PM विद्यालक्ष्मी योजना काय? केंद्र सरकारने दिली मंजुरी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PM Vidya Lakshmi Yojana In Marathi

PM Vidya Lakshmi Yojana In Marathi नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार उच्च शिक्षणासाठी 7.5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी देईल. 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 03 % व्याज अनुदान दिले जाईल. 4.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विध्यार्थाना आधीच संपूर्ण व्याज अनुदान मिळत आहे. देशातील 860 प्रमुख उच्च शिक्षण केंद्रातील 22 लाखाहून अधिक विध्यार्थी या योजनेच्या कक्षेत येतील. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Vidya Lakshmi Yojana In Marathi

नमस्कार मित्रांनो आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न मोडू नये यासाठी केंद्र सरकारने “प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना” सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे विद्यार्थाना कोणत्याही गॅरंटी शिवाय 10 लाख पर्यंत एजुकेशन लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर योजनेस केंद्र सरकारने मंजुरी देण्यात आलेली आहे. 

“प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना” सदर योजनेची पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

PM Vidya Lakshmi Yojana Eligibility | पात्रता/निकष

विद्यार्थी ज्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, त्या संस्थेची NIRF रँकिंगमध्ये ऑल इंडिया 100 किंवा राज्यातील 200 च्या आत रँक असावी.
विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाख रुपये किंवा त्याहून कमी असावे.
प्रत्येक वर्षी 1 लाख विद्यार्थी या योजनेतून लोन मिळवू शकतील.
7.5 लाख रुपये पर्यंतच्या लोनसाठी भारत सरकार 75 % क्रेडिट गॅरंटी देईल.
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने त्याचे 10+2 शिक्षण पूर्ण केलेले असावे.
हे कर्ज फक्त एकदाच मिळू शकते, मग ते पदवीपूर्व, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळेल.

 

कोणत्या कुटुंबाना मिळणार लाभ

“प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना” अंतर्गत ज्याचे उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील विद्यार्थाना 10 लाख रुपये पर्यंतचे लोन दिले जाणार आहे. केंद्रीय सरकार यावर 03 % अनुदान देणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थाना उच्च शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतल्यावर लोन मिळणार आहे. आणि त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची आवश्यकता असणार नाही. 

PM Vidya Lakshmi Yojana Apply Online | अर्ज करण्याची लिंक 
PM विद्यालक्ष्मी योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

PM Vidya Lakshmi Portal application form | अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
वर दिलेल्या अधिकृत PM विद्या लक्ष्मी वेबसाइटला भेट द्या .
वरच्या उजव्या कोपर्यात ‘नोंदणी’ पर्याय शोधा.
नंतर नाव, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करून पोर्टलवर नोंदणी करा.
यानंतर तुमच्या ईमेलच्या इनबॉक्स तपासा आणि तुम्हाला पाठवलेल्या पडताळणी लिंकवर क्लिक करा. लक्षात ठेवा की लिंक फक्त 24 तासांसाठी वैध आहे.
यशस्वी पडताळणीनंतर, तुम्हाला विद्या लक्ष्मी पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाईल. पृष्ठाच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या ‘लॉगिन’ पर्यायावर क्लिक करा आणि ‘विद्यार्थी लॉगिन’ निवडा.
PM विद्या लक्ष्मी नोंदणी प्रक्रियेदरम्यान तुम्ही तयार केलेली लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
एकदा लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला विद्या लक्ष्मी डॅशबोर्डवर निर्देशित केले जाईल.
PM Vidya Lakshmi Yojana In Marathi
PM Vidya Lakshmi Yojana In Marathi
PM Vidya Lakshmi Yojana Documents Required | लोनसाठी आवश्यक कागदपत्रे 
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड 
  • पासपोर्ट (असल्यास)
  • जन्म दाखला (असल्यास)
  • मतदार कार्ड 
  • ड्रायविंग लायन्स 
  • शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे 
  • पगार स्लिप/उत्पन्न प्रमाणपत्र 
  • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट 
  • वीज बिल 
  • पासपोर्ट साईज फोटो
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

प्रश्न : विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना काय आहे?
उत्तर : भारत सरकारने सुरू केलेली विद्या लक्ष्मी योजना विद्यार्थ्यांना एका अर्जासह जास्तीत जास्त तीन वित्तीय संस्थांना शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यास मदत करते . या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्या लक्ष्मी पोर्टलवर खाते तयार करा.


प्रश्न : विद्यालक्ष्मी पोर्टलमध्ये कोणती मार्कशीट आवश्यक आहे?
उत्तर : बँकेच्या पासबुकचे मागील सहा महिन्यांचे विवरण. केवायसी कागदपत्रे. 10वी, 12वी आणि पदवी अभ्यासक्रमांची मार्कशीट . हमीपत्र फॉर्म (पर्यायी)


प्रश्न : शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर : शैक्षणिक कर्ज 30 दिवसात प्रक्रिया केली जाऊ शकते


सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment