Germany Job Yojana for Maharashtra : मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने अधिकृत रित्या शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्याणानुसार महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत तब्ब्ल 10 हजार तरुण आणि तरुणींना रोजगार दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील तरुणांनी 30 विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये 10 हजार रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायिककरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत राज्यातील प्रमुख सरकारी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत दिनांक 25/02/2024 रोजी सामंजस करार झाला आहे.
Germany Job Yojana for Maharashtra
राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियन मधील देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यामध्ये तरुणांना संधीही मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आणि दोन्ही देशातील संबंध सदृढ होतील. चला तर मग जाणून घेऊ या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, पात्र काय आहे, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनीमध्ये कायमस्वरूपाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, कुशल आणि अकुशल उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू असून यामध्ये आवश्यक असणारे ट्रेनिंग महाराष्ट्र सरकार मार्फत दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि PDF जाहिरात खाली दिलेली आहे. पात्र उमदेवरानी जाहिरात PDF माहिती नीट वाचून मगच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.
Germany Job Yojana for Maharashtra पदांची नावे
विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग आणि जर्मन भाषेचे ज्ञान उमेदवारांना महाराष्ट्र सरकार मार्फत मोफत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्य धारित व्यवसायसाठी राज्यातील अनुरूप व्यवसायिक पात्रता धारण केलेले उमेदवाराचं हा अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत भरती केली जाणारी पदे यासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी खालीलप्रमाणे
हेल्थ करिअर मधील पदे | |
ट्रेड | जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी (महिन्यामध्ये) |
परिचारिका (नर्स) (Nurse / Medical assistants) | 14-15 |
योगशाळा सहाय्यक (Lab Assistant) | 14-15 |
रेडिओलॉजी सहाय्यक (Radiology assistant) | 14-15 |
डेंटल सहायक (Dental assistant) | 6-7 |
केअर टेकर (care giver to sick and senior citizens) | 14-15 |
फिजोथेरीपीस्ट (Physiotherapists) | 14-15 |
डोकमेंटशन अँड कोडींग (Documentation & coding) | 6-7 |
अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन (Accounting & Administration) | 6-7 |
सर्व्हर & वेटर (Servers Waiters) | 6-7 |
रेसेपशनिस्टस (Receptionists) | 10-15 |
कूक (Cooks) | 6-7 |
हॉटेल मॅनेजर (Hotel Mangers) | 10-11 |
अकाउंट्स (Accounts) | 6-7 |
हॉउसकीपर्स / किल्नर्स (Housekeepers/Cleaners) | 6-7 |
व्यवसाय /कारागीर यामधील पदे | |
ट्रेड | जर्मन भाषेचे प्रशिक्षण कालावधी (महिन्यामध्ये) |
इलेक्ट्रशियन (Electricians) | 6-7 |
नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये विशेष इलेक्ट्रिशियन ( Electricians Specialized in renewable energies) | 6-7 |
हीटिंग तंत्रज्ञान (Heating Technicians) | 6-7 |
पेंटर (Painters) | 6-7 |
कारपेंटर्स (Carpenters) | 6-7 |
वीट /टाइल स्तर मेसन (Brick/tile Layers Mason) | 6-7 |
प्लम्बर (Plumbers) | 6-7 |
वाहन रिपेर्स (हलके आणि जड वाहन) (Mechanics For vehicle repairs | 6-7 |
ड्रॉयव्हर्स (Drivers) | 6-7 |
सुरक्षारक्षक (Security) | 6-7 |
डिलिव्हरी बॉय पोस्टल सर्विस (Delivery postal service) | 6-7 |
डिलिव्हरी बॉय पोस्टल सर्विस (Delivery postal service) | 6-7 |
विमानतळ किल्नर्स (Support at Airport) | 6-7 |
घरकाम (Housekeeping) | 6-7 |
विक्री सहाय्यक (Sales assistants) | 14-15 |
वेअर हाऊस मदत (Ware house assistance) | 6-7 |
Germany Job Yojana for Maharashtra ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिराती
मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर्मनी मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. जर्मन भाषेचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे याचा सर्व खर्च सरकार करणार आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. कोर्स 6 ते 8 महिने चालतो याचा सर्व खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. जर्मन भाषेचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे याची नोंद इच्छुक उमेदवारांनी घ्याची आहे.
जर्मन भाषेचा कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
सरकारी जर्मन भाषा योजना पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
Germany Job Yojana for Maharashtra आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधारकार्ड / मतदान कार्ड (ओळखीसाठी)
- पॅन कार्ड
- ड्रायविंग लायन्स
- पासपोर्ट फोटो (स्कॅन केलेला)
- स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
रोजगाराकरिता जर्मनी देशातील बायडेन युटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता, व्हिजा मिळविण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता सोयी उमेदवारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील राज्य संपूर्ण सहकार्य करेल.
या नोकरीमध्ये राज्यातील विविध पात्र आणि इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी निवासी प्रशिक्षणाची सोय देखील करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रात निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात राज्य सरकार आवश्यक मदत पात्र उमेदवारांना करणार आहे. त्यामुळे विदेशात नोकरी करण्यासाठी हा सुरक्षित मार्ग देखील तरुणांसाठी उपलब्ध असणार आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी योजना, सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
1 thought on “जर्मन भाषा शिकून, जर्मनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | महाराष्ट्र सरकारची नवी योजना | Germany Job Yojana for Maharashtra”