DTP Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील अनुरेखक (गट – क) व कनिष्ठ आरेखक संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत नगात रचना आणि मूल्यनिर्धारण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकेत स्थळावर दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येईल.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत एकूण 154 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
DTP Maharashtra Recruitment 2024 Notification
पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. तरी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे.
मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये अनुरेखक (गट-क) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
भरतीची अधिकृत PDF जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
DTP Maharashtra Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव | पदसंख्या |
अनुरेखक (गट-क) | एकूण रिक्त जागा 126 |
कनिष्ठ आरेखक | एकूण जागा 28 |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत :
कार्यवाहीचा टप्पा | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक | 18 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज सादर अंतिम दिनांक | 17 नोव्हेंबर 2024 |
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | याबाबत संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक |
DTP Maharashtra Recruitment 2024 वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व वेतनश्रेणी
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्ष असावे. |
ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट |
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
प्रकल्पग्रस्त/अंशकालीन/दिव्यांग उमेदवारांना 10 ते 15 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क/फी :
अराखीव (खुला) प्रवर्ग रुपये – 1000 /- | राखीव प्रवर्ग रुपये 900 /- |
उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. |
वेतनश्रेणी : रुपये : 21,700/- ते 69,100/- अधिक नियमानुसार भत्ते |
DTP Maharashtra Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव : अनुरेखक (गट-क) |
शैक्षणिक व तांत्रिक पात्रता/अर्हता |
शैक्षिणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेनंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठयक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेली किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता तांत्रिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्थेकडील सव्य संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो कॅड) (AUTO CAD ) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भोगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. |
DTP Maharashtra Recruitment 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ पहिली जाहिरात येथे क्लिक करा⇐ दुसरी जाहिरात |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विविध विभागात भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवरून https://dtp.maharashtra.gov.in/en उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज भरण्यापूर्वी सर्व पदासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.
इतर कोणत्याही पद्धतीने भरतीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली तळाशी जाऊन online apply वर क्लिक करावे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे जेणे करून पुढील भरती संबधीत माहिती ईमेल आयडीवर आणि मोबाइल वर येईल.
उमेदवारांनी स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे तसेच सर्व शैक्षणिक माहिती, संपूर्ण माहिती, पत्ता देणे आवश्यक आहे.
उमेदवाराने ज्या नावाने अर्ज केला आहे ते नाव त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडी वर आणि मोबाइल नंबरवर एक यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
पूर्ण अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरायचा आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होऊ शकत नाही म्हणून अर्ज शुल्क/फी व्यवस्तीत भरावी.
अर्ज शुल्क/फी भरल्यानंतर फीची पावती आणि सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवणे.
एकदा जमा केल्यानांतर शुल्क/फी कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- शैक्षणिक कागदपत्रे
- इंग्लिश आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट
- MSCIT प्रमाणपत्र असल्यास
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक कागदपत्रे
सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
DTP Maharashtra Recruitment 2024 भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
1 thought on “Government Job : नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात नवीन भरती जाहीर पात्रता आणि इतर माहिती | DTP Maharashtra Recruitment 2024”