PGCIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ITI, डिप्लोमा आणि पदवीधर असाल आणि तुम्ही जर चांगली आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे. PGCIL मध्ये म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागात सरकारी नोकऱ्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत. सदरील भारती ही संपूर्ण देशात होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करून ही माहिती तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा.
PGCIL Recruitment 2024 माहिती
मित्रांनो (PGCIL Recruitment 2024) सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली तरी इच्छुक उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. जे उमेदवार पात्र आहे त्या सर्वांसाठी फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सरकारी नावाजलेली कंपनी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ही भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रोसेस चालू झाली आहे आणि 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. सदरील भरतीची जाहिरात जाहीर केली असून यामध्ये कोणत्या विभागामध्ये कोणती पदे भरायची आहे यासर्वांची माहिती जाहिरातीत आहे. चला तर मग आपण या जाहिरातीमध्ये कोणत्या पदांसाठी पदे, त्यांची शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या विषयी संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.
PGCIL Recruitment 2024 रिक्त पदे
मित्रांनो पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये विविध रिक्त जागा भरण्यात येत आहे. या सुरु असणाऱ्या भरतीमध्ये जुनियर इंजिनिअर (सर्वेयर) ड्राफ्टसमन आणि सर्वेयर या पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहे. संपूर्ण राज्य आणि देशभरातून इच्छुक उमेदवारानकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज मागविण्याची प्रक्रिया 07 ऑगस्ट पासून सुरु झाली असून अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024 आहे.
या विविध भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज पडणार नाही. आणि PGCIL अंतर्गत भरती होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक असे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे कोणत्या पोस्टसाठी किती वेतनश्रेणी आहे ते आपण खाली पाहणारच आहोत. या सर्व भरतीसाठी लागणारी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या लिंक्स आणि अर्ज शुल्क या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.
PGCIL Recruitment 2024 अर्जाची मुदत
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड इंडिया कंपनीमध्ये विविध विभागामध्ये भरती चालू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना कडून फॉर्म मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चालू झाले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा तारीख सुरु | 07 ऑगस्ट 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 29 ऑगस्ट 2024 |
कट ऑफ दिनांक | 29 ऑगस्ट 2024 |
PGCIL Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
भरतीचे नाव : पॉवरग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड 2024
पदाचे नाव : भरतीमध्ये ज्युनियर इंजिनिअर (कनिष्ठअभियंता) सर्वेयर, ड्राफ्टसमन आणि सर्वेयर या पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर इंजिनिअर सर्वेयर/ कनिष्ठ अभियंता सर्वेक्षण या पदासाठी शैक्षणिक पात्रता
Post | Junior Engineer (Survey Engineering) Gr-III/S2 |
वेतन श्रेणी | S2 IDA Rs. 26,000 – 1,18,000/- |
वयोमर्यादा | 31 वर्ष |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेकडून सर्वेक्षण अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ नियमित तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिरींगमधील डिप्लोमा (विषय म्हणून सर्वेक्षणासह ) किमान 70% गन असेलेले उच्च तांत्रिक पात्रता जसे कि, B.E./B. Tech इत्यादी डिप्लोमासह किंवा त्याशिवाय |
पोस्ट पात्रता अनुभव | उमेदवारांना किमान चार वर्षाचा पदव्यूत्तर पात्रता अनुभव असावा ज्यात किमान मासिक सकाळ वेतन /रु. च्या वेतनासह किमान दोन वर्षाचा अनुभव असावा. |
प्रोफाइल अनुभव | एकूण स्टेशन / डीजीपीएस /ड्रोन्स / एलआयडीएआर सर्वेक्षण ऑपरेशनसह ट्रांसमिशन लाईनमध्ये सर्वेक्षण करण्याचा किमान चार वर्ष अनुभव असावा . |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा + ट्रेड टेस्ट. |
ड्राफ्टसमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता :
Post | Draughtsman Gr IV/W4 |
वेतन श्रेणी | W4 IDA – Rs – 22,000 – 85,000 /- |
वयोमर्यादा | 32 वर्ष |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेकडून पूर्ण वेळ नियमित दोन वर्ष ITI Draughstsman Civil / ITI (अरकिटेचरल ड्रॅफ्समन ) |
पोस्ट पात्रता अनुभव | पात्रतेनंतर उमेदवारांना किमान पाच वर्षाचा अनुभव असावा ज्यात किमान मासिक सकल वेतन / रु. च्या वेतनासह किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. |
प्रोफाइल अनुभव | अभियांत्रिकी गुंतलेल्या संस्थेमध्ये पात्रता नंतर किमान पाच वर्षांचा अनुभव |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा + ट्रेड टेस्ट. |
सर्वेयर या पदासाठी शैक्षणिक पात्रता :
Post | Surveyor Gr – IV / W4 |
वेतन श्रेणी | W4 IDA – Rs – 22,000 – 85,000 /- |
वयोमर्यादा | 32 वर्ष |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेकडून पूर्ण वेळ नियमित दोन वर्षांचा ITI (सर्वेयर) |
पोस्ट पात्रता अनुभव | पात्रतेनंतर उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असावा ज्यात किमान मासिक सकल वेतन / रु. वेतनासह किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. |
प्रोफाइल अनुभव | एकूण स्टेशन / डीजीपीएस /ड्रोन्स / एलआयडीएआर सर्वेक्षण ऑपरेशनसह ट्रांसमिशन लाईनमध्ये सर्वेक्षण करण्याचा किमान पाच वर्ष अनुभव असावा . |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा + ट्रेड टेस्ट. |
PGCIL Recruitment 2024 वयोमर्यादा, अर्ज शुल्क व आवश्यक कागदपत्रे
वयोमर्यादा : वरील भरतीसाठी उमेदवाराचे वय ज्युनियर इंजिनिअर (कनिष्ठअभियंता) सर्वेयरसाठी वयोमर्यादा 31 वर्ष आहे आणि ड्राफ्टसमन आणि सर्वेयर या पदांसाठी वयोमर्यादा 32 वर्षांपर्यंत आहे.
उच्च वयोमर्यादेत सूट (संबधीत राखीव पदांसाठी सूट खालील प्रमाणे आहे)
OBC (NCL) उमदेवार | 3 वर्ष |
SC / ST उमदेवार | 5 वर्ष |
PwBD उमदेवार | शासनाप्रमाणे : भारताचे निर्देश |
Ex-Servicemen / Victims of riots उमेदवार | शासनाप्रमाणे : भारताचे निर्देश |
ऑनलाईन भरण्यासाठी अर्ज शुल्क/फी
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी | Rs 300 /- रुपये |
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी | Rs 200 /- रुपये |
टीप : सविस्तर माहितीसाठी खाली भरतीची अधिकृत जाहिरात PDF दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरावा.
अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे
- आधारकार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास )
- PwBD सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास )
- अनुभव असल्यास एक्सपेरिअन्स लेटर
- अर्जदाराचा चालू मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमीलेअर (आवश्यक असल्यास )
PGCIL Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त पॉवरग्रीड वेबसाईट https://www.powergrid.in वर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
- वेबसाईटवर ज्या उमेदवारांना अर्ज नोंदणी करण्यापूर्वी किंवा सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी, पर्यायी ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर, पर्यायी मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 07 ऑगस्ट 2024 ते 29 ऑगस्ट 2024 खुली असेल. उमेदवारांना www.powergrid.in च्या CAREER विभागात वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. वय, पात्रता अनुभव इ. सर्व माहिती ऑनलाईन वेबसायटमध्ये दिली आहे.
- अर्जातील इतर तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा. कृपया ईमेल/ पर्यायी ईमेल आयडी फिल्ड करताना काळजी घ्या कारण नंतरची सर्व माहिती उमेदवारांना ईमेल मार्फत मिळणार आहे.
- पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पेजच्या शेवटी खाली असणाऱ्या सबमिट बटनावर क्लीक करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा. जर अर्ज स्वीकारला तर एक युनिक नंबर तयार करेल जो पूर्ण तयार केलेल्या अर्जामध्ये दिसून येईल तो नोंदणी क्रमांक जपून ठेवावा.
- पूर्ण भरलेल्या अर्जची कोणतेही हार्ड कॉपी पोस्टने कोणत्याही पत्त्यावर पाठवायची नाही.
- उमेदवारांनी त्याच्या जन्म प्रमाणात किंवा दहावीच्या मार्कशीटवर नमूद केल्यानुसार त्यांचे नाव आणि जन्मतारीख अचूकपणे टाकणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने शैक्षणिक माहिती ही प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे योग्यरीत्या तपशीलवार भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि ती भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.
PGCIL Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स आणि जाहिरात PDF
पॉवरग्रिड भरतीसाठी PDF जाहिरात पहा. | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | येथे क्लीक करा |
FAQ’s :
प्रश्न : PGCIL मध्ये कोणत्या रिक्त जागेसाठी भरती आहे ?
उत्तर : ज्युनियर इंजिनिअर (कनिष्ठअभियंता) सर्वेयर, ड्राफ्टसमन आणि सर्वेयर या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
प्रश्न : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटची मुदत किती ?
उत्तर : 29 ऑगस्ट 2024
प्रश्न : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : https://www.powergrid.in
प्रश्न : PGCIL नवीन भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : ITI, Diploma, पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आपल्याला ग्रुपला जॉईन करा.
वरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजूना ही माहिती नक्की शेअर करा. जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि आजच आपल्याला WhasApp ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद
3 thoughts on “PGCIL Recruitment 2024 | ITI, Diploma, पदवीधर तरुणांना सरकारी नोकरीची संधी | आजच ऑनलाईन अर्ज करा”