PMRDA Lottery Sector 12 : PMRDA सेक्टर 12 आणि सेक्टर 30 -32 येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजेने अंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत 2 हजार जणांनी अनामत रक्कम भरली आहे. तर पाच हजार जणांनी अर्जाची नोंदणी केली. शनिवारी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत अंतिम मुदत होती. त्यात प्रशासनाने मुदत वाढ दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन PMRDA च्या वतीने करण्यात आले.
सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुकांना सदनिकेच्या लॉटरीसाठी 15 डिसेंबर 2024 अर्ज करता येणार आहे. यानंतर 01 जानेवारीला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करत त्यावर आक्षेप नोंदविता येणार आहे 13 जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत 22 जानेवारीला अंतिम सोडत काढण्यात येईल. त्यानंतर यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध होणार आहे.
PMRDA Lottery Sector 12
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 1337 सदनिकांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये सेक्टर 12 आणि सेक्टर क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे या योजने अंतर्गत मिळणार आहे. लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया हि संगणकीय प्रणालीद्वारे असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 1337 सदनिकांची माहिती, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन मुदत किती आहे, अनामत रक्कम किती आहे, सदनिकांची किंमत किती आहे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सदनिकांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचून इच्छुक नागरिकांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा.
PMRDA sector 12 login registration
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 एकूण सदनिका 661 EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट) LIG (2 BHK ) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट) |
पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32 एकूण सदनिका 676 EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट) LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट) |
PMRDA lottery 2024 registration online link | अर्ज करण्याची लिंक
सदनिका (फ्लॅट) साठी ऑनलाईन नोंदणीसाठी | येथे क्लिक करा ⇐ |
PMRDA लॉटरी जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
PMRDA lottery sector 12 required documents list
आवश्यक कागदपत्र/प्रमाणपत्रे :
पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
आधार कार्ड
पॅनकार्ड
जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
रहिवासी दाखला
उत्त्पन्न दाखला
जातीचा दाखला (असल्यास)
PMRDA lottery sector 12 अनामत रक्कम
सदर गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांची (फ्लॅट) रुपये 5,000 /- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आली असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी रुपये 10,000 /- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी रुपये 708 /- ठेवण्यात आलेली आहे.
प्रवर्ग | अनामत रक्कम |
EWS प्रवर्गासाठी | रुपये 5,000 + 708 = 5,708 (GST सह ) |
LIG प्रवर्गासाठी | रुपये 10,000 + 708 = 10,708 (GST सह ) |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.