आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज 2025 कसा भरावा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या ! RTE Admission Form Kasa Bharaycha

RTE Admission Form Kasa Bharaycha महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-26 ऑनलाइन अर्ज त्याच्या अधिकृत पोर्टलवर खुले झाले आहेत. राज्य सरकारने आरटीई प्रवेश अर्ज ऑनलाइन लिंक आणि अर्ज स्वीकारणे सक्रिय केले. ज्या पालकांची मुले 3 ते 6 वर्षांच्या दरम्यान आहेत आणि महाराष्ट्र RTE प्रवेश शोधत आहेत ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस पुढे जाऊ शकतात, म्हणजे https://student.maharashtra.gov.in. या लेखाद्वारे आपण आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घेणार आहोत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RTE Admission Form Kasa Bharaycha

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण माहिती वाचून घ्या त्यानंतर अर्ज करा जेणे करून फॉर्म भरताना कोणत्याही चुका होणार नाही.

आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे आहे 

  • विद्यार्थी नोंदणी / RTE New Registration
  • ऑनलाईन अर्ज / RTE Online Application
  • विद्यार्थी माहिती भरणे / Child Information
  • ऑनलाईन अर्ज भरणे / RTE Online Application
  • आरटीई शाळा निवड / School Selection
  • भरलेल्या अर्जाची स्थिती / Summary Application
स्टेप 1 विद्यार्थी नोंदणी /RTE New Registration : आरटीई २५% प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी RTE पोर्टल वर प्रथम विद्यार्थी नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना संपूर्ण माहिती अचूक भरावी. कारण त्यानंतर त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर आपणास यूजर आयडी व पासवर्ड आपल्या दिलेल्या मोबाइल नंबर वर पाठविण्यात येतो.  त्याचा वापर करून RTE पोर्टल मध्ये लॉगिन करून ऑनलाईन अर्ज भरावा. 

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत वेब साईटवर जा. 
  • त्यानंतर Online Application या वर क्लिक करा. 
  • New Registration यावर क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी एक छोटा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, अचूक नोंदविणे. कारण एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येत नाही. 
  • पुढे आपला जिल्हा निवडून तुमचा मोबाइल नंबर व ई-मेल आयडी टाकायचा आहे.
  • पुढे Register बटनावर क्लिक करा.
  • Register बटनावर क्लिक केल्यानंतर आपला User ID आणि पासवर्ड पेजवर दिसेल 
  • आपल्या मोबाइलवर देखील आपला User Name आणि Password येईल. RTE Admission Form Kasa Bharaycha

 

स्टेप 2 ऑनलाईन अर्ज / RTE Online Application : RTE पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration ) केल्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्वप्रथम एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा. कारण RTE प्रवेश प्रक्रिया संधर्भात आपल्याला शेवट पर्यंत यूजर आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. 

  • आता आपल्याला RTE प्रवेश प्रक्रियेसाठी Login करायचे आहे.
  • लॉगिन करण्यासाठी या पेजवर आपला User Name आणि PasswordCaptcha Code टाकून लॉगिन करा. 
  • आता पुन्हा नवीन तयार केलेल्या पासवर्ड ने लॉगिन करा 
  • लॉगिंग केल्यानंतर आता संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी . व प्रत्येक पेज वरील माहिती भरल्यानंतर save बटनावर क्लिक करा. 

 

स्टेप 3 विद्यार्थी माहिती भरणे / Child Information : यामध्ये साधारपणे बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आई वडिलांचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पत्ता, हि संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर गुगल Map मधून पत्ता नोंद करावा लागतो. 

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेशन मध्ये प्रवेश घेण्याची इयत्ता, माध्यम, जात, धर्म, दिव्यांग असेल तर प्रकार, टक्केवारी आणि प्रमाणपत्र नंबर, कागदपत्र prof कोणते आहे ? त्याची माहिती, मोबाइल नंबर, पालकांचा ई-मेल आयडी, सध्याचा पत्ता इतर माहिती अचूक भरावी लागते.  RTE Admission Form Kasa Bharaycha

 

स्टेप 4  आरटीई शाळा निवड / School Selection : ऑनलाईन अर्ज (RTE Application ) या सेशन मधील माहिती भरल्यानंतर पुढील सेशन मध्ये आरटीई शाळा निवड (School Selection ) करावी लागते. त्यामध्ये 1 किमी ते 3 किमी व त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या पात्र व अपात्र शाळांची नाव दिसतात त्यानुसार योग्य शाळांची निवड करायची आहे. 

  • RTE 25 % प्रवेशासाठी शाळा निवड School Selection 
  • या पेजवर आपल्याला RTE 25 % शाळांची लिस्ट यादी दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसेल ते वाचून योग्य शाळा निवड करावी. 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँक स्कॉलरशिप योजना, १ ली ते पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांना HDFC बँक 75 हजार रुपये देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्टेप 5 अर्जाची स्थिती / Summary Application : विद्यार्थी माहिती, ऑनलाईन अर्जातील माहिती व शाळॆची निवड संपूर्ण माहिती आपल्याला या सेशन मध्ये दिसते. माहिती तपासून अचूक असल्याची खात्री करावी लागते. 

  • त्यानंतर आपल्या समोर एक पॉप ओपन होईल त्यावर ओके केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. 
  • ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आता Generate PDF या बटनावर क्लिक करावे. व PDF ची प्रिंट काढून घ्यावी. 
  • हि संपूर्ण माहिती भरताना त्या त्यावेळी Save करावी लागते. याची काळजी घ्या. इथे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आता आपणास लॉटरी पद्धतीने निवड यादीची प्रतीक्षा करावी लागेल. RTE Admission Form Kasa Bharaycha

 

RTE Admission Form Link 

RTE ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Parents Manual  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

आरटीई प्रवेशा संदर्भात पालकांकरिता महत्वाच्या सूचना 

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही. RTE Admission Form Kasa Bharaycha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment