रेशन कार्ड बंद होणार, लवकर हे काम करून घ्या शेवटची तारीख 31 डिसेंबर, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Ration Card E Kyc Online In Marathi

Ration Card E Kyc Online In Marathi : येत्या 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची ई- केवायसी कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकेल. ई-केवायसी म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल. जेव्हा कुटुंबातील सदस्य हा रेशन घेण्यासाठी दुकानात जाईल तेव्हा त्याची ओळख सत्यापित करण्यासाठी Bio Matric पद्धतीने म्हणजे आपला बोटाचा ठसा ठेवून ओळख सत्यापित केली कि मगच त्याला रेशन सरकारकडून अन्न धान्याचा लाभ मिळेल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ration Card E Kyc Online In Marathi

सरकारने सर्व शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत, एखाद्या शिधापत्रिका धारकाने ई-केवायसी वेळेवर पूर्ण केले नाही तर जीवनावश्यक वस्तू मिळणे बंद होईल. या पूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2024 देण्यात आली होती मात्र आता हि मुदत 31 डिसेंबर 2024 वाढवण्यात आली आहे. ई-केवायसी करण्यासाठी शिधाधारकांना काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. 

ई-केवायसी कशी करावी?

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याच्या दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन खाली या दोन्ही पद्धतीच्या माहिती खाली देण्यात आली आहे. 

ई-केवायसी ऑनलाईन पद्धत : 

सर्व प्रथम महाराष्ट्र नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट ओपन करावी. 
वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र नागरी पुरवठा विभागाचे Home पेज ओपन होईल. 
होम पेज वर तुम्हाला “ई-केवायसी” हा पर्याय निवडायचा आहे. 
ई-केवायसी हा पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी काही आवश्यक माहिती विचारली जाईल. तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर नीट टाकून घ्या. 
OTP मिळावा या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर OTP मिळेल. OTP टाका आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. 
त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट किंवा त्यात बदल करून त्याला योग्य ती माहिती भरा. आणि Done या बटनावर क्लिक करा. 
तुमचे आधार -सक्षम बँक खाते निवडा आणि लिंक करा ह्या बटनावर क्लिक करा. 
सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला E – KYC यशवीरित्या पूर्ण झाले आहे याचा SMS प्राप्त होईल. 

 

ऑनलाईन ई-केवायसी करण्याची लिंक

ऑनलाईन ई-केवायसी करण्याची लिंक  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

ई-केवायसी ऑफलाईन पद्धत : 

आपल्या जवळच्या रेशन दुकानात भेट द्या.
त्यानंतर रेशनकार्ड दुकानदारांकडून ई-केवायसी फॉर्म भरून द्या.
फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्णपणे भरून घ्या.
फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा म्हणजे आधार कार्ड, रेशनकार्ड आणि बँकेचे पासबुक ची झेरॉक्स.
फॉर्म दुकानदाराकडे द्या नंतर दुकानदार POS मशीनवर ओळख सत्यापित करेल. 
नंतर दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर ठेऊन आणि तुमची ओळख सत्यापित करेल.
असाच प्रयेक रेशन कार्डवरील सदस्यचे POS मशीनवर अंगठा ठेऊन ई-केवायसी करेल. 
तुमचा अंगठा यशवीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. 

 

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक)
  • बँक पासबुक
  • संपूर्ण सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्स
FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

प्रश्न : रेशनकार्ड ऑनलाईन अपडेट कसे करायचे?
उत्तर : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाला भेट द्या. पृष्ठाच्या डाव्या बाजूला, ‘डाउनलोड’ वर क्लिक करा. ‘फॉर्म 14 – शिधापत्रिकेत बदल’ डाउनलोड करण्यासाठी पुढे जा. फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन योग्य तपशील भरा आणि संबंधित विभागाकडे जमा करा.

प्रश्न : महाराष्ट्रातील शिधापत्रिका ई-केवायसी ची वेबसाईट काय आहे?
उत्तर : राज्य अन्न विभागाची वेबसाइट http://mahafood.gov.in  रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली https://rcms.mahafood.gov.in

प्रश्न : ई-केवायसी करणे म्हणजे काय?
उत्तर : ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक केवायसी. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनाच ई-केवायसी शक्य आहे. ई-केवायसी सेवा वापरत असताना, तुम्हाला तुमची ओळख/पत्ता बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे बँक शाखा/व्यवसाय वार्ताहर (BC) यांना जाहीर करण्यासाठी स्पष्ट संमतीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) अधिकृत करावे लागेल.

प्रश्न : रेशन कार्ड ई-केवायसी कसे करावे?
उत्तर : इ केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या राशन दुकानदाराकडे जावे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत घेऊन जायचे आहे. तिथे तो दुकानदार तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल.

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment