MPSC मार्फत ग्रुप सी साठी मेगा भरती, तब्बल 1333 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत संवर्गातील एकूण 1333 पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट – क साठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र विविध विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे विविध क्षेत्रातील पदवीधर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

MPSC Group C Bharti 2024 Notification 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, सहायक मोटर वाहन निरीक्षक या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सदर अर्ज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून ते 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन उपलब्ध आहे. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचा आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनातील विविध विभागात सरकारी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, पदाचे नाव, पदसंख्या, अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

MPSC Group C Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव, पदसंख्या व विभाग यांचा तपशील 
पदाचे नाव  विभाग  एकूण पदे 
उद्योग निरीक्षक  उद्योग ऊर्जा व कामगार विभाग  39
कर सहायक  वित्त विभाग  482
तांत्रिक सहायक  वित्त विभाग  09
बेलिफ व लिपिक, गट – क नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय  विधी व न्याय विभाग  17
लिपिक-टंकलेखक  मंत्रालय महाराष्ट्र शासन  786
एकूण  1333

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :

तपशील  दिनांक/कालावधी 
अर्ज सादर करण्याचा दिनांक  14 ऑक्टोबर 2024
अर्ज सदर करण्याचा अंतिम दिनांक  04 नोव्हेंबर 2024
परीक्षेचा दिनांक  02 फेबुवारी 2024

 

MPSC Group C Bharti 2024 वयोमर्यादा,परीक्षा शुल्क/फी व वेतनश्रेणी

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्ष असावे.
ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट
प्रकल्पग्रस्त/अंशकालीन/दिव्यांग उमेदवारांना 10 ते 15 वर्षाची सूट

परीक्षा शुल्क/फी :

अमागास उमेदवारांना रुपये 544 /- परीक्षा शुल्क
मागासवर्गीय उमेदवारांना रुपये 344 /- परीक्षा शुल्क
माजी सैनिक उमेदवारांना रुपये 44 /- परीक्षा शुल्क

वेतनश्रेणी/पगार/मानधन :

पदाचे नाव  वेतनश्रेणी/पगार (रुपये)
उद्योग निरीक्षक  35,400/- ते 1,12,400
कर सहायक  25,500/- ते 81,100/-
तांत्रिक सहायक  29,200/- ते 92300/-
बेलिफ व लिपिक, गट – क नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय  19,900/- ते 63,200/-
लिपिक-टंकलेखक  19,900/- ते 63,200/-

 

MPSC Group C Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : उद्योग निरीक्षक 
शैक्षणिक पात्रता 
01) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा 02) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

पदाचे नाव : कर सहायक 
शैक्षणिक पात्रता 
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

पदाचे नाव : तांत्रिक सहायक
शैक्षणिक पात्रता 
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

पदाचे नाव : बेलिफ व लिपिक, गट – क नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय 
शैक्षणिक पात्रता 
 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

 

पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक 
शैक्षणिक पात्रता 
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

MPSC Group C Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

MPSC Group C Bharti 2024
MPSC Group C Bharti 2024
MPSC Group C Bharti 2024 online apply ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया

पात्र उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेट होणार नाही.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर My Account सदराखाली view वर क्लीक करून सर्व माहिती पूर्णपणे भरायची आहे.

उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे फी भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

MPSC Group C Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा 
  • शैक्षणिक कागदपत्र/प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • मराठी/इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास 
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment