बांधकाम कामगार नोंदणी करा आणि मोफत मिळणार संसार उपयोगी भांडे, अनुदान, शिष्यवृत्ती आणि बरच काही | Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi : महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळ (MBOCW) संस्थेची स्थापना केलेली आहेत. या मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगाराची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक, शैक्षणिक आरोग्य विषयक तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातात व कामगारांनां अनेक योजनांचा लाभ दिला जातो. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगार योजना काय आहे?

बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कामगाराची महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. कामगारांचे जीवन उज्ज्वल व्हावे व त्यांना विविध प्रकारे आर्थिक लाभ देण्यासाठी हि योजना आहे. ज्यामध्ये कामगाराला रोजगार मिळून देणे, सुरेक्षेतेसाठी साहित्य पुरवणे, आणि या योजना द्वारे कामगारांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. 

Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi माहिती 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची “बांधकाम कामगार योजना” या योजेने अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना सेफ्टी किट, विविध प्रकारचे संसार उपयोगी भांडे, व त्याचबरोबर अपघाती विमा व इतर सोयी सुविधा या योजने अंतर्गत मिळणार आहेत. 

बांधकाम नोंदणीसाठी आवश्यक पात्रता

18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार.
मागील बारा महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार.

बांधकाम नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा पुरावा 
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड)
  • पासपोर्ट साईज तीन फोटो 
  • बँक पासबुकची झेरॉक्स

नोंदणी फी – रुपये 1 /- व वार्षिक वर्गणी रुपये 1 /- 

कोणते कामगार नोंदणी करू शकतात ? (कामाचे स्वरूप)

बांधकाम काम करीत असलेल्या बार बेडर/ वीटभट्टी कामगार/सुतारकाम/ सेंट्रिंग/ खोदकाम/वीज जोडणी / आभाशी छत बसविणारा / फिटर / मदतनीस / अंतर्गत सजावट करणारा / हेवी इंजि. / संगमरवर व काडपायची कामे करणारे/ गवंडी / बांधकामाच्या ठिकाणी मिक्सिर किंवा रोलर चालवणारा / मोझॅक कागमार / पॉलिशिंग कामगार / नगरपालिकेचे गातारकं करणारे / रंगकाम करणारे / नळजोडणी काम करणारे / खाणकामगार / दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे / बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक / वेल्डर / वेल सिनकर आणि इतर कामगार. 

Bandhkam Kamgar Yojana 2024 Online Registration
महत्वाच्या लिंक्स
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
बांधकाम कामगार ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया/पद्धत
अर्जदार बांधकाम कामगाराला शासनाच्या वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर कामगार पर्यायामध्ये कामगार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या सर्व माहितीवर टिक करायचे आहे आणि तुमची पात्रता तपास वर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शहराची निवड करायची आहे तसेच तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व मोबाईल नंबर टाकायचा आहे व Proceed to Form बटनावर क्लिक करायचा आहे.
आता तुमच्यासमोर बांधकाम कामगार योजनेचा नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक, निवासी पत्ता, कायमचा पत्ता, कौटुंबिक तपशील, बँक तपशील, नियोक्ता तपशील, कागदपत्रे) भरायची आहे व Save बटनावर क्लिक करायचे आहे.
बांधकाम कामगारांना विविध 30 प्रकारचे भांडे दिले जातात

या योजने अंतर्गत ज्यांची नोंदणी झाली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध 30 प्रकारचे भांडे शासनाकडून मोफत दिले जाते त्या वस्तू खालील प्रमाणे दिले आहेत. 

गृहउपयोगी संचातील वस्तू  नग
ताट  04
वाट्या  08
पाण्याचे ग्लास  04
पातेले झाकणासह  01
पातेले झाकणासह  01
पातेले झाकणासह  01
मोठा चमचा (भात वाटपाकरिता) 01
मोठा चमचा (वरण वाटपाकरिता) 01
पाण्याचा जग (2 लिटर)  01
मसाला डब्बा (07 भाग) 01
डब्बा झाकणासह (14 इंच ) 01
डब्बा झाकणासह (16 इंच ) 01
डब्बा झाकणासह (17 इंच ) 01
परात 01
प्रेशर कुकर (05 लिटर) 01
कढई  01
स्टीलची टाकी मोठी  01
एकूण  30
Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi
Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi
बांधकाम कामगारांना मिळणार 5000 /- रुपये

या पोर्टलच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक मदत ऑनलाईन पुरवली जाते. यामुळे सोप्या पद्धतीने कामगार वर्ग ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकतील. या योजनेमधून लाभार्थींच्या कुटुंबाला 2 हजार रुपये पासून ते 5 हजार रुपये पर्यंत आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. बांधकाम कामगारांना या योजनेच्या माध्यमातून 2 हजार ते 5 हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले जाणार.

बांधकाम कामगारांच्या पाल्याना मिळणार 5000 ते 1 लाख शिष्यवृत्ती | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2024
नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक योजनाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
बांधकाम कामगारांच्या 2 मुलांना 1 ते 7 वी साठी प्रत्येक वर्षी रु.25,00/- शिष्यवृत्ती दिली जाईल.
8वी आणि 10वी साठी प्रतिवर्ष रु.5,000/- शिष्यवृत्ती राज्यसरकार देणार.
नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इ.10वी आणि 12वी च्या परीक्षेमध्ये कमीत-कमी 50% किंवा जास्त गुण मिळाले तर राज्य रु.10,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यास किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीला पदवीसाठी शैक्षणिक पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रत्येक वर्षाला रु.20,000/- रुपये मिळतील.
वैदकीय पदवी अभ्यासक्रमासाठी 2 पाल्यांना/मुलांना व कामगाराच्या पत्नीला प्रत्येक वर्ष रु.1,00,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर प्रत्येक वर्षी रु.60,000/- शिष्यवृत्ती मिळेल.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना संगणकाचे शिक्षण(MSCIT) करत असेल तर त्याला शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल.
बांधकाम कामगारांनाच्या 2 पाल्यांना/मुलांना शासनमान्य पदवीसाठी प्रत्येक वर्षी रु.20,000/- आणि पदव्युतर पदविकेसाठी रु.25,000/- मिळतील.

 

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “बांधकाम कामगार नोंदणी करा आणि मोफत मिळणार संसार उपयोगी भांडे, अनुदान, शिष्यवृत्ती आणि बरच काही | Bandhkam Kamgar Yojana 2024 In Marathi”

Leave a Comment