एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी, काय आहे one nation one election जाणून घ्या संपूर्ण माहिती | One Nation One Election In Marathi

One Nation One Election In Marathi दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन च्या विधेयकाला आज मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. देशाच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणूकी चे विधेयक आणण्याबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक देश एक निवडणुकीबाबतचा अहवाल तयार केला होता. याबाबत आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या विधेयकाला मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

One Nation One Election In Marathi

देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू होणार आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यामुळे एकत्रित होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होतील. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये रामनाथ कोविंद यांचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला आहे. 

याविषयी संपूर्ण माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले कि, एका टप्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्यात निवडणुकीनंतर 100 दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद या सह इतर निवडणुका होतील. One Nation One Election In Marathi

काय आहे One Nation One Election 

“एक देश, एक निवडणूक” याचा सरळ असा अर्थ देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेणे असा आहे. देशातील नागरिकांनी या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल. दोन वेगवेगळे मतदान घेतले जाईल. म्हणजे नागरिकांना दोनदा मतदान करायचे आहे. सध्या देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी दार पाच वर्षांनी घेतल्या जातात. 

एक देश, एक निवडणुकांचे फायदे 

एक देश, एक निवडणूक’ झाल्यास सगळयात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च खूप कमी होईल.
रिपोर्ट नुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटी खर्च करण्यात आले होते. यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्च समावेश आहे.
एक देश, एक निवडणूक मुळे मतदानाचा टक्का वाढेल कारण, लोकांना एकाच वेळी मतदान करणे सोयीचे जाईल.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकांचा फायदा होईल.
प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही.
सरकारी तिजोरीवरील भार कमी होण्यास मदत होईल 
वारंवार समोर येणार संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल. One Nation One Election In Marathi

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ केंद्र सरकारची लाडक्या बहिणीसाठी नवीन बिमा सखी योजना, महिन्याला 7 हजार मिळणार, काय आहे नवीन योजना?

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही किंवा काही अडचण असल्यास तक्रार करा, हेल्पलाईन नंबर जारी

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी निर्णय ; जुनं पॅनकार्ड जाणार आणि नवीन QR कोड पॅनकार्ड येणार, फ्रीमध्ये प्रत्येकाला मिळणार, असा करा अर्ज

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी अपार कार्ड काय आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, अपार कार्डची नोंदणी, फायदे व माहिती जाणून घ्या.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती मिळविणासाठी आणि नवं नवीन माहिती अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. One Nation One Election In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment