पोस्टाची महिला बचत प्रमाणपत्र योजना ; महिलांना भेटणार मोठं व्याजदर, 02 वर्षाची गुंतवणूक, जाणून घ्या फायदे | Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi

Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक रकमी नवीन लघुबचत योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावावर 2 वर्षासाठी 7.5 टक्के व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यन्तची ठेवीची सुविधा देण्यात येणार आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी जोखीम मुक्त योजना आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना योजना लागू आणि कार्यन्वित करण्यास परवानगी दिली आहे. मुली आणि महिलांसाठी योजनेत वाढीव आर्थिक सक्षम करणे यामागचा उद्देश आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ह्या योजनेचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत वैध आहे त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी या योजनेत गुंतवणूक करून घ्यावी. 

Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. त्यामध्ये महिला 02 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जमा केलेल्या रक्कमेवर 7.50 टक्के व्याजदर चक्रवाढ आधारावर उपलब्ध आहे. 

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवूणक केल्याने महिलाना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये हमखास परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत महिला 2 वर्षासाठी जास्तीत जास्त 02 लाख रुपये जमा करू शकतात. सदर योजनेची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील. 

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

सर्व मुली आणि महिलांना आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय प्रदान करणे.
या योजनेसाठी 31 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी दोन वर्षाच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत ठवलेल्या ठेवीवर 7.5 टक्के दराने व्याज असेल.
किमान गुंतवणूक रुपये 1000 /- आणि कमाल गुंतवणूक 2 लाख पर्यंत मर्यादित जमा केली जाऊ शकते.
या योजनेत जमा केलेल्या रक्कमेचा कालावधी दोन वर्षाचा असेल. 

 

योजनेसाठी आवश्यक पात्रता

अर्जदार भारतीय महिला नागरिक असावी.
ही योजना फक्त महिला आणि मुलींसाठी आहे.
या योजने अंतर्गत कोणतीही वैयत्तिक महिला अर्ज करू शकते.
अल्पवयीन मुलीची खाते पालक देखील उघडू शकतात.
कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही सर्व वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊन शकतात.

 

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे
योजनेच्या माध्यमातून देशातील महिला आणि मुलींना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय देण्यात आला आहे.
योजनेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतचे कमाल मर्यादेसह गुंतवणूक करता येते. तसेच मध्ये आवश्यकता पडल्यास तुमच्या ठेवीतील रकमेच्या 40% रक्कमही तुम्हाला काढता येते. या रकमेवर ती माहीत 7.5 टक्के व्याज दिले जाते.
योजनेच्या माध्यमातून ठेवलेल्या ठेवीवर तिमाही चक्रवाढ व्याज दिले जाईल जे थेट महिलेच्या खात्यात जमा करण्यात येईल.
 महिला बचत पत्र  योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे

 

Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi अर्ज प्रक्रिया
अर्जदार जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन फॉर्म भरू शकतात.
अर्जदाराने खाली दिलेल्या फॉर्म डाउनलोड करून आवश्यक ती माहिती भरून पोस्ट ऑफिस मध्ये सबमिट करावा.
अर्जासोबत खाली दिलेली सर्व कागदपत्रे जोडा.
31 मार्च 2025 पूर्वी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

 

2 लाख गुंतवणुकीवर 31,125 रुपये व्याज

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल.

तुम्ही 2 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला पहिल्या वर्षी 15,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 16,125 रुपये परतावा मिळतील.

म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत 31,125 रुपये व्याज मिळेल.

Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi
Mahila Samman Bachat Patra Yojana In Marathi
Mahila Samman Bachat Patra Yojana अर्जाचा नमुना
महिला सन्मान बचत पत्र योजना अर्ज नमुना   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
इतर योजना पाहण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐ 
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • वयाचा पुरावा 
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • मतदान कार्ड 

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment