NICL Assistant Recruitment 2024 In Marathi : मित्रांनो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर असल्यास तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहायक पदांची भरती केली जणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होत आहे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. सदर भरती ही सहायक पदासाठी एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
NICL Assistant Recruitment 2024 In Marathi
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहायक (Assistant) पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सदरील भरतीमध्ये सरकारी मालकीच्या विमा कंपनीमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज भरता येईल. अधिकृत भरतीची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
पदाचे नाव | पदसंख्या |
सहायक (Assistant) | एकूण रिक्त जागा 500 |
अर्ज सादर करण्याची मुदत/कालावधी :
तपशील | दिनांक |
पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होते | 24 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाइन नोंदणीसाठी शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2024 |
अर्ज फी भरणे | 24 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 (दोन्ही दिवस समावेश) |
ऑनलाइन परीक्षेची तारीख – पहिला टप्पा | 30 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाइन परीक्षेची तारीख – दुसरा टप्पा | 28 डिसेंबर 2024 |
परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड | संकेत स्थळावर प्रसिद्ध केले जाईल. |
NICL सहायक भरतीसाठी वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी
वयोमर्यादा |
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे. |
ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट |
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
PwBD उमेदवारांना 10 वर्षाची सूट |
Ex – Serviceman उमेदवारांना 15 वर्षाची सूट |
अर्ज शुल्क/फी |
SC/ST/Exs/PwBD प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क – 100 /- रुपये |
सामान्य/खुला प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क – 850 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार : दरमहा 39 हजार रुपये |
NICL सहायक पदासाठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : सहायक (Assistant) |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी |
NICL Assistant Recruitment 2024 Online Apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

NICL सहायक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड https://nationalinsurance.nic.co.in/recruitment/ वर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
वेबसाईटवर ज्या उमेदवारांना अर्ज नोंदणी करण्यापूर्वी किंवा सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी, पर्यायी ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर, पर्यायी मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत खुली असेल. उमेदवारांना https://nationalinsurance.nic.co.in/ च्या CAREER विभागात वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. वय, पात्रता अनुभव इ. सर्व माहिती ऑनलाईन वेबसायटमध्ये दिली आहे.
अर्जातील इतर तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा. कृपया ईमेल/ पर्यायी ईमेल आयडी फिल्ड करताना काळजी घ्या कारण नंतरची सर्व माहिती उमेदवारांना ईमेल मार्फत मिळणार आहे.
पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पेजच्या शेवटी खाली असणाऱ्या सबमिट बटनावर क्लीक करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा. जर अर्ज स्वीकारला तर एक युनिक नंबर तयार करेल जो पूर्ण तयार केलेल्या अर्जामध्ये दिसून येईल तो नोंदणी क्रमांक जपून ठेवावा.
पूर्ण भरलेल्या अर्जची कोणतेही हार्ड कॉपी पोस्टने कोणत्याही पत्त्यावर पाठवायची नाही.
उमेदवारांनी त्याच्या जन्म प्रमाणात किंवा दहावीच्या मार्कशीटवर नमूद केल्यानुसार त्यांचे नाव आणि जन्मतारीख अचूकपणे टाकणे आवश्यक आहे.
उमेदवाराने शैक्षणिक माहिती ही प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे योग्यरीत्या तपशीलवार भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि ती भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.
NICL सहायक भरतीसाठी निवड प्रक्रिया
- पूर्वपरीक्षा
- मुख्य परीक्षा
- प्रादेशिक भाषा परीक्षा
NICL भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधारकार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास )
- PwBD सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास )
- अनुभव असल्यास एक्सपेरिअन्स लेटर
- अर्जदाराचा चालू मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमीलेअर (आवश्यक असल्यास )
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आपल्याला ग्रुपला जॉईन करा.
वरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजूना ही माहिती नक्की शेअर करा. जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि आजच आपल्याला Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.