मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना आता 03 गॅस सिलेंडर मोफत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती | Mukhyamantri Annapurna Yojana

Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजेजेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्याना तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 03 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” या नावाने राबविण्यात येईल. सरकारने योजने अंतर्गत गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोंकाना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांचा समावेश “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” योजनेमध्ये केला आहे. या योजनेसाठी एका कुटुंबातील एक लाभार्थी पात्र असणार आहे. 

Mukhyamantri Annapurna Yojana

महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील गरीब , आर्थिक दृष्टया दुर्बल आणि EWS घटकातील लोंकांसाठी नवीन “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” आणली आहे या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षातून 03 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्याना तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला गॅस सिलेंडर खरेदीवर अनुदान मिळण्यास पात्र असणार आहे. 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत येणारी सबसिडी केंद्र सरकाकडून 300 रुपये आणि राज्य सरकारकडून 530 रुपये असे एकूण 830 रुपये उज्ज्वल लाभार्त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते. तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम म्हणजे 830 रुपये सबसिडी जमा होणार आहे. 

Mukhyamantri Annapurna Yojana अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थाचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थाचे कुटुंबातील केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे (रेशन कार्डनुसार पात्र असणार आहे)

सदर लाभ केवळ १४.०२ कि. ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदान सबसिडी मिळणार आहे.

सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. 

सद्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजेने अंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे. 

Mukhyamantri Annapurna Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येणार आहे. 

सादर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एका पेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे लाभार्थीना एका वर्षात 03 सिलेंडर मोफत मिळणार आहे. या सिलेंडरची पूर्ण रक्कम लाभार्थच्या बँक खात्यात सबसिडी म्हणून जमा होणार आहे. 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र असणाऱ्या प्रत्येक लाभार्थाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे पण त्यासाठी सदर गॅस जोडणी लाभार्थ्यच्या नावे असणे आवश्यक आहे. 

तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपनी संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करतील. 

Mukhyamantri Annapurna Yojana अन्नपूर्ण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 
  • आधार कार्ड 
  • बँक खाते (आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्मची पोचपावती (पावती नसेल तरी चालेल पण लाडकी बहीण योजेनचे लाभार्थी असावे.)
  • रेशन कार्ड 
  • आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाइल क्रमांक
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

अन्नपूर्णा योजनेसाठी “पंतप्रधान उज्ज्वला योजना” आणि “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजने मधील पात्र महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला असल्याने सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनेच्या लाभार्थाना कोणताही अतिरिक अर्ज करण्याची गरज नाही.

अन्नपूर्णा योजनेसाठी “पंतप्रधान उज्ज्वला योजना” आणि “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मध्ये पात्र/लाभार्थी नसतील अशा महिलांनी पुढील पद्धतीने “पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 

“पंतप्रधान उज्ज्वला योजना”  या योजनेसाठी केवळ महिलाच पात्र असतील तसेच त्यांचे वय 18 पूर्ण झालेले असावे.

अर्जदार SC , ST आणि EWS प्रवर्गातील सदस्य या योजनेसाठी पात्र असतील.

हि योजना आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.

कुटुंबातील कोणच्या नावे गॅस नसावे तसेच अर्ज करणाऱ्या महिलांकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
सरकारी निर्णय पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

अर्जदारांनी वर दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लीक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

योजनेसाठी आधार कार्डला मोबाइल नंबर आणि बॅंकचे खाते लिंक असणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या सर्व कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करणे आवश्यक आहे लागणारी कागदपत्रे खाली देण्यात आलेली आहे.

संपूर्ण माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर फॉर्म परत तपासून सबमिट करायचा आहे.

मोफत सिलेंडरसाठी योजनेसाठी पात्र झाल्यानंतर मोबाईलवर एक SMS येतो तो SMS अधिकृत सिलेंडर विक्रतेला दाखवा.

“पंतप्रधान उज्ज्वला योजना” आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड 
  • पत्त्याचा पुरावा
  • कौटुंबिक आयडी पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाता क्रमांक
  • महिला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
महत्वाची सूचना/टीप 

अन्नपूर्णा योजनेसाठी “पंतप्रधान उज्ज्वला योजना” आणि “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजने मधील पात्र महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला असल्याने सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनेच्या लाभार्थाना कोणताही अतिरिक अर्ज करण्याची गरज नाही.

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे 

प्रश्न : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आणि कोणत्या राज्यासाठी आहे?
उत्तर : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र लाभार्थला वर्षातून 03 गॅस मोफत मिळणार आहे आणि हि योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहे.

प्रश्न : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कुठे अर्ज करायचा आहे.
उत्तर : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजने मधील पात्र महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार असल्याने या योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे.

प्रश्न : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभ कसा मिळणार आहे?
उत्तर : 03 गॅस मोफत मिळणार याचे सबसिडी/पैसे थेट लाभार्थिच्या खात्यावर जमा होणार आहे. 

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना आता 03 गॅस सिलेंडर मोफत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण माहिती | Mukhyamantri Annapurna Yojana”

Leave a Comment