Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड या बहुराज्यीय सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को ऑप. बॅंक्स फेडेरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 20 सप्टेंबर 2024 पूर्वी भरून पाठवावेत.
मित्रांनो जर तुम्ही बँकेत नोकरीच्या आणि आर्कषक पगाराच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी जनता सहकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे सदरील भरतीसाठी राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या बँकेच्या भरतीस अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे आणि ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मदत होईल.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024
महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड या बहुराज्यीय बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. जे उमेदवारांना बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 च्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. सदर भरती ही 50 रिक्त जागांवर होणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी कायमस्वरूपाची नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
संपूर्ण राज्यभरातून ह्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे सदरील भरतीमध्ये एकूण 50 जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 20 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, अर्ज शुल्क/फी अंतिम मुदत, वयाची अट आणि इतर लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 अंतिम मुदत
भरतीच्या अधिकृत जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुदत देण्यात आलेली आहे.
अ. क्र. | तपशील | दिनांक |
1 | ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी | 06 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024 |
2 | परीक्षा शुल्क/फी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा दिनांक | 20 सप्टेंबर 2024 |
3 | परीक्षा दिनांक | 06 ऑक्टोबर 2024 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
5 | मुलाखत दिनांक | संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 रिक्त पद व वयोमर्यादा
रिक्त पद :
जनता सहकारी बँक लिमिटेड या बहुराज्यीय सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या मध्ये एकूण रिक्त जागा 50 आहेत.
वयोमर्यादा :
कनिष्ठ लिपिक या पदासाठी वयोमर्यादा दिनांक 06 सप्टेंबर 2024 रोजी किमान 22 वर्ष ते कमाल 38 वर्ष
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 परीक्षा शुल्क/फी व भाषेचे ज्ञान
परीक्षा शुल्क /फी
- ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी रुपये 800 /- अधिक 18 % GST असे एकूण 944 रु. परीक्षा फी
- एकदा ऑनलाईन भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांना अर्ज भरताना किंवा ऑनलाईन पेमंट करताना काही अडचणी आल्यास संकेत स्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्प लाईन वर संपर्क करावे.
भाषेचे ज्ञान
- मराठी / इंग्रजी/ हिंदी लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक |
शैक्षणिक पात्रता |
कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / गर्दुलेशन.
MS – CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. दिनांक 06 सप्टेंबर 2024 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील . |
प्राध्यान :
- M.Com. / BE Computer / IT / MCA / MBA (Banking & Finance or (Finance) / JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/ कायदेविषयक पदविका तत्सम इत्यादी.
- बँका / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राध्यान
- उमेदवार शक्योतो बँकेच्या कार्यक्षेत्रातील असावा.
ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓
39,481 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल आणि शिपाईसाठी मेगा भरती संपूर्ण माहिती
IDBI Recruitment 2024 : पदवीधरांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 apply online अर्ज लिंक व जाहिरात
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नवं नवीन अपडेटसाठी खाली दिलेले ग्रुप जॉईन करा | |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत https://mucbf.in/exam-120 वेबसाईटवरून अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे. सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेत स्थळावर वेळोवेळी भरती संदर्भातील माहिती कळविली जाईल.
उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता व निकष पूर्ण केल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील.
उमेदवारांनी ऑफलाईन परीक्षा व कागदपत्र पडताळणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागले.
परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना संकेत स्थळावर कळविण्यात येईल.
संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरल्यानंतर ऑनलाईन फी भरणे आवश्यक आहे फी भरल्याशिवाय अर्ज सबमिट केला जाऊ शकत नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 निवड प्रक्रिया
- ऑफलाईन परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- मुलाखत
- उमेदवाराची अंतिम निवड सूची
ऑफलाईन परीक्षा |
कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नाची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नामध्ये संखयात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नाचा समावेश असेल. 100 पैकी प्राप्त गुणाचे 75 च्या गुणोत्तरमध्ये रूपांतर करण्यात येईल. |
कागदपत्रे पडताळणी |
उमेदवारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबधीत मूळ प्रमाणपत्रकांची आणि कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. प्राथमिक कागद्पत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल. |
मुलाखत |
कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुणक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलखाकरिता 25 गुण राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास उमेदवार अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. |
उमेदवाराची अंतिम निवड सूची |
उमेदवाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण याची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. |
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- MSCIT सर्टिफिकेट
- शैक्षणिक कागदपत्रे
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
- आधार कार्ड /पॅन कार्ड
- इतर शैक्षणिक कागदपत्रे

टीप : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
FAQ’s
प्रश्न : जनता सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किती मुदत आहे?
उत्तर : 20 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत आहे.
प्रश्न : जनता सहकारी बँक भरतीसाठी कोणती रिक्त पद आहे?
उत्तर : कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती आहे.
प्रश्न : भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : जनता सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
प्रश्न : जनता सहकारी बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : अधिकृत https://mucbf.in/exam-120 वेबसाईटवरून अर्ज भरायचा आहे.
सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांना थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आमच्या Whatsapp आणि telegram ग्रुपला जॉईन करा.
Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 भरती संदर्भातील काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||