How To Apply Online For Duplicate Pan Card In Marathi : पॅन कार्ड हे असे कागदपत्र आहे जेर हरवले किंवा खराब झाले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पर्मनंट अकॉउंट नंबर (पॅनकार्ड) हरविणे किंवा खराब होणे ही काही नवीन गोष्ट नाही. बऱ्याच जणांनी पॅनकार्ड काढून खूप वर्ष झाले आहेत त्यामुळे पॅनकार्ड वर दिसणाऱ्या फोटो सुद्धा नीट दिसत नाही.
पण, आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अश्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरात बसून डुप्लिकेट पॅनकार्डसाठी सहज ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
How To Apply Online For Duplicate Pan Card In Marathi
ज्या कोणत्याही कारणाने पॅनकार्ड हरवले किंवा खराब झाले तर, आयकर विभागाकडून डुप्लिकेट पॅनकार्ड मिळवता येते आणि ते मूळ Pancard च्या जागी वापरता येते. डुप्लिकेट पॅनकार्ड मूळ कार्ड इतके वैध असते. नवीन किंवा डुप्लिकेट पॅनकार्ड मिळविण्याची खूप सोपी प्रक्रिया आहे.
तुमचे पॅनकार्ड खराब, चोरीला किंवा हरवले तर तुम्ही डुप्लिकेटची विनंती करू शकता यामध्ये तुम्ही पत्ता, स्वाक्षरी आणि इतर तपशिलांमध्ये बदल असल्यास ते देखील तुम्ही त्याची विनंती करू शकता.
पॅनकार्डने खूप गोष्टी केल्या जातात
पॅनकार्ड हे आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. आयकर भरताना, पॉलीस घेताना, बँकेत खाते उघडताना, बँकेत व्यवहार करताना, किंवा कर्ज घेताना तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर या सर्व गोष्टी सहज करता येतील. त्याबरोबर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर अनेक महत्वाची कामे रखडू शकतात.
डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज कसा करावा
पॅन कार्डसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो – ऑनलाईन आणि ऑफलाईन
ऑनलाईन – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NSDL पोर्टल किंवा UTIITSL पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. |
ऑफलाईन – ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता खाली Dupilcate pancard फॉर्म PDF दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. |
डुप्लिकेट पॅनकार्डसाठी ऑनलाईन प्रक्रिया/पद्धत
सर्व प्रथम TIN NSDL च्या अधिकृत वेबसाईट ओपन करा |
अधिकृत पोर्टल ओपन झाल्यानंतर Reprint of PAN Card वर क्लिक करा. |
पॅन कार्ड Reprint करण्यासाठी तपशील विभागाखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. |
क्लिक केल्यानंतर Request of Reprint of PAN Card ऑनलाईन अर्जाचे पेज तुमच्या समोर उघडेल. |
येथे आवश्यक तपशील भरा. तुमच्या पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, तुमच्या पॅनकार्डशी लिंक असणाऱ्या मोबाइल नंबर आणि जन्म वर्ष इत्यादी माहिती भरणे. |
Information Declaration बॉक्समध्ये खूण करा, कॅप्चा कोड टाका आणि अर्ज सबमिट करा. |
सर्व डिटेल्स कन्फर्म करा आणि OTP करण्यासाठी एक मोड निवडा. OTP enter करा आणि ते Verify करा. |
पेमेंट पद्धत निवडा. डुप्लिकेट पॅनकार्डसाठी त्याची किंमत 50 रुपये आहे. |
तुमच्याकडे डुप्लिकेट फिजिकल पॅन कार्ड ऐवजी ई पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा पर्याय असेल. |

पॅनकार्ड वेबसाईटवरून डाउनलोड करा E-PAN card
जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल, तर पॅनकार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर ई फायलिंग वेबसाईट हि योग्य वेबसाईट आहे. खाली तुम्हाला E PAN Card लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुमची पॅनकार्ड डाउनलोड करू शकता.
स्टेप १ – सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे त्याची लिंक खाली दिली आहे . |
स्टेप २ – त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या INSANT E – PAN वर क्लिक करा. |
स्टेप ३ – आता Check Status / Download Pan च्या खाली दिलेल्या Countiue वर क्लिक करा. |
स्टेप ४ – पॅनकार्ड नंबर, जन्म महिना आणि वर्ष आणि कॅप्चा टाकून सबमिट करा. |
स्टेप ५ – आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा. नंतर खाली दिलेल्या चेक बॉक्समध्ये मार्क करा. आणि coutinue करा. |
स्टेप ६ – आता आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाइल वर OTP पाठवला जाईल. |
स्टेप ७ – आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा. |
स्टेप ८ – यानंतर पमेन्ट टॅब ओपन होईल त्यानंतर रुपये 8 रुपये 26 पैसे ऑनलाईन पेमेंट करा. (फक्त रुपये 8.26 ) |
स्टेप ९ – पेमेंट केल्यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E – PAN आणि Download E – PAN हे पर्यंत उपलब्ध असतील यामधून Download E – PAN चा पर्याय निवडा. |
स्टेप १० – नंतर Save the PDF File वर क्लीक करा. यानंतर तुमचे ई-पॅनकार्ड डाउनलोड होईल. |
तुम्हाला ई-पॅनकार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मागे जाऊन Get New E – PAN चा पर्याय निवडा लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेसे फॉलो करा. जर तुम्ही डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्ड असेल, तर त्याचा पावर्ड तुमची जन्मतारीख DD/MM/YYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.
डुप्लिकेट पॅनकार्डसाठी आणि E-PAN card अधिकृत लिंक्स
Duplicate पॅनकार्ड काढण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
E – PAN कार्ड डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||