PSI Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC ) महाराष्ट्र राज्यातील एकूण 615 पदाच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गातील एकूण 615 पदांच्या भारतीकरिता आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता मुख्य परीक्षा रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीची शोधात असाल तर तुमच्यासाठी MPSC अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्ही पात्र असाल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनामध्ये काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
PSI Bharti 2024 Notifications
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात सुरु असलेल्या भरतीमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यातून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 0615 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा दिनांक 09 ऑक्टोबर 2024 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
सदरील भरती महाराष्ट्र राज्यातील अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे ह्या सहा जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अंतिम मुदत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क/फी, वेबसाईट आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. .
PSI Bharti 2024 अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी
अधिकृत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
महत्वाच्या तारखा | |
तपशील | दिनांक |
अर्ज सादर करण्याचा कालावधी | 23 सप्टेंबर 2024 ते 07 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 07 ऑक्टोबर 2024 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 10 ऑक्टोबर 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
PSI Bharti 2024 पद, पदसंख्या व वेतनश्रेणी
- पदाबाबत सर्वसाधारण तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
- पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक, गट- ब (PSI)
- पदसंख्या : एकूण 0615 पदे
- वेतनश्रेणी : रुपये 38,600 – 1,22,800/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
- वर नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
PSI Bharti 2024 वयोमर्यादा व परीक्षा शुल्क/फी
अधिकृत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे
वयोमर्यादा :
अमागास उमेदवार : कमाल वय 35 वर्ष |
मागासवर्गीय उमेदवार उमेदवार : कमाल वय 40 वर्ष |
परीक्षा शुल्क/फी :
- अमागास उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क : रुपये 844 /-
- मागासवर्गीय /अनाथ उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क : रुपये 544 /-
- परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही.
- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकता.
ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓
रयत शिक्षण संस्थेत ज्युनिअर क्लार्कची भरती सुरु, परीक्षा शुल्क नाही आजच ऑनलाईन अर्ज करा.
महाराष्ट्र शासन: अन्न व औषध विभागात सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्जप्रक्रिया
PSI Bharti 2024 online apply अर्ज करण्यासाठी लिंक्स व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

PSI Bharti 2024 शैक्षणिक अर्हता/पात्रता
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीत सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच परीक्षेस पात्र असतील.
सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे.
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर. 4 वर्ष नियमित सेवा
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी परीक्षा उत्तीर्ण – 5 वर्ष नियमित सेवा
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण – 6 वर्ष नियमित सेवा
PSI Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत https://mpsconline.gov.in/candidate वेबसाईटवरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.
पुढे संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरू शकता. शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट करता येणार नाही.
उमेदवारांनी भरलेल्या शुल्काची ई पावती आणि सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे
अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जातील नावाचा पुरावा (दहावी प्रमाणपत्र)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक पात्रता पुरावा
- मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- वैध नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञानपन
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
FAQ’s
प्रश्न : PSI भरतीमध्ये किती रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे?
उत्तर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC ) महाराष्ट्र राज्यातील एकूण 615 रिक्त जागा
प्रश्न : MPSC अंतर्गत PSI भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : अंतिम मुदत 07 ऑक्टोबर 2024
प्रश्न : MPSC अंतर्गत PSI भरतीचा अर्ज कसा भरायचा आहे?
उत्तर : उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत https://mpsconline.gov.in/candidate वेबसाईटवरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||