Pune Mhada Lottery 2024 : पुणेगृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे पुणे, पिंपरी चिंचवड व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध गृहनिर्माण योजनेतील 6294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून अर्ज नोंदणी व अर्ज भरण्या प्रक्रियेची सुरवात दिनांक 10 ऑक्टोबर 2024 सुरु करण्यात येत आहे.
म्हाडा लॉटरी पुणे आणि लगतच्या भागात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळद्वारे महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली यासारख्या भागांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हाडा लॉटरी विजेत्यांची निवड ऑनलाईन सोडतीद्वारे केली जाणार आहे अर्जदारांना फ्लॅट वाटप करण्यासाठी लॉटरी प्रणाली वापरली जाणार आहे. संबधीत लॉटरीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन लॉटरी फॉर्म भरता येईल.
Pune Mhada Lottery 2024 Notification
जर कोणी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे एकूण 6294 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सोडत करणार आहे यामध्ये स्वस्त घरांचा समावेश आहे पात्र आणि इच्छुकांनी आजच घरासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे आणि त्याचा जवळच्या भागांमध्ये परवडणारी घरे देत आहे मंडळातर्फे महाराष्ट्रातील नागरिकांना लॉटरीद्वारे पावडणारी घरे उपलब्ध करून देत आहे. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, नोंदणी कशी करायची आहे, अंतिम तारीख, पात्रता, अर्ज शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Pune Mhada Lottery 2024 ऑनलाईन अर्जाची भरण्याची मुदत
अ. क्र. | तपशील | दिनांक |
1 | ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात | 09 ऑक्टोबर 2024 |
2 | सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 09 ऑक्टोबर 2024 |
3 | ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरवात दिनांक | 09 ऑक्टोबर 2024 |
4 | ऑनलाईन अर्जसाठी नोंदणीची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2024 |
5 | सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2024 |
6 | ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक | 31 डिसेंबर 2024 |
7 | बँकेत RTGS /NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक | 31 डिसेंबर 2024 |
8 | सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी | 05 जानेवारी 2024 |
9 | सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी | 05 जानेवारी 2024 |
10 | सोडत दिनांक | 07 जानेवारी 2025 |
Pune Mhada Lottery 2024 अर्ज सोबत भरायची अनामत रक्कम
अल्प उत्पन्न गट (LIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 20,000/- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 20,708/- |
मध्यम उत्पन्न गट (MIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 30,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 30,708/- |
उच्च उत्पन्न गट (HIG) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 40,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 40,708/- |
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) अर्जासोबत भरायची अनामत रक्कम रुपये 15,000 /- जी परत मिळणार आहे. अर्जाची किंमत रु. 600 + GST रु. 108 एकूण रु. 708 /- विनापरतावा) एकूण रुपये 15,708/- |
Pune Mhada Lottery 2024 घरासाठी अर्ज भरण्यासाठी उत्त्पन्न मर्यादा
उत्पन्न गट | सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक) | |
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) | रुपये 6,00,000 पर्यंत | रुपये 4,50,000 पर्यंत |
अल्प उत्पन्न गट (LIG) | रुपये 9,00,000 पर्यंत | रुपये 7,50,000 पर्यंत |
मध्यम उत्पन्न गट (MIG) | रुपये 12,00,000 पर्यंत | रुपये12,00,000 पर्यंत |
उच्च उत्पन्न गट (HIG) | कमाल मर्यादा नाही | कमाल मर्यादा नाही |
पुणे म्हाडा लॉटरी 2024 नोंदणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- प्रतिज्ञा पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी स्कॅन केलेली
- स्वीकृती पत्र
Pune Mhada Lottery 2024 कोणत्या ठिकाणी घर उपलब्ध आहे त्याची PDF यादी
म्हाडा गृहनिर्माण योजनेत पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या ठिकाणी उपलब्ध घरांची यादी व घरांची संख्या PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |

Pune Mhada Lottery 2024 online apply ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व अर्ज करण्याची पद्धत
पुणे म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा .
अर्ज करण्याची पद्धत
पुणे म्हाडा लॉटरी 2024 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर व क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.
युजरनेम नाव निवडा, संकेतशब्द (पासवर्ड) निवडा आणि भविष्यातील गरजांसाठी जपून करा. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आपला मोबाइल नंबर सत्यापित करा, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरला जाईल.
तुम्हाला www.mhada.gov.in पुणे 2024 वेबसाइटवरील दुसऱ्या फॉर्मवर पाठवले जाईल, म्हाडा पुणे लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले मासिक उत्पन्न, बँक खात्याचा तपशील आणि अर्जदाराचा फोटो नमूद करण्याची आवश्यकता आहे.
म्हाडा पुणे लॉटरी फोर्मवर एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी पुणे फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि म्हाडा पुणे लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करा.
म्हाडातर्फे फोटोची ओळख सत्यापित झाल्यानंतरच वापरकर्ते म्हाडा लॉटरी पुणे योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील.
म्हाडा लॉटरी 2024 (पुणे) मधून इच्छित गृहनिर्माण योजना निवडा आणि उत्पन्न गट, योजनेचा कोड आणि आरक्षण श्रेणी यासारखा तपशील भरा.
निवडलेल्या म्हाडा लॉटरी पुणे योजनेसाठी पैसे भरा. अर्जदारास म्हाडा लॉटरी पुणे अर्जाची कागदपत्रे छापून पोचपावती डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा .
4 thoughts on “Mhada : म्हाडाची 6294 घराची लॉटरी निघाली. पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह सांगलीत घरं | Pune Mhada Lottery 2024”