प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PM Matru Vandana Yojana In Marathi

PM Matru Vandana Yojana In Marathi प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्रीय आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात येणार आहे या योजने अंतर्गत देशातील गरोदर महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना  योजनेंतर्गत शासनाने अंगणवाडी सेविकेकडे केलेल्या किंवा कुठल्याही शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेने नोंदणी केल्यास पहिल्या अपत्या पर्यंत त्या महिलेला ५ हजार रुपये इतकी रक्कम मदत म्हणून देण्यात येईल. पात्र गर्भवती महिलेला 3 टप्प्यामध्ये हे पैसे DBT द्वारे महिलेच्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट च्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर योजनेमुळे गर्भवती महिलांचे पोषण भरण व्यवस्थित होण्यास मदत होईल.गर्भवती महिलेचे पोषण चांगले झाल्या कारणाने होणार्या बाळाचे देखील पोषण चांगले होईल आणि होणारे बाळ हे तंदुरुस्त असेल. या योजनेमुळे कुपोषित म्हणून जन्माला येणाऱ्या बाळांचे प्रमाण आटोक्यात येईलच शिवाय गर्भवती महिलांचे पोषण चांगले न झाल्यामुळे होणार्या मातामृत्यू चे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल.

PM Matru Vandana Yojana In Marathi

PM MATRU VANDANA YOJANA | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 ची संपूर्ण माहिती आणि त्याचे फायदे या लेख मध्ये जाणून घेऊयात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 हि योजना केंद्र सरकार ने गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने चालू केली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 हि योजना त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांना गर्भवती असताना देखील आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मजुरी साठी जावे लागते.

PM Matru Vandana Yojana Maharashtra उद्देश

  • आई आणि बाळाचे आरोग्य सुधारून आई आणि बाळाचा मृत्यू दर कमी करणे. 
  • या योजनेमुळे गर्भवती महिलांचे पोषण भरण व्यवस्थित होण्यास मदत होईल.

सदरील योजनेतून मिळणार लाभ :

  • गर्भधारणेच्या नोंदणीच्या वेळी १००० रुपये
  • गर्भधारणेच्या ६ महिन्यांपर्यंत १ दा प्रसूतीपूर्व तपासणी केली तर २००० रुपये
  • प्रसुतीनंतर जन्मनोंदणी झाल्यावर २००० रुपये
  • एकूण 5000 रुपये मिळणार आहे. 
  • दुसरे बाळ मुलगी असल्यास एकत्रित 6 हजार /- रु एवढा लाभ मिळेल.

PM Matru Vandana Yojana In Marathi | योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • लाभार्थी पासपोर्ट फोटो 
  • रेशन कार्ड (असल्यास)
  • आधार कार्ड – बँक खात्याला जोडलेले असावे. 
  • पतीचे आधार कार्ड 
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • पॅनकार्ड 

अर्ज करण्यासाठी : 18 ते 55 वर्ष पर्यंत वय असणे गरजेचे आहे. 

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Bonus : सरकार स्थापनेनंतर लाडक्या बहिणींना यादिवशी मिळणार 2100 रुपये, नवीन अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Matru Vandana Yojana | योजनेसाठी अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचा अर्ज हा OFFLINE पद्धतीने करावयाचा आहे. ज्या गर्भवती महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या महिलेने जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करावा.

जर वेळोवेळी केलेले अर्ज अचूक भरलेले असतील व आवश्यक त्या कागदपत्र सोबत जोडले गेले असतील तर संबंधित अधिकारी अर्जदाराचे रक्कम जाहीर करतील व ती रक्कम अर्जदार महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

नमूद केलेले रक्कम हि DBT द्वारा लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

PM Matru Vandana Yojana Online Form
  • अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र 
  • महिला व बाल विकास विभाग अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. वेबसाईट : https://wcd.gov.in/
PM Matru Vandana Yojana In Marathi
PM Matru Vandana Yojana In Marathi
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

कोठे कराल संपर्क?

आपल्या कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था येथे करावा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment