RTE प्रवेशासाठी मुदतवाढ, “या” तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज, असा करा अर्ज, संपूर्ण माहिती ! RTE Admission 2025 Last Date

RTE Admission 2025 Last Date महाराष्ट्र RTE प्रवेश राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी 14 ते 27 जानेवारी ची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अर्ज न भरलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी 2 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. ज्या पालकांनी अजून पर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले नाही त्यांनी 02 फेबुवारी 2025 पर्यंत अर्ज सबमिट करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RTE Admission 2025 Last Date

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारी 2025 सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आॉनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. (RTE Admission 2025 Last Date)14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती. सदर अर्ज न भरलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी 02 फेबुवारी 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. 

RTE Admission 2025 Last Date Details 

नोंदणीचे नाव महाराष्ट्र RTE प्रवेश
प्रवेश  प्राधिकरण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र
राज्य  महाराष्ट्र 
वर्ष  2025
कायदा  शिक्षणाचा अधिकार किंवा RTE
उद्देश  खाजगी शाळांमध्ये वंचित विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण देण्याचा उद्देश
लाभार्थी वंचित विद्यार्थी इयत्ता 8 पर्यंत
आरक्षण  25%
शैक्षणिक सत्र  2025-2026
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
अर्जाची सुरुवात  14 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 फेबुवारी 2025
निवड प्रक्रिया  लॉटरी RTE Admission 2025 Last Date

 

RTE Admission फॉर्म कसा भरायचा?

स्टेप 1 विद्यार्थी नोंदणी /RTE New Registration : आरटीई २५% प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी RTE पोर्टल वर प्रथम विद्यार्थी नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना संपूर्ण माहिती अचूक भरावी. कारण त्यानंतर त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर आपणास यूजर आयडी व पासवर्ड आपल्या दिलेल्या मोबाइल नंबर वर पाठविण्यात येतो.  त्याचा वापर करून RTE पोर्टल मध्ये लॉगिन करून ऑनलाईन अर्ज भरावा. 

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत वेब साईटवर जा. 
  • त्यानंतर Online Application या वर क्लिक करा. 
  • New Registration यावर क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी एक छोटा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, अचूक नोंदविणे. कारण एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येत नाही. 
  • पुढे आपला जिल्हा निवडून तुमचा मोबाइल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे.
  • पुढे Register बटनावर क्लिक करा.
  • Register बटनावर क्लिक केल्यानंतर आपला User ID आणि पासवर्ड पेजवर दिसेल 
  • आपल्या मोबाइलवर देखील आपला User Name आणि Password येईल. RTE Admission 2025 Last Date

स्टेप 2 ऑनलाईन अर्ज / RTE Online Application : RTE पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration ) केल्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्वप्रथम एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा. कारण RTE प्रवेश प्रक्रिया संधर्भात आपल्याला शेवट पर्यंत यूजर आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. 

  • आता आपल्याला RTE प्रवेश प्रक्रियेसाठी Login करायचे आहे.
  • लॉगिन करण्यासाठी या पेजवर आपला User Name आणि PasswordCaptcha Code टाकून लॉगिन करा. 
  • आता पुन्हा नवीन तयार केलेल्या पासवर्ड ने लॉगिन करा 
  • लॉगिंग केल्यानंतर आता संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी . व प्रत्येक पेज वरील माहिती भरल्यानंतर save बटनावर क्लिक करा. 

स्टेप 3 विद्यार्थी माहिती भरणे / Child Information : यामध्ये साधारपणे बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आई वडिलांचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पत्ता, हि संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर गुगल Map मधून पत्ता नोंद करावा लागतो. 

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेशन मध्ये प्रवेश घेण्याची इयत्ता, माध्यम, जात, धर्म, दिव्यांग असेल तर प्रकार, टक्केवारी आणि प्रमाणपत्र नंबर, कागदपत्र prof कोणते आहे ? त्याची माहिती, मोबाइल नंबर, पालकांचा ई-मेल आयडी, सध्याचा पत्ता इतर माहिती अचूक भरावी लागते. 

स्टेप 4  आरटीई शाळा निवड / School Selection : ऑनलाईन अर्ज (RTE Application ) या सेशन मधील माहिती भरल्यानंतर पुढील सेशन मध्ये आरटीई शाळा निवड (School Selection ) करावी लागते. त्यामध्ये 1 किमी ते 3 किमी व त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या पात्र व अपात्र शाळांची नाव दिसतात त्यानुसार योग्य शाळांची निवड करायची आहे. 

  • RTE 25 % प्रवेशासाठी शाळा निवड School Selection 
  • या पेजवर आपल्याला RTE 25 % शाळांची लिस्ट यादी दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसेल ते वाचून योग्य शाळा निवड करावी. RTE Admission 2025 Last Date
RTE Admission 2025 Link | अर्ज करण्याची लिंक 
RTE Admission 2025 Last Date
RTE Admission 2025 Last Date
RTE ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. RTE Admission 2025 Last Date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment