Pan Card 2.0 Yojana In Marathi केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर 2024 रोजी “पॅन 2” PAN 2.0 कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या नव्या पॅन कार्डमध्ये QR कोड आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “पॅन 2” PAN 2.0 कार्डचे डिजिटलीकरण भारतीय व्यवसायांसाठी सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हे नवीन पॅन कार्ड नवा डिजिटल रूप घेईल, त्यात सुधारित सुरक्षा वैशिष्ट्ये असतील, आणि ते अधिक वापरकर्ता-अनुकूल होईल. या निर्णयाचा उद्देश आहे. भारतीय आर्थिक प्रणालीला अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनविणे. चला तर, पॅन 2 बद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया.
Pan Card 2.0 Yojana In Marathi
देशातील 78 कोटी नागरिकांचे PAN कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. 1972 पासून वापरात असलेले तुमचे PAN कार्ड आता बदलाच्या वाटेवर आहे. मोदी सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक (PAN) कार्ड बदलावे लागणार आहे. Pan Card 2.0 Yojana In Marathi
करदात्यांना गोष्टी सोप्या हव्यात यासाठी पॅनकार्ड बदलाचा मुख्य हेतू आहे. या नवीन पॅनकार्ड बद्दल माहिती अशी आहे कि, यामध्ये तुमच्या पॅनकार्ड नंबर बदल जाणार नाही. या संदर्भात सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
What is pan card 2.0 | नवीन पॅन कार्ड 2 कसे आहे
केंद्रीय मंत्रालय यांनी सांगिल्याप्रमाणे, PAN कार्डची नवीन एडिशन केवळ नवीन वैशिट्यानुसार सुसज्ज असणार आहे, तर आपला PAN क्रमांक तसेच राहील. या कार्डवर एक QR कोड दिला जाणार आहे. यामध्ये तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे. Pan Card 2.0 Yojana In Marathi
सरकारने नवीन पॅन 2 मध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित तंत्रज्ञान लागू केले आहे. |
पॅन 2 पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. |
नवीन पॅन 2 मध्ये OR कोडचा समावेश केला जाणार आहे. |
OR कोडद्वारे, पॅन धारकाची ओळख ऑनलाईन सुरक्षितपणे पडताळता येईल. |
पॅन 2 मध्ये जुन्या पॅन कार्डच्या काही समस्यांचा निपटारा केला आहे. |
प्रत्येकाचा PAN नंबर एकच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या PAN कार्डच्या माध्यमातून करत राहा. |
नवीन पॅन कार्ड 2.0 मध्ये नवीन काय आहे?
QR कोड : PAN 2 मध्ये QR कोड असणार आहे. सदर कोडमध्ये पॅन धारकाचे नाव, पॅन नंबर, आणि इतर माहिती सुरक्षितपणे एन्क्रिप्टेड स्वरूपात लपवली जाईल. QR स्कॅन केल्यानंतर, तुम्ही पॅन धारकाची ओळख सहजपणे पडताळू शकता आणि इनकम टॅक्स संबंधित प्रक्रिया जलद गतीने केली जाऊ शकते. |
आधार कार्ड लिंकिंग : पॅन 2 तुमच्या आधार कार्डाशी लिंक केले जाईल, ज्यामुळे आयकर रिटर्न आणि इन्कम टॅक्स पेअर्सच्या डेटाचे व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. आधार-पॅन लिंकिंग केल्याने आयकर विभागाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अधिक अचूक मागोवा घेता येईल |
डिजिटलायझेशन : PAN 2 पूर्णपणे डिजिटल स्वरूपात येणार आहे . यामुळे कागदी पॅन कार्ड गहाळ होण्याची समस्या संपुष्ठात येईल. PAN 2 डिजिटल असल्यामुळे ते सहजपणे शेअर करता येणार आहे. |
नवीन आणि सुरक्षित टेक्नोलॉजी : पॅन 2 मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होईल. त्यामुळं, सुरक्षेचे डिग्री वाढवून त्यात अधिक कार्यक्षमतेची जोड दिली जाईल. या तंत्रज्ञानाचा वापर वापरकर्ता ओळख अधिक सुरक्षित आणि झपाट्याने पडताळण्यास मदत करेल. |
pan card 2.0 Apply | नवीन पॅन 2 कसे मिळवता येईल
तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन PAN 2 साठी अर्ज करण्याची कोणतेही आवश्यता नाही. |
तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड पॅन लिंक केले असल्यास तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या पत्त्यावर नवीन PAN 2 कार्ड येणार आहे. |
नवीन PAN 2 कार्डसाठी कोणतेही शुल्क नाही. |
नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे खर्च करण्याची हि गरज नाही. सरकार नवीन PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल. |
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : पॅन २.० योजना काय आहे?
उत्तर : या नव्या पॅन कार्डमध्ये QR कोड आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रश्न : पॅन २.० कार्ड कसे बनवू शकतो?
उत्तर : तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तर तुम्हाला नवीन PAN 2 साठी अर्ज करण्याची कोणतेही आवश्यता नाही. नवीन PAN 2 तुमच्या पत्त्यावर पाठविले जाणार आहे.
प्रश्न : पॅन 2 साठी किती खर्च आहे?
उत्तर : नवीन PAN 2 कार्डसाठी कोणतेही शुल्क नाही.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Pan Card 2.0 Yojana In Marathi