Cidco Lottery 2024 : सिडकोची 26 हजार घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. पसंतीचे घर निवडण्यासाठी 15 घरांचे पर्याय देण्यात आलेले आहे यासाठी सिडकोकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ झाला आहे. या योजेत तुम्ही आपल्या पसंतीचे घर निवडू शकता जाणून घ्या सिडकोची ही घरे नेमकी कुठे आहेत आणि त्याच्या किमती किती आहे.
नवी मुंबईमध्ये स्वतःचे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून या लॉटरी बद्दल चर्चा सुरु होती. अखेर या लॉटरीचा मुर्हत ठरला असून सिडकोकडून लॉटरी तारीख जाहीर करण्यात आली आहे. सिडकोच्या घरांसाठी 12 ऑक्टोबर 2024 पासून लॉटरी निघाली आहे. 25 हजार घरांची ही लॉटरी निघणार आहे. यामुळे नवी मुंबईतील घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Cidco Lottery 2024 Notification
सिडकोकडून तब्ब्ल 26 हजार घरांची महागृहनिर्माण योजना आणण्यात आली आहे. “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या नावाने ही महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या नावानुसार अर्जदारांना सदनिकाकरिता पसंतीक्रम देण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 67 हजार घर बांधण्यात येत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 26 हजार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेची घरे नेमकी कुठे आहे, त्यांचा किमती किती आहे, आवश्यक पात्रता, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. या योजनेची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा घरासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
Cidco Lottery 2024 सिडकोची नवीन घरे कोणत्या ठिकाणी आहे
सिडकोच्या महा गृहनिर्माण योजनेतील ही घरे नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वार रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा आणि उलवे नोडमध्ये आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS ) व अल्प उत्त्पन्न गट (LIG) यांच्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Cidco Lottery 2024 In Marathi सिडकोची घरे कुठे ? घराची संख्या
ठिकाण | सदनिकेचा (फ्लॅट) प्रकार | सदनिकांची (फ्लॅट) संख्या |
तळोजा, सेक्टर -28 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 2185 |
तळोजा, सेक्टर -29 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 7509 |
खारघर बस डेपो | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 1700 |
खारकोपर 2 ए | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 288 |
खारकोपर 2 बी | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 288 |
कळंबोली बस डेपो | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 1360 |
बामनडोंगरी | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 1700 |
तळोजा सेक्टर – 37 | अल्प उत्त्पन्न गट ए | 816 |
तळोजा सेक्टर – 37 | अल्प उत्त्पन्न गट बी | 08 |
नवीन पनवेल (प.) बस टर्मिनस | अल्प उत्त्पन्न गट | 172 |
खारघर बस टर्मिनस | अल्प उत्त्पन्न गट | 340 |
मानसरोवर रेल्वे स्टेशन | अल्प उत्त्पन्न गट | 840 |
खांदेश्वर रेल्वे स्टेशन | अल्प उत्त्पन्न गट | 1470 |
खारकोपर भूखंड क्र. सेक्टर -१६ ए | अल्प उत्त्पन्न गट | 2113 |
वाशी ट्रक टर्मिनस | अल्प उत्त्पन्न गट | 3131 |
खारघर स्टेशन | अल्प उत्त्पन्न गट बी | 1803 |
एकूण | 25717 |
कोणत्या गटासाठी किती उत्त्पन्न
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) |
ज्या अर्जदाराचे वार्षिक कुटुंबिक उत्त्पन्न रुपये 6 लाखापर्यंत असेल, तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल. |
अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. |
अर्जदाराचे किंवा त्यांचा/तिचा पती /पत्नी आणि अविवाहित मुले यांना भारतात पक्के घर असू नये. |
अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे. |
सरकारकडून रुपये 2.5 लाखाचे अनुदान लागू आहे. यामध्ये रुपये 1.5 लाख केंद्र सरकारकडून आणि रुपये 1 लाख राज्य सरकारकडून दिले जाईल.
कृपया लक्षात घ्यावे, जर सह अर्जदाराने (पत्नी, आई, आश्रीत इ.) यापूर्वीच सरकारी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर, अर्जदाराला सरकारच्या अनुदाचा लाभ घेता येणार नाही.
अल्प उत्त्पन्न गट (LIG) |
ज्या अर्जदाराचे वार्षिक कुटुंबिक उत्त्पन्न रुपये 6 लाखापेक्षा जास्त असेल, तो अल्प उत्त्पन्न गट असेल. |
अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. |
अर्जदाराचे किंवा त्यांचा/तिचा पती /पत्नी आणि अविवाहित मुले यांना भारतात पक्के घर असू नये. |
अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे. |
Cidco Lottery 2024 apply online अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
सिडकोच्या घराची अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा⇐ |
सिडको घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
म्हाडाची 6294 घराची लॉटरी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : नागरिकांनी घरासाठी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
सिडको घरासाठी अर्ज कसा करायचा आहे
अर्जदारांना या वेबसाईटवरून किंवा Cidco HOMES या मोबाइल अँपद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
संपूर्ण अर्ज/ नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि वाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
पसंतीची निवड आणि बुकिंग रक्कमेची विंडो 15 दिवसांसाठी खुली असेल.
ज्या ग्राहकांना ऑनलाईन रेजिट्रेशन केले आहे त्यांना त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल. ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो. त्या 15 पसंतीचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे
अर्जदार सोडतीच्या तीन फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतात.
प्रत्येक फेरीत ग्राहक त्याच्या किमान 1 आणि कमाल 5 निवडी देऊ शकतो.
निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थावरील टॉवर आणि मजल्याचे जास्तीत जास्त 5 पसंती निवडू शकतो.
कुठल्याही सोडत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही. परंतु प्रत्येक फेरीत एकूण 5 पसंतीची मर्यादा आहे.
नोंदणीसाठी अर्ज शुल्क/फी
अर्जदारांना लागू असलेल्या अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्त्पन्न गट या दोन्ही गटामध्ये रुपये 236 शुल्क भरावे लागेल.
अर्ज शुल्क विना परतावा आहे कृपया याची नोंद घ्यावी.
सिडको योजनेची एकूण तीन टप्पे
महा गृहनिर्माण योजनेचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणी आणि कागदपत्र सादर करणे. |
दुसऱ्या टप्प्यात बुकिंगच्या रक्कमेच्या भरणा आणि सदनिकाकरिता पसंतीक्रम देणे. |
तिसऱ्या टप्पयात सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे |
पसंती दिल्यानंतर, अर्जदारांना बुकिंग रक्कम भरावी लागेल, रुपये 75000 /- + GST (आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी EWS )
रुपये 150000 /- + GST अल्प उत्त्पन्न गटासाठी
सिडको नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पनाचा दाखला
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्मप्रमाणपत्र
- अर्जदाराचा पत्ता
- अर्जदाराचे बँक डिटेल्स
- सह अर्जदाराचे तपशील
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : नागरिकांनी घरासाठी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.