बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : तुम्ही सरकारी नोकरी शोधात आहात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट -क मधील “निरीक्षक” या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 178 रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरायची आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची कायमस्वरूपाची नोकरी शोधात असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. महानगरपालिकेतच्या संकेत स्थळावर भरतीची जाहिरात अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 19 ऑक्टोबर 2024 तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. सरकारी भरतीच्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना कायमस्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. महानगरपालकेची भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्राना नक्की शेअर करा.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notifications 

मित्रांनो सरकारी आणि कायमस्वरूपाची नोकरी हवी असल्यास आजच ऑनलाईन पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसाठी आजच ऑनलाईन अर्ज करा. भरतीच्या जाहिरातीनुसार एकूण 178 भरावयाच्या रिक्त पदांची संख्या आहे. निरीक्षक या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी पात्र उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. “निरीक्षक” संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, जे अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / निकष / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, अंतिम मुदत, वयोमर्यादा, PDF जाहिरात, अर्ज भरण्यासाठी लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 अर्जाची मुदत, पदाचे नाव व पदसंख्या 

उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 01 महिन्याचा कालावधी उपलब्ध असेल. 

महत्वाच्या तारखा 
तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क/फी भरण्यासाठी सुरु होण्याचा दिनांक  20 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक  19 ऑक्टोबर 2024

 

पदाचे नाव : करनिर्धारण व संकलन विभागात “निरीक्षक” 

पदसंख्या : एकूण भरायची रिक्त पद 178 पदसंख्या 

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

“निरीक्षक” या पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

आवश्यक वयोमर्यादा 
श्रेणी  वयोमर्यादा 
राखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता  किमान वय 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष 
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता  किमान वय 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष 
दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता  किमान वय 18 वर्ष ते कमाल 45 वर्ष 
माजी सैनिक उमेदवार  45 वर्ष 
प्रकल्पग्रस्त उमेदवार  18 वर्ष ते 45 वर्ष 
भूकंपग्रस्त उमेदवार  18 वर्ष ते 45 वर्ष 
खेळाडू उमेदवार  18 वर्ष ते 43 वर्ष 
अनाथ उमेदवार  18 वर्ष ते 43 वर्ष 
स्वातंत्र्य सैनिक उमेदवार  18 वर्ष ते 45 वर्ष 
अंशकालीन पदवीधर (सुशिक्षित बेरोजगार उमेदवार) 18 वर्ष ते 55 वर्ष 

 

ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी
ऑनलाईन परीक्षा शुल्क/फी खालीलप्रमाणे आकारले जाईल.

  • राखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता  :- रुपये 1000 /- (GST सह)
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता :- रुपये 900 /- (GST सह)
  • अनाथ उमेदवारांकरिता :- रुपये 900 /- (GST सह)

ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत 10 वी, ITI आणि पदवीधर तरुणांना नोकरीची संधी जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर बँकेत 700 क्लेरिकल (क्लार्क) जागांसाठी भरती आजच ऑनलाईन अर्ज करा .

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव :- “निरीक्षक”
शैक्षणिक पात्रता 
उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा (ग्रॅज्युट)
उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे प्रमाण पत्र असावे. (टायपिंग सर्टिफिकेट)
MSCIT प्रमाणपत्र/सर्टिफिकेट (जर आता प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षाच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)

 

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात 
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 online apply अर्ज कसा करायचा 

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरूनच म्हणजे वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज https://portal.mcgm.gov.in/for prospects/careers-All/Recruitment
/Assessment & Collection या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून निकष, पात्रता आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मगच ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर मेल आयडी चालू राहणे आवश्यक आहे. 

ऑनलाईन लिंक ओपन केल्यानंतनार वैयक्तिक संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि इतर सविस्तर माहिती भरायची आहे. 

पुढे पात्र उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर, ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. 

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास पुढीलप्रमाणे कॉल सेंटर फोन नंबर +919513167443 संपर्क साधावा. ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. 

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 निवड प्रक्रिया 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील करनिर्धारण व संकलन खात्यात “निरीक्षक” या पदासाठी पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा, संगणकावर घेण्यात येईल.

सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल. 

निरीक्षक” पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या सामान राहील. 

परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (इ 12 वी) दर्जाच्या सामान राहील.

सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे दिले आहे.

अ. क्र. परीक्षेचा विषय  एकूण प्रश्न  एकूण गुण  परीक्षेचे माध्यम  कालावधी 
1 मराठी भाषा व्याकरण  10 20 मराठी  120 मिनिटे 
2 इंग्रजी भाषा व्याकरण  10 20 इंग्रजी 
3 सामान्य ज्ञान  15 30 मराठी/इंग्रजी 
4 अंकगणित  15 30 मराठी/इंग्रजी 
5 मुं. म. न.पा. अधिनियम 1888 50 100 मराठी/इंग्रजी 
एकूण  100 200

 

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 वेतनश्रेणी/पगार/मानधन 
  • पदाचे नाव : “निरीक्षक”
  • वेतनश्रेणी (सुधारित) : स्तर – M 17 रुपये – 29,200/- ते 92,300/-
  • गट : ‘क’
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड /पॅन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • MSCIT प्रमाणपत्र 
  • टायपिंग प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जन्म दाखला (आवश्यक असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे 
  • संबधीत अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

FAQ’s

प्रश्न : मुंबई महानगरपालिका भरती 2024 किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?
उत्तर : मुंबई महानगरपालिकेत एकूण 178 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

प्रश्न : मुंबई महानगरपालिका भरती कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
उत्तर : करनिर्धारण व संकलन खात्यात “निरीक्षक” या पदासाठी.

प्रश्न : मुंबई महानगरपालिका भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर : कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेचा पदवीधर 

प्रश्न : मुंबई महानगरपालिका भरती अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वरील लेखात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे.  

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024”

Leave a Comment