How Link Aadhar Card to Bank For Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात निधी जमाही झाले आहेत. परंतु ज्याची बँक खाती आधार कार्डला लिंक नाहीत, अशा महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले आहेत पण आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. बँकेला आधार कार्ड कास लिंक करायचे आणि आधार कार्डला बँक लिंक आहे का ते असे पाहायचे आहे ते आपण पाहणार आहोत.
How Link Aadhar Card to Bank For Ladki Bahin Yojana
सदर लाडकी बहीण योजनेचे चार ते पाच महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे पण काही महिलांच्या खात्यात पैसे येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशा महिला लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले बँक आणि आधार कार्ड लिंक आहे का हे तपासा जर नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक जणांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. ते कसं करायचे, त्याची प्रक्रिया काय ?
सदर या लेखात ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने आधार बँक लिंक कसे करायचे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने चेक करताना दुसरे कोणते बँक खाते आधारशी लिंक आहे ते सुद्धा समजते.
Aadhar Card Bank Account Link
सर्व प्रथम Google वर सर्च करा my aadhar https://myaadhaar.uidai.gov.in/login क्लिक करा |
आता तुमच्यासमोर माय आधार ची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा. |
आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड लॉगिन करायचं. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपच्या भरावा लागेल. |
त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी तो तिथे टाका. |
ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार वेबसाईट वरती लॉगिन झालात. |
आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल. |
आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा. |
आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाता ऍक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल. त्यामध्ये बऱ्याच जणांचा अकाउंट हा आधार कार्ड ची लिंक नाही तर तिथे डी ऍक्टिव्ह असं येत आहे. |
online bank account aadhar card link | ऑनलाईन आधारला बँक लिंक कसे करायचे
सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती Npci असं सर्च करायचं. किंवा क्लिक करा https://www.npci.org.in/ |
त्यानंतर खाली रिझल्ट मध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा. |
आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचं. |
आता तुमच्यासमोर खाली आणि ऑप्शन आले असतील पण तुम्हाला Bharat Aadhar seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचं. |
आता तुमच्यासमोर आणखी एक पेज आला असेल. त्यावर आधार कार्ड नंबर टाका. खाली request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा. |
त्यानंतर खाली तुम्हाला तुम्हाला ज्या बँकेचा खाते लिंक करायचा आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचा आहे. |
बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे. |
टम्स अँड कंडिशन याला एक्सेप्ट करून खाली एक कॅपच्या कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा. |
तुमचे अकाउंट आधार लिंक होऊन जाईल. |
बँकेत जा आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया
तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही एक अर्ज भरून आधार कार्ड लिंक करू शकता, भरून दिलेल्या फॉर्म सोबत आधार कार्डचा पुरावा दिल्यानंतर बँकांकडून तपासणी केली जाईल. बँकेत एक फॉर्म दिला जाईल हा फॉर्म संपूर्ण भरल्यानंतर तुमचे बँक खात आधार कार्डशी लिंक केलं जात. मचे बँक खात आधार कार्डशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर SMS द्वारे माहिती दिली जाते.
आधार बँक लिंक फॉर्म डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा ⇐ |
रेजिस्टर मोबाइलवरून SMS करून लिंक करणे
तुम्ही 567676 या क्रमांकावर UIDAadhar NumberAccount Number या फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवायचा आहे. तुम्ही दिलेली माहिती योग्य असेल तर आधार कार्ड लिंक झाल्याची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे कळवली जाईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||