Mahanirmiti Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रात 0800 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध तंत्रज्ञ ३ (Technician-3) ITI ट्रेड मध्ये असल्यास तुमच्यासाठीमहाराष्ट्र राज्य वीज निर्मितीमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि 31 जानेवारी 2025 अंतिम मुदत आहे, उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
महाराष्ट्र सरकारद्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत तब्बल 0800 रिक्त पदांची भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विषयी बोलायचे झाले तर 10 वी आणि ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरतील. मित्रांनो भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Mahanirmiti Recruitment 2024
Mahanirmiti Recruitment 2024 Notification
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 (Technician-3) पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online ) पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्यूत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 0800 रिक्त पदे भरणार आहेत. Mahanirmiti Recruitment 2024
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahanirmiti Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती नाव : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती 2024 | Mahanirmiti Technician Bharti 2024
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड विभागमध्ये “तंत्रज्ञ ३” (Technician-3) या पदासाठी सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत हि भरती केली जाणार आहे.
भरतीचा कालावधी : कायमस्वरूपाची सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीसाठी “तंत्रज्ञ ३” (Technician-3) या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 0800
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज सुरु झाले आहे, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष पर्यंत असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
Mahanirmiti Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 500 /- रुपये आणि मागास/राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 300 /- रुपये.
वेतनश्रेणी/पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 34,555 ते 86,865 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त ITI NCTVT/SCVT प्रशिक्षण संस्थेतुन इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) यापैकी कोणत्याही ट्रेड मध्ये उत्तीर्ण आवश्यक
Mahanirmiti Recruitment 2024 Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
How to Apply Mahanirmiti Recruitment 2024
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही.
ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Mahanirmiti Recruitment 2024