मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे दिवस : BMC Recruitment 2024 In Marathi

BMC Recruitment 2024 In Marathi : सरकारी नोकरीची संधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 रिक्त जागांसाठी “कार्यकारी सहाय्यक” (लिपिक) सरळसेवेत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी 11 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटचे काही दिवस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उरलेले आहेत. पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. लवकरात लवकर उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो तुम्ही जर सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा नक्की लाभ पात्र उमेदवारांनी घ्यावा. मुंबई महानगरपालिकेत विविध विभागात गट क मधील “कार्यकारी सहाय्यक” (लिपिक) या पदांकरिता सुमारे 1846 मेगाभरती जाहीर झालेली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली आहे 

BMC Recruitment 2024 In Marathi

मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार, बृहन्मुबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या गट-क “कार्यकारी सहायक” (लिपिक) या संवर्गातील खाली नमूद केली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरायची आहे. अधिकृत जाहिरातीनुसार नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता/अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

“कार्यकारी सहायक” (लिपिक) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेल्या जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे तर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, वेबसाईट, अर्ज कसा करायचा, अर्ज शुल्क/फी आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. सदरची भरतीसाठी माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

BMC Recruitment 2024 In Marathi पदाचे नाव, पदसंख्या आणि अर्जाची मुदत 

सरसेवेने भरावयाच्या “कार्यकारी सहायक” (लिपिक) संवर्गातील पदांचा तपशील पुढीलप्रमाणे 

पदाचे नाव : “कार्यकारी सहायक” (लिपिक) 
रिक्त पदांची संख्या : 1846
वेतनश्रेणी : रुपये 25,500/- ते  81,100/-
गट :  

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक  21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक  11ऑक्टोबर 2024

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

BMC Recruitment 2024 In Marathi वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

जाहिरातीत प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास, उमेदवार खालील नमूद केल्या विहित वयोमर्यादेतील असावा.

प्रवर्ग  वयोमर्यादा 
अराखीव (खुला) उमेदवारांसाठी   18 वर्ष ते 38 वर्ष 
राखीव (खुला) उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 43 वर्ष 
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 43 वर्ष 
माजी सैनिक उमेदवारांसाठी 45 वर्ष पर्यंत 
प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष 
खेळाडू उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष 
भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष 

 

ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी
ऑनलाईन परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आकारले जाईल.

अराखीव (खुला) उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क :- रुपये 1000 /-  
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क :- रुपये 900 /- 

 

हि पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓

महापारेषण अंतर्गत वीजतंत्री Electrician ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु आजच ऑनलाईन अर्ज करा .

BMC Recruitment 2024 In Marathi अधिकृत PDF जाहिरात व अर्ज करण्यासाठी लिंक्स 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
इतर भरतीची माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

BMC Recruitment 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता 

उमदेवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, कला, विज्ञान विधी किंवा समकक्ष शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 % गुणांसह उत्तीर्ण असावा. सोप्या भाषेत कोणत्याही शाखेचा उमेदवार पदवीधर असावा.

पात्र उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे (टायपिंग) प्रत्येकी किमान 30 (WPM ) शब्द प्रति मिनिटे वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

पात्र उमेदवाराकडे MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.

टीप: “कार्यकारी सहायक” (लिपिक) संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहील. 

BMC Recruitment 2024 In Marathi
BMC Recruitment 2024 In Marathi
BMC Recruitment 2024 In Marathi ऑनलाईन अर्ज कसा करायचा 
  • कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

  • उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

  • परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेची ठिकाणे 

कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षेची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

  • पुणे 
  • मुंबई 
  • कोकण 
  • छत्रपती संभाजीनगर 
  • नाशिक 
  • नागपूर 
  • अमरावती 
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो स्कॅन 
  • स्वाक्षरी स्कॅन अपलोड करण्यासाठी 
  • जातीचा दाखला 
  • शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • MSCIT प्रमाणपत्र 
  • इंग्रजी व मराठी टायपिंग प्रमाणपत्र 
  • इतर आवश्यक प्रमाणपत्र
FAQ’s 

प्रश्न : मुंबई महानगरपालिकेत कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे?
उत्तर : विविध विभागात “कार्यकारी सहाय्यक” (लिपिक) सरळसेवेत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

प्रश्न : मुंबई महानगरपालिका भरती किती रिक्त जागा आहे?
उत्तर : एकुण रिक्त जागा 1846

प्रश्न : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किती मुदत आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे दिवस : BMC Recruitment 2024 In Marathi”

Leave a Comment