DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi : मित्रांनो नगररचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनच्या विविध विभागामध्ये नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/नागपूर/ छत्रपती संभाजीनगर/अमरावती विभागात रचना सहाय्यक (गट ब) (अराजपत्रित) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित), निन्मश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये एकूण रिक्त 0289 पदे भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर 09 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. जर तुम्हाला सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधत असाल असेल ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi Notifications
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत एकूण 0289 पदांची भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज करा आणि ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र व मैत्रीणीना नक्की शेअर करा. अधिकृत जाहिरातीनुसार विविध विभागामध्ये रिक्त पदे रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निमश्रेणी लघुलेखक या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने 09 सप्टेंबर 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवाराला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. महाराष्ट्र शासन अंतर्गत आकर्षण वेतन सुद्धा दिले जाणार आहे त्यानुसार उमेदवारांनी थोडा सुद्धा वेळ न घालवता आजच ऑनलाईन अर्ज भरावा. सदरील भरतीची जाहिरात, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता, वेबसाईट आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. आणि ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा.
DTP Maharashtra Recruitment 2024 रिक्त पदाची नावे
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये खालील रिक्त पदे भरली जाणार आहे त्यांची नावे खाली देण्यात आलेली आहे.
- रचना सहाय्यक (गट ब ) (अराजपत्रित)
- उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित)
- निम श्रेणी लघुलेखक (गट ब ) (अराजपत्रित)
DTP Maharashtra Recruitment 2024 Last Date to apply अर्जाची मुदत
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत सदर पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 वरून वाढून अपरिहार्य कारणासाठी 09 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे
अ. क्र. | तपशील | दिनांक |
1 | ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक | 30 जुलै 2024 |
2 | ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक | 09 सप्टेंबर 2024 |
3 | ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी भरण्याची अंतिम दिनांक | 10 सप्टेंबर 2024 |
4 | प्रवेश पात्र ऑनलाईन दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
5 | ऑनलाईन परीक्षा दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
DTP Maharashtra Recruitment 2024 रिक्त जागांचा तपशील
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि अमरावती या जिल्ह्यात विविध विभागात किती रिक्त जागा आहेत त्या सर्व जागांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
अ. क्र. | पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
1 | रचना सहाय्यक (गट ब) | 261 |
2 | उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब ) | 19 |
3 | निम श्रेणी लघुलेखक (गट ब ) | 09 |
एकुण जागा | 289 |
ही पण भरतीची माहिती वाचा ⇓
CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना 1130 पदाची सरकारी नोकरीची संधी
युनियन बँकेत 500 पदाची भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती
DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi वयाची अट
- किमान वय 18 वर्ष पूर्ण व कमाल वय 38 वर्ष जास्त नसावे.
- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षपेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा 05 वर्ष शिथिल
- दिव्यांग व अनाथ उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्ष शिथिल
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू याना असलेली वयोमर्यादेतील शिथितेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यतानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव : रचना सहाय्यक (गट ब) |
शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी पदवी |
पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब ) |
शैक्षणिक पात्रता |
दहावी पास आणि टायपिंग स्पीड इंग्लिश 40 WPM व मराठी टायपिंग स्पीड 30 WPM |
पदाचे नाव : निम श्रेणी लघुलेखक (गट ब ) |
शैक्षणिक पात्रता |
दहावी पास आणि टायपिंग स्पीड इंग्लिश 40 WPM व मराठी टायपिंग स्पीड 30 WPM |
DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi अर्ज शुल्क/फी
|
|
|
DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी वर दिलेली भरतीची PDF जाहिरात वाचून मगच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
DTP Maharashtra Recruitment 2024 online apply
- महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विविध विभागात भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवरून https://dtp.maharashtra.gov.in/en उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी सर्व पदासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.
- इतर कोणत्याही पद्धतीने भरतीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली तळाशी जाऊन online apply वर क्लिक करावे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे जेणे करून पुढील भरती संबधीत माहिती ईमेल आयडीवर आणि मोबाइल वर येईल.
- उमेदवारांनी स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे तसेच सर्व शैक्षणिक माहिती, संपूर्ण माहिती, पत्ता देणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने ज्या नावाने अर्ज केला आहे ते नाव त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडी वर आणि मोबाइल नंबरवर एक यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- पूर्ण अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरायचा आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होऊ शकत नाही म्हणून अर्ज शुल्क/फी व्यवस्तीत भरावी.
- अर्ज शुल्क/फी भरल्यानंतर फीची पावती आणि सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवणे.
- एकदा जमा केल्यानांतर शुल्क/फी कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महत्वाच्या सूचना
वर दिलेल्या राखीव / बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यंग्यसाठी आरक्षित आहे.
भरली जाणाऱ्या पदांमध्ये बदल केला जाऊ शकतो.
भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमात बदल, सूचना संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून सर्व माहिती संकेत स्थळावर देण्यात येईल आणि ईमेल आयडी आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

DTP Maharashtra Recruitment 2024 in Marathi आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- शैक्षणिक कागदपत्रे
- इंग्लिश आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट
- MSCIT प्रमाणपत्र असल्यास
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक कागदपत्रे
FAQ’s
प्रश्न : DTP Maharashtra Recruitment 2024 भरतीची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम मुदत 09 सप्टेंबर 2024
प्रश्न : DTP Maharashtra Recruitment 2024 किती रिक्त जागा आहे?
उत्तर : नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात एकूण 289 रिक्त जागा.
प्रश्न : DTP Maharashtra Recruitment 2024 अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर :पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे https://dtp.maharashtra.gov.in/en
प्रश्न : DTP Maharashtra Recruitment 2024 भरतीची शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : भरतीसाठी 10 वी ते पदवीधर पात्रता
प्रश्न : कोणत्या रिक्त जागा आहेत?
उत्तर : रचना सहाय्यक (गट ब) (अराजपत्रित) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित), निन्मश्रेणी लघुलेखक (गट ब) (अराजपत्रित) रिक्त पदाचे नाव.
सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
DTP Maharashtra Recruitment 2024 भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||
1 thought on “10 वी ते पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी | DTP Maharashtra Recruitment 2024 In Marathi”