दिवाळी लक्ष्मी पूजन कधी आहे? लक्ष्मी पूजन कसे करावे? संपूर्ण माहिती जाणून घ्या | Diwali Laxmi Puja 2024 In Marathi

Diwali Laxmi Puja 2024 In Marathi : यंदाच दिवाळी लक्ष्मी पूजन कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या वेळी करावे या विषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याविषयी अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंचांगात व दिनदर्शके मध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा चुकीचा अर्थ काढून फक्त १ नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Diwali Laxmi Puja 2024 In Marathi

निर्णयसिंधूत ‘दण्डैकरजनीयोगे दर्शः स्यात्तु परेऽहनि । तदा विहाय पूर्वेद्युः परेऽन्हि सुखरात्रिका ।।’अर्थात जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात विद्यमान असेल तेव्हा सूर्यास्तानंतर १ दंड म्हणजे १ घटिका अर्थात् २४ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त अमावास्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे 01 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि सूर्यास्तानंतर 24 मिनिटांपेक्षा कमी अमावास्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असा सरळ अर्थ होतो.

सोबत काशीतील पूज्यपाद पं.श्री गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजींच्या हस्ताक्षरातील लक्ष्मीपूजनाचा धर्मशास्त्रीय खुलासा पाठवत आहोत.

Diwali Laxmi Puja 2024 Shubh Muhurat लक्ष्मी पूजन कधी करावे

प.पू. श्री गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजींनी लिहिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र व इतर शेजारील राज्यात कोणत्या गावी कधी लक्ष्मीपूजन करावे ते देत आहोत. 
अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी पूजनाचा काळ म्हणजे प्रदोष काळ (सूर्यास्थनंतरचा काळ) हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो. त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे. 

महाराष्ट्र व इतर शेजारील राज्यात कोणत्या गावी कधी लक्ष्मीपूजन करावे ते काही देत आहोत.

31 ऑक्टोबर 2024
या तारखेस लक्ष्मीपूजन असलेली ठिकाणे- अहमदनगर, औरंगाबाद, अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर, धारवाड

 

01 नोव्हेंबर 2024
या तारखेस लक्ष्मीपूजन असलेली ठिकाणे- अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातुर, नागपूर, नांदेड, निझामाबाद, परभणी, वर्धा, यवतमाळ आदी…

 

दिवाळी लक्ष्मी पूजन का करतात?

अश्विन वैद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहेत. लक्ष्मी पूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे. 
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिवाळी लक्ष्मी पूजन करतात.

दिवाळी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
  • सकाळी ८  ते सकाळी ९.३० लाभ 
  • सकाळी ९.30 ते सकाळी 11 अमृत 
  • दुपारी १२.३० ते दुपारी २ शुभ 
  • संध्याकाळी ५ ते ६.३० चंचल 
  • संध्याकाळी ५.३५ ते ८.११- प्रदोष काल
  • संध्याकाळी ६.२१ ते ८.१७ – वृषभ काल 
दिवाळी लक्ष्मी पूजन करण्याची पद्धत
गणेश -लक्ष्मीची मूर्ती चोरांगावर ठेवून त्याच्या बाजूला सुरेख रांगोळी काढा.
मूर्तीच्या बाजूला दिवा लावून यानंतर प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी कच्चे तांदूळ ठेवा.
त्यांनतर गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवावे. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशासोबत कुबेर, सरस्वती आणि काली मातेची पूजा करण्याची परंपरा आहे.
भगवान विष्णूची पूजा केल्याशिवाय देवी लक्ष्मीची पूजाही करायला हवी.
लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठपणा करा.
हळदी – कुंकू, अक्षता -फुले अर्पण करून बत्ताशा आणि लाह्या अर्पण करा. या दिवशी केरसुणीची देखील पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचा मंत्र वाचून गोडाचे पदार्थ आणि घरातील फराळ ठेवा. 
Diwali Laxmi Puja 2024 In Marathi
Diwali Laxmi Puja 2024 In Marathi
दिवाळी लक्ष्मी पूजन कसे केले जाते?
लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.
चौरंग किंवा पाठ
लाल रंगाचे कापड

 

FAQ’s लक्ष्मी पूजन बाबतीत सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे

प्रश्न : दिवाळीत लक्ष्मीपूजन घरी कसे करावे?
उत्तर : टेबल किंवा प्लॅटफॉर्म किंवा ट्रायपॉड स्टँड ठेवा आणि त्यावर लाल कापड पसरवा. मध्यभागी काही धान्ये ठेवा आणि धान्यांच्या मध्यभागी हळद पावडरसह कमळ काढा. लक्ष्मी, गणेशाची प्रतिमा आणि पीठावर पसरलेल्या धान्यांवर ठेवा. चांदीचे किंवा तांब्याचे भांडे तीन चतुर्थांश पाण्याने भरा.

प्रश्न : दिवाळीच्या पूजेसाठी कलशात काय घालावे?
उत्तर : कलश पाण्याने भरा आणि त्यात एक सुपारी, एक फूल, एक नाणे आणि तांदळाचे दाणे टाका. कलशाच्या तोंडावर पाच प्रकारची पाने किंवा पाच आंब्याची पाने लावा. 3. देवतांची प्रतिष्ठापना: तांदळाच्या दाण्यांवर हळदीची पावडर टाकून कमळ काढा आणि सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांसह लक्ष्मीची मूर्ती ठेवा.

प्रश्न : दिवाळीत लक्ष्मी आरती करावी का?
उत्तर : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने वैदिक मंत्रांचा जप आणि आरती केल्याने घरात शांती, आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी येते.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “दिवाळी लक्ष्मी पूजन कधी आहे? लक्ष्मी पूजन कसे करावे? संपूर्ण माहिती जाणून घ्या | Diwali Laxmi Puja 2024 In Marathi”

Leave a Comment