3000 जागांसाठी तरुणांना कॅनरा बँकेत अप्रेन्टिस बंपर भरती | Canara Bank Recruitment Apprenticeship 2024

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 : कॅनरा बँकेच्या अंतर्गत 9600 शाखेत पदवीधारकांना 3000 अँप्रेन्टिससाठी बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे पदवीधारकांनी (ग्रॅज्युएट) ह्या भरतीसाठी आजच ऑनलाईन अर्ज करायचा आहे बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कॅनरा बँकेनी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कॅनरा बँकेने पदवीधारकांसाठी अँप्रेन्टिस पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजचे 04 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल आणि जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुमच्यासाठी कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कॅनरा बँक अँप्रेन्टिस भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कॅनरा बँक बंगळुरू आणि जागतिक स्तरावर मुख्य कार्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक 9600 हून शाखेसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो कॅनरा बँके अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असणाऱ्या या भरतीमध्ये पदवीधर (ग्रॅज्युएट) अँप्रेन्टिस या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ह्या भरतीमध्ये एकूण 3000 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात आहे 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची लिंक, आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. जे उमेदवार बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तुम्ही ह्या संधीचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा हि माहिती शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.  

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 अर्ज करण्याची मुदत 

कॅनरा बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या मुदतीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 

महत्वाच्या तारखा 
तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक  21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक  04 ऑक्टोबर 2024

 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

वयोमर्यादा :

  • किमान वय 20 वर्ष ते कमाल वय 28 वर्ष 
  • नियमानुसार खालीलप्रमाणे वयात सूट देण्यात आलेली आहे. 
अ. क्र. श्रेणी  वयात सूट 
1 SC /ST उमेदवार  05 वर्ष 
2 OBC उमेदवार  03 वर्ष 
3 अपंग उमेदवार  10 वर्ष 
4 1984 दंगलग्रस्त  05 वर्ष 

 

अर्ज शुल्क/फी :

कॅनरा बँकेच्या अधिसूचनेनुसार अर्ज शुल्क/फी खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे. 

कॅटेगरी  शुल्क/फी 
इतर/ सामान्य उमेदवारांसाठी फी  रुपये 500 /- (GST सह)
SC /ST / PwBD उमेदवारांसाठी फी  कोणतेही फी नाही 

 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 शैक्षणिक पात्रता 
एकुण पदसंख्या : 3000
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे (ग्रॅज्युएट)

 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात 
अधिकृत भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 online apply

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.

संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही. 

ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे. 

आवश्यक असणारे कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • जन्म दाखला 
  • आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
  • 10 वी व 12 वी मार्कशीट 
  • पदवी प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • जातीचा दाखला 
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 निवड प्रक्रिया   

पात्र उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारवर उतरत्या क्रमाने केली जाणार आहे मिळालेले गुण टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल. 

एकापेक्षा जास्त उमेदवार सामान टक्केवारी असतील तर असे उमेदवार गुणवत्ते त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने ठरतील.

ऑनलाईन अर्जामध्ये सूचित केलेल्या प्रमाणपत्राची माहिती त्यानुसार प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल ऑनलाईन अर्ज करतानाच्या वेळी आढळलेल्या कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत प्रमाणपत्र पडताळणी वेळेस सरसकटपणे अपात्र ठरविला जाईल.

बँकेच्या कोणत्याही शाखेत कागदपत्रे/प्रमाणपत्रे पोस्टने पाठवू नये.

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024
Canara Bank Recruitment Apprenticeship 2024

ही पण भरतीची माहिती वाचा ⇓

10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी मेगाभरती संपूर्ण माहिती 

स्टेट बँकेत 1511 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु संपूर्ण माहिती 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 अटी व नियम 
अँप्रेन्टीसशिपचा कालावधी प्रशिक्षण  शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल. 
प्रशिक्षणाचे ठिकाण  कॅनरा बँकांच्या शाखेत 
जॉब प्रोफाइल  अँप्रेन्टिस म्हणून नियुक्त उमेदवार असणार आहे कॅनरा बँकेचे कर्मचारी म्हणून वागणूक दिली जाणार नाही.
वेतन  रुपये 15000 /-  आणि 4500 रुपये सरकारी हिस्सा DBT द्वारे बँक खात्यात जमा केले जातील.

 

राज्यानुसार रिक्त पदसंख्या 
राज्य  पदसंख्या 
आसाम  30
बिहार  100
चंदीगड  10
छत्तीसगड  25
दमण  1
दिल्ली  100
गोवा  20
गुजरात  70
हरियाणा  70
हिमाचल प्रदेश  15
झारंखण्ड  55
कर्नाटक  600
केरळ  200
लडाख  1
लक्षद्वीप  2
मध्य प्रदेश  80
महाराष्ट्र  200
मणिपूर  1
मिझोराम  1
मेघालय  3
नागालँड  1
ओडिशा  70
पुडुचेरी  5
पंजाब  80
राजस्थान  70
सिक्कीम  1
तामिळनाडू  350
तेलंगणा  120
त्रिपुरा  6
उत्तर प्रदेश  325
उत्तराखंड  35
वेस्ट बंगाल  110
एकूण  3000

 

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 Highlight 
भरती संस्था  कॅनरा बँक 
पदाचे नाव  कॅनरा बँक अँप्रेन्टिस 
पदसंख्या  3000
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन 
अर्जाची मुदत  21 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोबर 2024
जॉब लोकेशन  संपूर्ण भारत 
वेबसाईट https://canarabank.com/
वेतन  बँक नियमानुसार 
शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी 

 

FAQ’s

प्रश्न : कॅनरा बँक भरतीमध्ये किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?
उत्तर : कॅनरा बँक अँप्रेटिस भरती एकूण 3000 जागांसाठी भरती होणार आहे.

प्रश्न : कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

प्रश्न : कॅनरा बँक अँप्रेन्टिस भरतीसाठी वयाची मर्यादा किती आहे?
उत्तर : किमान वय 20 वर्ष ते कमाल वय 28 वर्ष.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

Canara Bank Recruitment Apprenticeship 2024 भरती संदर्भात तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कर आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment