Google Pay Loan Scheme In Marathi : आजच्या युगात Google Pay आणि डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आजच्या युगात डिजिटल तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाच्या एक अविभाज्य भाग बनले आहेत. तयामुळे आता सगळे आर्थिक व्यवहार डिजिटलायझेशन झालेले आहेत. आणि आता Google pay आणि Phone pay सारखे थर्ड पार्टी अँप आले आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झाले आहेत.
Google pay च्या माध्यमातून आपल्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठविता येतात किंवा पैसे पैसे घेता देखील येतात. पण आता Google Pay जे लोक वापर करतात यांच्यासाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे आता Google Pay च्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक कर्ज उपलब्ध होणार आहे.
Google Pay Loan Scheme In Marathi माहिती
Google इंडियाने आता Google Pay मध्ये एक नवीन फिचर लॉन्च केलेले आहे यामध्ये ग्राहक Google Pay द्वारे 50 हजार ते 1 लाखापर्यंत वैयत्तिक कर्ज घेऊ शकतात याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही किंवा गरज पडणार नाही आणि या कर्जासाठी कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही फोनवरच संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.
नवीन लॉन्च केलेले Google Pay चे फिचर काय आहे? कर्ज नक्की कोणाला मिळणार? कर्ज मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करावा? व्याजदर किती आहे? या संपूर्ण प्रश्नाची माहिती खाली देण्यात आली आहे.
गूगल पे लोन योजना काय आहे ? | Google Pay Loan Scheme
Google pay द्वारे तुम्हाला 10 हजार ते 1 लाखापर्यंत कर्ज हे तुमच्या आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट स्कोरच्या आधारावर दिले जाते. DMI बँक, IDFC FIRST बँक आणि फेडरल बँक यांसारख्या Google Pay भागीदार बँकाकडून कर्ज उपलब्ध केले जाते आणि Google Pay अँपद्वारे तुम्ही मासिक हफ्ते भरू शकता. गूगल इंडियाने नुकतेच Google pay युजर्ससाठी वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉंच केलेली आहे.
Google Pay कडून कर्ज घेण्याची पात्रता काय?
जे युजर Google pay सातत्याने वापरतात त्यांचे आर्थिक व्यवहार सतत चालू असतात अँप वापरण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. ते यूजर कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकतात Google Pay अँपवरून तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येईल.
Google Pay कडून कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक)
- पॅनकार्ड
- बँक खाते माहिती आणि IFSC कोड
- मोबाइल नंबर Google Pay खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
Google Pay कर्जाची व्यजदार किती आहे?
Google pay वरून युजरला 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळू शकते या कर्जाचा कालावधी 36 महिने असतो आणि व्यजदार साधारणपणे वार्षिक 15 टक्के असते. मात्र प्रत्येक व्यक्तीची पात्रता वेगळी असून शकते आणि त्यानुसार कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कालावधी या बदल होऊ शकतो.
Google Pay कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे वैध पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. |
आधारकार्ड असणे आवश्यक आहे. |
Google Pay अँपला वैध बँक खाते जोडलेले आवश्यक आहे. |
चांगला क्रेडिट स्कोर असणे आवश्यक आहे. |
Google Pay कर्जासाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही तुमच्या मोबाइलवर Google Pay अँप चालू करून त्यावर लॉगिन करा. |
त्यानंतर Google Pay च्या व्यवसाय किंवा पेमेंट टॅबच्या खाली असलेल्या किंवा Money टॅबवर क्लिक करा. |
त्यानंतर Check your CIBIL Score For free टॅबवर क्लिक करा. |
तुम्ही जर पात्र असाल तर तुमची संपूर्ण हिस्टरी आणि क्रेडिट स्कोर तुम्हाला दिसेल. |
नंतर कर्जाची रक्कम व्याजदर आणि पेमेंट या सगळ्या गोष्टी, अटी तपासा. |
अर्ज सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. |
त्यानंतर तुमच्या आधार आणि पॅनकार्ड नंबर आणि बँक खाते नंबर IFSC कोड यासारखी संपूर्ण माहिती नीट भरा. |
नंतर EMI योजना निवडा आणि अटी शर्तीना सहमती द्या. |
तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल हा OTP टाकल्यानंतर तुमच्या अर्ज ऑनलाईन सबमिट केला जाईल. |
बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि पात्रता तपासतील. |
जर तुम्ही पात्र ठरला तर कर्जाची रक्कम दिलेल्या बँक खात्यावर जमा केली जाईल. |
Google Pay कर्ज एक सोयीस्कर आणि जलद वित्तीय अँप आहे. मात्र कोणतेही कर्ज घेताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या लिंक्स
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||