Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 : जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेत पदवीधारकांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा नक्की घ्या.
तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नावाजलेल्या सरकारी बँक महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक या विभागात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Notification
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. कोणत्याही शाखेतून पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.
मित्रांनो महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क, पदाचे नाव, पदसंख्या आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी / Junior Officer Grade | 25 |
प्रशिक्षणार्थी सहयोगी / Trainee Associates | 50 |
एकूण | 75 |
अर्ज सादर करण्याची मुदत :
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 19 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 08 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 08 नोव्हेंबर 2024 |
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व वेतनश्रेणी
वयोमर्यादा : 21 वर्ष ते 32 वर्ष वय असलेले उमेद्वार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. |
परीक्षा शुल्क : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी / Junior Officer Grade – रुपये 1770 /- (GST सह) प्रशिक्षणार्थी सहयोगी / Trainee Associates – रुपये 1180 /- (GST सह) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी/पगार (रुपये) |
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी / Junior Officer Grade | 30,000/- ते 49,000/- |
प्रशिक्षणार्थी सहयोगी / Trainee Associates | 25,000/- ते 32,000/- |
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी / Junior Officer Grade |
शैक्षणिक पात्रता |
उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यांनी मॅट्रिकची परीक्षाही मराठीसह एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी. |
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी सहयोगी / Trainee Associates |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह पदवीधर पदवी आवश्यक आहे. उमेदवाराने मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी. टायपिंगसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
इतर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क/फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
ऑनलाईन भरलेली फी पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- जन्म दाखला (असल्यास)
- आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- जातीचा दाखला (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.