IDBI Recruitment 2024 : पदवीधरांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा

IDBI Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे IDBI बँकेत अधिकृतपणे भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर इच्छुक उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2024 च्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. IDBI बँकेत तब्बल 50 जागांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात जारी झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया चालू झालेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी IDBI च्या अधिकृत वेबसाईटवरून आजच ऑनलाईन अर्ज सबमिट करा या भरतीसाठी एकूण 56 पदे भरली जाणार आहे. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्राना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. 01 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरवात झालेली आहे आणि 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. ज्या मित्राना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी आजच ऑनलाईन अर्ज भरावे. 

IDBI Recruitment 2024 Notifications 

IDBI बँकेने अधिकृतपणे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार IDBI बँकेत 56 पदांची रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे ज्यामध्ये 25 पदे असिस्टंट जनरल (AGM ) ग्रॅड सी आणि 31 पदे ही ग्रॅड बी साठी आहेत असे एकूण 56 जागांसाठी भरती होणार आहे IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचा आहे. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आली असल्याने सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2024 अंतिम मुदत संपण्याची आधी आपले अर्ज ऑनलाईन सबमिट करायचे आहे. 

सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज ऑनलाईन कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क/फी, अंतिम मुदत आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे. 

IDBI Recruitment 2024 Last Date 

IDBI बँकेने अधिकृत जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची मुदत खालीलप्रमाणे दिली आहे. 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक  01 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक  15 सप्टेंबर 2024

 

IDBI Recruitment 2024 रिक्त पदांची माहिती 

IDBI बँकेने खालील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 

पद Total
असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager (Grade C) मॅनेजर /Manager (Grade B)
25 31 56

 

आरक्षणानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. 

Post UR Reserved For Vacancy
SC ST OBC EWS
Assistant General Manager (AGM) Grade C 13 06 02 07 03 25
Manager- Grade B 10 03 03 07 02 31
Total 23 09 05 14 05 56

 

IDBI Recruitment 2024 वयाची अट

IDBI बँकेने खाली दिलेल्या पदानुसार वयाची अट जाहीर केलेली आहे. 

असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager (Grade C)
वयाची अट 
20 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात 

 

मॅनेजर /Manager (Grade B)
वयाची अट 
20 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात 

 

वयाची सूट 

  • SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सूट :- 5 वर्ष 
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सूट :- 3 वर्ष 
  • Ex Serviceman अँड EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची सूट :- 5 वर्ष 

ही पण भरतीची माहिती वाचा⇓

पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा.

CISF मध्ये 12 वी पास उमेदवारांना 1130 पदाची सरकारी नोकरीची संधी

IDBI Recruitment 2024 अर्ज शुल्क/फी 
अर्जदाराची श्रेणी  अर्ज शुल्क/फी 
SC /ST उमेदवार  रुपये 200 /- (GST सह)
इतर / EWS / OBC उमेदवार  रुपये 1000 /- (GST सह)

एकदा ऑनलाईन भरलेली फी परत केली जाणार नाही याची कृपया पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

IDBI Recruitment 2024 online apply अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
⇓∗नवं नवीन नोकरी अपडेटसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा∗⇓
Whatsapp ग्रुपला जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुपला जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.  

IDBI Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भरती संबधीत जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती खालीलप्रमाणे 

पदाचे नाव : असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager (Grade C)
शैक्षणिक पात्रता 
Post Graduate and degree form any University recognized by Govt. of india or its regulatory bodies Additional qualifications like JAIIB/CAIIB/MBA shall be Preferred and Experience. 

 

पदाचे नाव : मॅनेजर /Manager (Grade B)
शैक्षणिक पात्रता 
Graduation from any university recognized by Govt. of India or its regulatory bodies  Additional qualifications like JAIIB/CAIIB/MBA shall be Preferred and Experience 

 

IDBI Recruitment 2024 online apply ऑनलाईन अर्ज कसा भरायचा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IDBI च्या अधिकृत वेबसाईटवरून https://www.idbibank.in/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.


पात्र उमेदवाराकडे चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असावा भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.


IDBI ची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर New User वर क्लिक करावे नंतर Register Now या बटनावर क्लीक करणे.


IDBI बँकेचा भरतीचा अर्ज ओपन होईल त्या फॉर्ममधील संपूर्ण माहिती अचूक भरणे ही सर्व जवाबदारी उमेदवाराची असणार आहे.


पुढे स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी PDF फाईल मध्ये अपलोड करायची आहे.


पुढे स्कॅन केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.


उमेदवारांनी संपूर्ण भरलेला फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा पहा संपूर्ण माहिती पूर्ण आहे का याची खात्री करून शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा.


वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज शुल्क/फी भरू शकता ऑनलाईन फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकत नाही.



उमेदवारांनी एकदा भरलेली फी/शुल्क कोणत्याही परिस्थित परत केली जाणार नाही.


ऑनलाईन शुल्क/फी भरल्यानंतर अर्ज शुल्क पावती आणि सबमिट केलेला फॉर्म याची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


वेतनश्रेणी/पगार/मानधन 

IDBI च्या अधिसूचनेनुसार खालीलप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे. 

पदाचे नाव  मासिक वेतन 
असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager (Grade C) रुपये ८५,९२०/- ते १,०५,२८०/- 
मॅनेजर /Manager (Grade B) रुपये ६४,८२०/- ते ९३,९६०/-

 

महत्वाच्या सूचना 
  • उमेदवारांनी संबधीत पदाच्या निकषानुसार त्यांची पात्रता सुनिश्चित केल्यानंतर केवळ अधिसूचित पदांपैकी एका पदासाठी अर्ज करता येईल.
  • अर्जाची शॉर्टलिस्टिंग तात्पुरती असेल आणि ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या/घोषित केलेल्या माहितीवर आधारित असेल उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी बोलावले गेल्यास, मूळ तपशिलासह सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • अर्जाची नोंदणी प्रक्रिया फक्त तेव्हाच पूर्ण होणे जेव्हा बँकेत ऑनलाईन फी जमा केली जाईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे कि त्यांनी कट ऑफ तारखेनुसार पात्रता पूर्ण केली आहे. 
IDBI Recruitment 2024
IDBI Recruitment 2024
IDBI Recruitment 2024 निवड प्रक्रिया 
  • उपरोक्त पदासाठी निवड प्रक्रियेत उमेदवाराने अर्ज फॉर्ममध्ये घोषित केल्यानुसार वय, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव इत्यादी निर्धारित पात्रता निकषांच्या प्राथमिक तपासणीचा समावेश असेल.
  • प्राथमिक तपासणीनंतर आणि कागदपत्रांची पडताळणी न करता उमेदवारी सर्व पोस्ट तात्पुरती असेल.
  • शैक्षणिक पात्रता, वय यानुसार उमेदवाराची निवड अधिकार बँकांकडे राहील.
  • निवड प्रक्रियेचे ठिकाण, वेळ आणि तारीख शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना बँकेच्या वेबसाईटवर अधिसूचनेद्वारे आणि नोंदणीकृत ईमेल, SMS आणि कॉल लेटरद्वारे सूचित केले जाईल. 
  • पात्र उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल निवडीसाठी पात्रता गुण बँकेद्वारे निश्चित केले जातील बँकेच्या निर्णय उमेदवारांवर बंदकारक असेल.

FAQ’s

प्रश्न : IDBI Recruitment 2024 द्वारे किती पदे भरली जाणार आहे?
उत्तर : या भरतीद्वारे एकूण 56 पदांसाठी भरती

प्रश्न : IDBI Recruitment 2024 ऑनलाईन अर्जाची शेवट मुदत किती आहे?
उत्तर : दिनांक 15 सप्टेंबर 2024 अंतिम मुदत 

प्रश्न : IDBI Recruitment 2024 अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : अधिकृत वेबसाईटवरून https://www.idbibank.in/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

प्रश्न : IDBI Recruitment 2024 वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager (Grade C) वयोमर्यादा 20 ते 40 वर्ष आणि मॅनेजर /Manager (Grade B) वयोमर्यादा 20 ते 35 वर्ष

सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून नोकरीसाठी अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांना थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

IDBI Recruitment 2024 भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment