Apaar Card In Marathi केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थांसाठी अपार कार्ड सुरु केले आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी Apaar Card बनवले जाणार आहेत. Apaar म्हणजे (ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री) असे पूर्ण नाव आहे. जे वन नेशन वन स्टुडन्ट आयडी कार्ड म्हणून ओळखले जाते. या कार्डद्वारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा, जसे कि, शिष्यवृत्ती, पुरस्कार, शैक्षणिक माहिती, पदव्या, आणि इतर माहिती एकच कार्डमध्ये असणार आहे.
केंद्र सरकारने “अपार कार्ड” जारी केले आहे. हे कार्ड संपूर्ण देशभरातील खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्ड असणार आहे. Apaar card मध्ये 12 अंकी युनिक नंबर असणार आहे. ज्याचा वापर करून विद्यार्थी सर्व फायदे घेऊ शकतात आणि शैक्षणिक नोंदही ठेऊ शकता.
Apaar Card In Marathi | माहिती
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडन्ट अपार कार्ड सुरु केले आहे यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी Apaar Card बनवले जाणार असून यामध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा, जसे कि, शिष्यवृत्ती, पुरस्कार, शैक्षणिक माहिती, पदव्या, आणि इतर माहिती अपलोड केली जाणार आहे. अपार कार्डचा मुख्य उद्देश विद्यार्थंची संपूर्ण माहिती एकत्रित ठेवणे हा आहे.
अपार कार्ड कसे बनवायचे, अपार कार्डचे फायदे, कार्डची संपूर्ण माहिती, ऑनलाईन कार्ड कसे काढायचे आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
apaar card apply | अपार कार्ड कसे बनवायचे
अपार कार्ड बनविण्यासाठी विद्यार्थाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. |
डिजिलॉकरवर खाते असणे आवश्यक असून त्या आधारे KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. |
नोंदणी नंतर संबधीत शाळा आणि महाविद्यालयाकडून “अपार कार्ड” दिले जाईल. |
अपार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थांच्या पालकांची संमती असणे आवश्यक आहे. |
पालकांची संमती आवश्यक असून पालकांनी तो अर्ज भरून शाळा किंवा महाविद्यालयांत देणे आवश्यक आहे. |
apaar card apply online | अपार कार्डची नोंदणी प्रक्रिया
खाली दिलेल्या अधिकृत ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC बँक) वेबसाइटला भेट द्या. |
नंतर समोर दिलेल्या ‘My Account ” वर क्लिक करा आणि ‘Student पर्याय निवडा. |
पुढे DigiLocker खाते तयार करण्यासाठी ‘साइन अप’ वर क्लिक करा आणि मोबाईल, पत्ता आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा. |
सर्व माहिती पाहून क्रेडेन्शियल्स वापरून DigiLocker खात्यात लॉग इन करा. |
नंतर पुढे KYC व्हेरिफाय करण्यासाठी डिजिलॉकर आधार कार्ड तपशील ABC सोबत शेअर करण्यासाठी तुमची संमती विचारेल. ‘मी सहमत आहे’ निवडा. |
नंतर संपूर्ण शैक्षणिक माहिती प्रविष्ट करा जसे की शाळा किंवा विद्यापीठाचे नाव, वर्ग, अभ्यासक्रमाचे नाव इ. |
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि अपार कार्ड तयार केले जाईल. |
apaar card registration | अपार कार्ड काढण्याची लिंक
ऑनलाईन अपार कार्ड काढण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Apaar Card In Marathi | अपार कार्डचे फायदे
अपार कार्ड प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा एक जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात पाठवणे सुलभ होईल. |
अपार ला डिजिलॉकर जोडेल जाणार असून त्यातून विद्यार्थाना शिक्षणात साध्य केलेले 10 वी, 12 वी, बोर्डचे निकाल, एकत्रित प्रगती अहवाल, पदवी, शैक्षणिक माहिती, पुरस्कार, शिष्यवृत्ती आणि इतर माहिती यावरून पाहता येईल. |
विद्यार्थाना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांचा प्रगती अहवाल, शाळाबाह्य विद्यार्थी, अर्धातून सोडणाऱ्या विद्यार्थावर लक्ष ठेवता येईल. |
विद्यार्थी APAAR आयडी कार्डद्वारे थेट सरकारकडून सरकारी योजनेचे लाभ मिळवू शकतात. |
अपार आयडी कार्ड हा विद्यार्थ्यांसाठी एक आजीवन ओळख क्रमांक आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि यशाचा अखंडपणे मागोवा घेता येतो. |
संपूर्ण विद्यार्थांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल. |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||