अहमदनगर बँकेत 700 क्लेरिकल (क्लार्क) जागांसाठी भरती | Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024 : दि अहमदनगर सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत 700 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेले सेवकमांडनुसारचे रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरणेसाठी बँकेने दिनांक १२.०९.२०२४ रोजी अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या किंवा भरतीच्या अधिकृत https://adccbanknagar.in/ या संकेस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकेच्या आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अहमदनगर को ऑपरेटिव्ह बँकेत सुमारे 700 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून पात्र उमेदवाराकडून 27 सप्टेंबर 2024 आत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यतून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा ऑनलाईन अर्ज भरता येईल. 

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो अहमदनगर कॉ ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत 12 सप्टेंबर 2024 रोजी सुमारे 700 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या मध्ये विविध विभागात क्लेरिकल (लिपिक), वाहनचालक, सुरक्षारक्षक, जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर, आणि  इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून भरलेल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये एकूण 700 जागांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. 

बँक भरतीच्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लागणारी शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, परीक्षेची माहिती, परीक्षा शुल्क/फी, अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि इतर सर्व माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचुन मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024 अर्जाची मुदत 

अ. क्र.  तपशील  दिनांक 
1 ऑनलाईन अर्ज आणि शुल्क/फी सुरु होण्याचा दिनांक  13 सप्टेंबर 2024
2 ऑनलाईन अर्ज आणि शुल्क/फी भरण्याचा अंतिम दिनांक  27 सप्टेंबर 2024
3 ऑनलाईन परीक्षा हॉलतिकिट डाउनलोड करण्याचा दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
4 ऑनलाईन परीक्षा दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
5 कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024 रिक्त पदसंख्या 

पदाचे नाव  पदसंख्या 
क्लेरिकल (लिपिक) 687
वाहनचालक (सबाडीर्नेट A ) 04
सुरक्षारक्षक (सबाडीर्नेट B ) 05
जनरल मॅनेजर (संगणक) 01
मॅनेजर (संगणक) 01
डेप्युटी मॅनेजर (संगणक) 01
इंचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) 01
एकूण  700

 

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment वयोमर्यादा अर्ज शुल्क/फी 

वयोमर्यादा 
बँकेच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या पदानुसार खालीलप्रमाणे वयाची मर्यादा दिलेली आहे. 

पदाचे नाव  वयोमर्यादा 
क्लेरिकल (लिपिक) वय वर्ष 21 ते 40 वर्ष
वाहनचालक (सबाडीर्नेट A ) वय वर्ष 21 ते 40 वर्ष
सुरक्षारक्षक (सबाडीर्नेट B ) वय वर्ष 21 ते 45 वर्ष
जनरल मॅनेजर (संगणक) वय वर्ष 32 ते 45 वर्ष
मॅनेजर (संगणक) वय वर्ष 32 ते 40 वर्ष
डेप्युटी मॅनेजर (संगणक) वय वर्ष 30 ते 35 वर्ष
इंचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) वय वर्ष 28 ते 32 वर्ष

ही पण भरतीची माहिती वाचा⇓

शरद सहकारी बँकेत शिपाई, लिपिक पदासाठी भरती सुरु जाणून घ्या संपूर्ण माहिती

लिपिक (क्लार्क) पदासाठी जनता सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

ऑनलाईन अर्ज शुल्क/फी 

बँकेच्या जाहिरातीनुसार प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क देण्यात आलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.  पदाचे नाव  शुल्क/फी रुपये  GST (18%) एकूण शुल्क/फी 
1 क्लेरिकल (लिपिक) 635 114 749 रुपये 
2 वाहनचालक (सबाडीर्नेट A ) 590 106 696 रुपये 
3 सुरक्षारक्षक (सबाडीर्नेट B ) 590 106 696 रुपये 
4 जनरल मॅनेजर (संगणक) 750 135 885 रुपये 
5 मॅनेजर (संगणक) 750 135 885 रुपये 
6 डेप्युटी मॅनेजर (संगणक) 750 135 885 रुपये 
7 इंचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) 750 135 885 रुपये 

 

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment शैक्षणिक पात्रता व अनुभव 

पात्र उमेदवाराने खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव व वय हे दिनांक १२.०९.२०२४ रोजी प्रमाणसाहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. (उमेदवाराने शैक्षणिक अर्हता दिनांक १२.०९.२०२४ पूर्वी केलेली नसल्यास, कागदपत्र पडताळणीवेळी सदर उमेदवार पात्र ठरणार नाही याची नोंद घ्यावी)

पदाचे नाव : क्लेरिकल (क्लार्क)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
कोणत्याही शाखेचा पदवीधर, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुण आणि  MSCIT कोर्स  
⇓ अनुभव ⇓
कोणत्याही अनुभवाची गरज नाही  
⇓ प्राध्यान ⇓
M.Com., MBA (Banking and Finance), M.Sc., LLB., DTL., GDC&A, 

 

पदाचे नाव : वाहनचालक (सबाडीर्नेट A)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
10 वी पास  
⇓ अनुभव ⇓
उमेदवारास किमान 03 वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन चालविणायचा अनुभव, मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. 

 

पदाचे नाव : सुरक्षारक्षक (सबाडीर्नेट B)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
कोणतयाही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी) (Ex serviceman )
⇓ अनुभव ⇓
उमेदवार माजी सैनिक असल्यास, त्याचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी अधीतम वय 50 वर्ष असावे 
⇓ प्राध्यान ⇓
बँक सुरक्षा रक्षक म्हणून किमान 3 वर्षाचा अनुभव, गन लायन्स असल्यास प्राध्यान

 

पदाचे नाव : जरनल मॅनेजर (संगणक)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
बी. ई./ बी.टेक./ (कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि / इलेट्रॉनिक्स) / एम.सी.ए./ एम.सी.एस./ (कॉम्पुटर /आय.टी.) (रेगुलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण) किमान ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग व आय.टी. ऑपरेशन कामाचा कमीत कमी 12 वर्षाचा अनुभव 
⇓ प्राध्यान ⇓
बँकिंग क्षेत्रातील खालील नमूद कामाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राध्यान ( Security initiatives, Policies and procedures, Risk Assessment, IT Governance, Compliance to security)

 

पदाचे नाव : मॅनेजर (संगणक)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
बी. ई./ बी.टेक./ (कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि / इलेट्रॉनिक्स) / एम.सी.ए./ एम.सी.एस./ (कॉम्पुटर /आय.टी.) (रेगुलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण) किमान ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग व आय.टी. ऑपरेशन कामाचा कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव 
⇓ प्राध्यान ⇓
बँकिंग क्षेत्रातील खालील नमूद कामाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राध्यान ( Security initiatives, Policies and procedures, Risk Assessment, IT Governance, Compliance to security)

 

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (संगणक)
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
बी. ई./ बी.टेक./ (कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि / इलेट्रॉनिक्स) / एम.सी.ए./ एम.सी.एस./ (कॉम्पुटर /आय.टी.) (रेगुलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण) किमान ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग व आय.टी. ऑपरेशन कामाचा कमीत कमी 08 वर्षाचा अनुभव 
पदाचे नाव : इंचार्ज प्रथम श्रेणी 
⇓ शैक्षणिक पात्रता ⇓
बी. ई./ बी.टेक./ (कॉम्पुटर सायन्स / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि / इलेट्रॉनिक्स) / एम.सी.ए./ एम.सी.एस./ (कॉम्पुटर /आय.टी.) (रेगुलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण) किमान ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक 
⇓ अनुभव ⇓
बँकिंग व आय.टी. ऑपरेशन कामाचा कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव 
Ahmednagar District Cooperative Bank Recruitment अर्ज लिंक व PDF जाहिरात 
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024
Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024
Ahmednagar District Cooperative Bank Recruitment online apply अर्ज कसा करायचा 

उमेदवाराने सर्वप्रथम वर दिलेली भरतीची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे. पात्र उमेदवाराने बँकेच्या अधिकृत https://adccbanknagar.in/ वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.


पात्र उमेदवाराने वेबसाईट  ओपन झाल्यानंतर New Registration या लिंकवर क्लिक करावे आपली स्वतःची संपूर्ण माहिती भरून घ्यावी.


ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचे पासपोर्ट साईजचा फोटो स्कॅन केलेला व पांढऱ्या स्वच्छ कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.


उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना स्वतःचे आधारकार्ड स्कॅन करून अपलोड करायचे आहे.


फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर अचूक देणे आवश्यक आहे.


भरती संदर्भात पुढील माहिती ईमेल आयडी वर वेळोवेळी दिली जाईल.


उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण माहिती व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.


अर्ज भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी भरून घेणे आवश्यक आहे शुल्क भारयल्याशिवाय अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही.


निवड प्रक्रिया/कार्यपद्धती 
  1. ऑनलाईन परीक्षा 
  2. कागदपत्र पडताळणी 
  3. मुलाखत 

१. ऑनलाईन परीक्षा

  •  सर्व श्रेणीतील पदांकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.
  • ऑनलाईन परीक्षा 90 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास 01 गुण असणार आहे.
  • या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील.
  • ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल.

२. कागदपत्रे पडताळणी 

  • ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणाप्रमाणे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या १.३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
  • मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बांधकारक राहील.
  • उमेदवाराने कागदपत्रे /प्रमाणपत्राची मूळ प्रत व एक प्रमाणित झेरॉक्स प्रत पडताळणीचेवेळी बँकेस सादर करणे अनिवार्य आहे. 

३. मुलाखत 

  • ऑनलाईन परीक्षेत पदनिहाय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणी पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  • 05 गुण हे शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील व 5 गुणसाठी बँकेने गठीत केलेल्या समिती मार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल.
  • उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास, तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही.
  • शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे 05 गुण देण्यात येतील. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुप जॉईन करा.

Ahmednagar District Cooperative Bank Recruitment 2024 भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

 

 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment