Lek Ladki Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार तर्फे महाराष्ट्रात प्रत्येक मुलींना 1 लाख रुपये मिळणारी “लेक लाडकी योजना” जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारकाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” Lek Ladki Yojana सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा हि विनंती.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, मुलींना शिक्षणात आर्थिक मदतीसाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी तसेच शाळा बाह्य असणाऱ्या मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी “लेक लाडकी योजना” शासनाने सुरु केलेली आहे. योजनेची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा.
Lek Ladki Yojana 2024 Information योजनेची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांतील मुलींसाठी प्रभावशाली योजना घेऊन आलेली आहे राज्य शासनाने सुरु केलेली लेक लाडकी योजना अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना टप्याटप्यामध्ये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थी मुलींना 1,01,000/- रुपये एवढी रक्कम देण्यात येईल.
लाभार्थी मुलींना ह्या योजनेतील रक्कम टप्याटप्याने देण्यात येणार आहे त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर ते मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम देण्यात येणार आहे. या लेखात आपण योजनेची उदीष्टे, योजनेसाठी कोण पात्र आहे, आवश्यक कागदपत्रे, योजनेचे फायदे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा, योजनेचा लाभ, योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Lek Ladki Yojana 2024 सादर योजनेचा उद्देश /उदीष्टे
सदर योजनेचा उद्देशाची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
| १. मुलीच्या जन्मास प्रोत्सहन देऊन मुलींचा जन्मदार वाढविणे | 
| २. मुलीच्या शिक्षणास चालना देणे | 
| ३. मुलीच्या मृत्युदर कमी करणे व बालविहाह रोखणे. | 
| ४. कुपोषण कमी करणे. | 
| ५. शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्सहीत करणे. | 
नोंद : लाभार्थीनी खाली दिलेली महाराष्ट्र शासन GR PDF पूर्णपणे वाचून या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि ही माहिती जवळच्या लोकांना नक्की शेअर करा.
Lek Ladki Yojana 2024 टप्याटप्यामध्ये मिळणारी रक्कम
लेक लाडकी योजनेची रक्कम पाच टप्यामध्ये रक्कम खालीलप्रमाणे मिळणार आहे.
| 1 | मुलगी जन्मानंतर | रुपये 5000 /- | 
| 2 | जेव्हा मुलगी पहिली मध्ये गेल्यानंतर | रुपये 6000 /- | 
| 3 | जेव्हा मुलगी सहावीमध्ये गेल्यानंतर | रुपये 7000 /- | 
| 4 | जेव्हा मुलगी अकरावीमध्ये गेल्यानंतर | रुपये 8000 /- | 
| 5 | जेव्हा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर | रुपये 75000 /- | 
Lek Ladki Yojana 2024 कोणाला योजनेचा लाभ मिळेल/पात्रता/अटी/शर्ती
| लाभार्थी कुटुंब हे मूळ महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक राहील, बाहेरील राज्यातील कुटुंब अपात्र असतील | 
| या योजनेसाठी कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी शिधाधारक (रेशन कार्ड) असणे आवश्यक आहे. | 
| कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरासरी 1 लाखापेक्षा जास्त नसावे. | 
| ही योजना 01 एप्रिल 2023 रोजी किंवा या तारखेनंतर जन्मला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. | 
| पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपात्र सादर करणे अनिवार्य राहील. | 
| तसेच एक मुलगी व एक मुलगा असेल तर ही योजना मुलीला लागू राहील. | 
| दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जन्माला आलेली अपत्ये (बाळ) ही जुळी असली तर दोन्ही मुली पात्र होतील किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर मुलगी पात्र होईल. | 
| लाभार्थी कुटुंबाकडे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. | 
Lek Ladki Yojana 2024 महाराष्ट्र शासन GR व अर्ज करण्याचा फॉर्म
| योजनेचा महाराष्ट्र शासन GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ | 
| लेक लाडकी योजना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ | 
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ | 
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ | 
नोंद : लाभार्थीनी वर दिलेली महाराष्ट्र शासन GR PDF पूर्णपणे वाचून या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि ही माहिती जवळच्या लोकांना नक्की शेअर करा.
Lek Ladki Yojana 2024 Documents योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
| ⇓अर्जासोबत जोडायची कागदपत्रे ⇓ | 
| लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला | 
| कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबतचा यांचा दाखला | 
| लाभार्थीचे आधार कार्ड झेरॉक्स (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील) | 
| पालकाचे आधार कार्ड झेरॉक्स | 
| बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स | 
| रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स) | 
| मतदान ओळखपत्र झेरॉक्स (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे) | 
| शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied) | 
| अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र | 
Lek Ladki Yojana 2024 Registrations अर्ज कसा करायचा आहे
लाभ घेण्यासाठी संबधीत कुटुंबाने ग्रामीण अथवा शहरी क्षेत्रातील मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे वर दिलेल्या फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करावा.
वर दिलेल्या लेक लाडकी योजना अर्जाचा PDF फॉर्म डाउनलोड करून घेणे.
डाउनलोड केलेला फॉर्ममध्ये वैयत्तिक माहिती, पूर्ण पत्ता, मोबाइल क्रमांक, मुलींची माहिती, बँकेची माहिती, ठिकाण टाकून सही करणे.
सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून, अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे जमा करून पोहोच पावती घेणे.
मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांची भरती अर्ज करण्यासाठी शेवटचे दिवस आजच ऑनलाईन अर्ज करा.
Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजनेचे लाभ/फायदे
योजनेचे लाभ
लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील पिवळे व केशरी रेशन कार्ड अशा कुटुंबाना मिळणार आहे.
योजेनेमार्फत मुलींना जन्मापासून ते त्याच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईलपर्यंत त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन असे एकुण १,१०,०००/- रुपयाची आर्थिक मदत देण्यात येईल.
या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे यामध्ये शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत आर्थिक सहायतेमुळे मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नोकरी मिळवता येईल.
महाराष्ट्र रहिवासी असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा फायदा मिळणार आहे.
01 एप्रिल 2024 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
या योजनेचा मुख्य फायदा असा आहे कि, योजनेमुळे मुलीचे शैक्षणिक भविष्य सुधारेल.

लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती
| ⇓ लेक लाडकी योजना थोडक्यात माहिती ⇓ | |
| योजनेचे नाव | लेक लाडकी योजना | 
| घोषणा | महाराष्ट्र सरकार बाल व विकास महामंडळ | 
| लाभार्थी | गरीब कुटुंब | 
| एकूण रक्कम | 1,01,000/- | 
| कोणाला लाभ मिळणार | पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना | 
| राज्य | महाराष्ट्र | 
| अर्ज प्रक्रिया | अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म जमा करणे | 
FAQ’s सतत विचारलेले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे
प्रश्न : लेक लाडकी योजना काय आहे?
उत्तर : महाराष्ट्र सरकार तर्फे महाराष्ट्रात प्रत्येक मुलींना 1 लाख रुपये मिळणारी “लेक लाडकी योजना” आहे
प्रश्न : लेक लाडकी योजना लाभ कोणाला मिळणार आहे?
उत्तर : पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे.
प्रश्न : योजनेचा अर्ज कुठे कसा करायचा आहे?
उत्तर : फॉर्म ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म जमा करायचा आहे. 
प्रश्न : लेक लाडकी योजनेत किती अर्थसहाय्य मिळते?
उत्तर : एकूण रक्कम : 1,01,000/- रुपये
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
