी पदे यासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी खालीलप्रमाणे
हेल्थ करिअर मधील पदे
अ. क्र. | ट्रेड | जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी (महिन्यामध्ये) |
1 | परिचारिका (नर्स) (Nurse / Medical assistants) | 14-15 |
2 | प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) | 14-15 |
3 | रेडिओलॉजी सहाय्यक (Radiology assistant) | 14-15 |
4 | डेंटल सहायक (Dental assistant) | 6-7 |
5 | केअर टेकर (care giver to sick and senior citizens) | 14-15 |
6 | फिजोथेरीपीस्ट (Physiotherapists) | 14-15 |
7 | डोकमेंटशन अँड कोडींग (Documentation & coding) | 6-7 |
8 | अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन (Accounting & Administration) | 6-7 |
9 | सर्व्हर & वेटर (Servers Waiters) | 6-7 |
10 | रेसेपशनिस्टस (Receptionists) | 10-15 |
11 | कूक (Cooks) | 6-7 |
12 | हॉटेल मॅनेजर (Hotel Mangers) | 10-11 |
13 | अकाउंट्स (Accounts) | 6-7 |
14 | हॉउसकीपर्स / किल्नर्स (Housekeepers/Cleaners) | 6-7 |
व्यवसाय /कारागीर यामधील पदे
अ. क्र. | ट्रेड | जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी (महिन्यामध्ये) |
1 | इलेक्ट्रशियन (Electricians) | 6-7 |
2 | नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये विशेष इलेक्ट्रिशियन ( Electricians Specialized in renewable energies) | 6-7 |
3 | हीटिंग तंत्रज्ञान (Heating Technicians) | 6-7 |
4 | पेंटर (Painters) | 6-7 |
5 | कारपेंटर्स (Carpenters) | 6-7 |
6 | वीट /टाइल स्तर मेसन (Brick/tile Layers Mason) | 6-7 |
7 | प्लम्बर (Plumbers) | 6-7 |
8 | वाहन रिपेर्स (हलके आणि जड वाहन) (Mechanics For vehicle repairs | 6-7 |
9 | ड्रॉयव्हर्स (Drivers) | 6-7 |
10 | सुरक्षारक्षक (Security) | 6-7 |
11 | डिलिव्हरी बॉय पोस्टल सर्विस (Delivery postal service) | 6-7 |
12 | पॅकेर्स & मोव्हर्स (Packers and Movers) | 6-7 |
13 | विमानतळ किल्नर्स (Support at Airport) | 6-7 |
14 | घरकाम (Housekeeping) | 6-7 |
15 | विक्री सहाय्यक (Sales assistants) | 14-15 |
16 | वेअर हाऊस मदत (Ware house assistance) | 6-7 |
यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकता यासाठी शैक्षणिक पात्रता विषयी बोलायचे झाले तर 10 वी पास, 12 वी पास असावा. पात्र इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
Germany Jobs For Maharashtra Government अर्ज लिंक व PDF जाहिरात
मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनी मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. वर दिलेल्या कोर्सची यादी तुम्ही पहा आणि पडतील अनुभव व प्रमाणपत्रे याची माहिती अर्जामध्ये भरा. जर्मन भाषेचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे याचा सर्व खर्च सरकार करणार आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. कोर्स 6 ते 8 महिने चालतो याचा सर्व खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. जर्मन भाषेचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे याची नोंद इच्छुक उमेदवारांनी घ्याची आहे.
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
Germany Jobs For Maharashtra Government महत्वाची सूचना
- वर दिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मन भाषा प्रशिक्षण तसेच त्यानंतर आयोजित होणारे आवश्यक कौशल्य वृद्धी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच सदरील अर्ज भरावा.
- अंतिम निवड झाल्यानंतर आपणास बायडेन युटेनबर्ग राज्यात रोजगारासाठी शासन निर्णयातील नमूद 30 कौशल्यानुसार काम करण्याकरिता नियम आणि सूचनांचे पालन करावे लागेल.
- वर नमूद केल्यानुसार 30 कौशल्य धारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायीक पात्रता धारण केलेले उमेदवाराचं सदर अर्ज करू शकतात.
- उमेदवाराने जर्मन भाषेचे आवश्यक प्रमाणपत्र मिळविणे, शासन निर्णयातील नमूद कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे व रोजगार भरती संदर्भातील संस्था मार्फत घेतलेल्या परीक्षामध्ये निवड होणे आवश्यक असेल.
- रोजगाराकरिता जर्मनी देशातील बायडेन युटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता, व्हिजा मिळविण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता सोयी उमेदवारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील राज्य संपूर्ण सहकार्य करेल.
- वरील दिलेल्या पदांची 30 कौशल्यासाठी आवश्यक जर्मन भाषा कौशल्यांची स्तर निहाय प्रमाणपत्र परीक्षेचे नाव व त्यासाठी लागणार कालावधी वर दिलेल्या तक्त्याप्रमाणे आहे.
Germany Jobs For Maharashtra Government निवड प्रक्रिया
- शासन निर्णयात नमूद 30 कौशल्यसाठी व जर्मन भाषा कौशल्याचे प्रमाणपत्र वरील तक्त्याप्रमाणे अपेक्षित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
- संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व मुळकागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- नोकरीसाठी भरती प्रक्रियेच्या वेळी इतर आवश्यक कागद्पत्रसह जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत वैधकीय व्यवसायिकडून मागील तीन महिन्यातील असलेले वैधकीय प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभव विषयी स्वतंत्र माहित अर्जामध्ये नमूद करावी. नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच उमेदवाराची निवड केली जाईल.
- या संपूर्ण अभ्यासक्रमाची शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार आहे. उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचा पहिल्या प्रवासाचा खर्च देखील महाराष्ट्र शासन करणार आहे.
- जे उमेदवार खरोखर इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनीच हा ऑनलाईन अर्ज भरावा.
Germany Jobs For Maharashtra Government आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड / मतदान कार्ड (ओळखीसाठी)
- पॅन कार्ड
- ड्रायविंग लायन्स
- पासपोर्ट फोटो (स्कॅन केलेला)
- स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
जर्मन भाषेचे पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे
या नोकरीमध्ये राज्यातील विविध पात्र आणि इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी निवासी प्रशिक्षणाची सोय देखील करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रात निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात राज्य सरकार आवश्यक मदत पात्र उमेदवारांना करणार आहे. त्यामुळे विदेशात नोकरी करण्यासाठी हा सुरक्षित मार्ग देखील तरुणांसाठी उपलब्ध असणार आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (Germany Jobs For Maharashtra Government) अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद ||
6 thoughts on “महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत 10 हजार तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी | Germany Jobs For Maharashtra Government”