Satara DCC Bank Bharti 2024 | जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर

Satara DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्हाला सरकारी बँकेत नोकरी हवी असल्यास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत मेगा भरती चालू झाली आहे. सातारा डीसीसी बँकेने महाराष्ट्रात 263 लिपिक (क्लार्क) आणि कनिष्ठ शिपाई 60 पदांची अधिकृत भरतीची सूचना जाहीर केली आहे. तरी पात्र उमेदवारांनी आज ऑनलाईन अर्ज करा. ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Satara DCC Bank Bharti 2024 भरतीची अधिकृत माहिती 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक लिमिटेड अंतर्गत लिपिक (क्लार्क) आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण 323 रिक्त जागेच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. जर तुम्ही चांगल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असला तर तुम्ही या बँकेत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम मुदत 21 ऑगस्ट 2024 आहे. 

सातारा डीसीसी बँकेने अधिसूचना जारी केली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही कृपया याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. 323 रिक्त पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF डाउनलोड करून आणि त्यातील माहिती वाचून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी आणि इतर बाबींची माहिती या लेखात उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी आणि भरतीची माहिती पाहण्यासाठी खाली लिंक आणि PDF जाहिरात दिलेली आहे. 

Satara DCC Bank Bharti 2024 पदाचे नाव, अर्जची मुदत आणि रिक्त जागा 

कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीची पदाचे नाव आणि किती रिक्त जागा आहे खालीलप्रमाणे राहील.

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई / Junior Clerk and Junior Peon  

पद संख्या : एकूण 323 जागा 

पदाचे नाव  पद संख्या 
कनिष्ठ लिपिक / Junior Clerk  263
कनिष्ठ शिपाई / Junior Peon  60
एकुण  323

अर्जची मुदत
उमेदवारांकडून अर्ज विहित निमून्यात मागविण्यात येत आहे अर्जची मुदत खालीलप्रमाणे आहे

अ. क्र. तपशील  दिनांक आणि वेळ 
१. संकेत सथळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे  12 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 सांयकाळी 5 वाजता 
२. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक  बँकेच्या संकेत स्थळावर प्रकशित करण्यात येईल 
३. ऑनलाईन परीक्षा दिनांक  बँकेच्या संकेत स्थळावर प्रकशित करण्यात येईल 
४. कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक  बँकेच्या संकेत स्थळावर प्रकशित करण्यात येईल 

 

Satara DCC Bank Bharti 2024 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता 

दिनांक 31 जुलै 2024 रोजी उपरोक्त वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त व मुळ कागदपत्र असेलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. 

  • कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक / Junior Clerk – 21 वर्ष पूर्ण आणि 38 वर्षाच्या आत 
  • कनिष्ठ शिपाई / Junior Peon – 18 वर्ष पूर्ण आणि 38 वर्षाच्या आत 

शैक्षणिक पात्रता 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक / Junior Clerk 
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण .
  • तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युतर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य
  • त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
कनिष्ठ शिपाई / Junior Peon
  • किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण .
  • तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

 

Satara DCC Bank Bharti 2024 अर्ज फी व कागदपत्रे/प्रमाणपत्रे 

अर्ज परीक्षा शुल्क / फी – 590 /- रुपये.

  • परीक्षा शुल्क रक्कम रु. 500 /- + 18 टक्के GST रु. 90 /- अशी एकूण रक्कम रु. 590 /- ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत.
  • परीक्षा शुल्क रक्कम भरल्याशिवाय ऑनलाईन रेजिट्रेशन पूर्ण होणार नाही.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर अचूक देणे आवश्यक आहे. 

कागदपत्रे / प्रमाणपत्रे 

अ. क्र. कागदपत्रे / प्रमाणपत्रे 
1.  शैक्षणिक अहर्तेचा पुरावा – कनिष्ठ लिपिक यांच्याकरिता पदवी प्रमाणपत्र आणि कनिष्ठ शिपाई यांच्याकरिता इयत्ता 10 वीचे प्रमाणपत्र  
2.  जन्म तारखेचा पुरावा – इयत्ता 10 वीचे प्रमाणपत्र 
3.  MS – CIT अथवा समक्ष प्रमाणपत्र (कनिष्ठ लिपिकांसाठी )
4.  टायपिंग सर्टिफिकेट (असल्यास )
5.  अनुभव सर्टिफिकेट (असल्यास )
6.  उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व सर्टिफिकेट 
7.  विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा – मॅरेज सर्टिफिकेट 
8.  प्रकल्पग्रस्त दाखला (असल्यास )
9.  परीक्षा शुल्क पावती व ओळखपत्र 
10.  पासपोर्ट साईज फोटो 

 

Satara DCC Bank Bharti 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 
  • इच्छुक उमेदवारांनी पात्र पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकेच्या www.sataradccb.in किंवा www.sataradccb.com या संकेत स्थळावर ऑनलाईन फॉर्म अर्ज करणे बंधनकारक राहील.
  • अर्ज करण्यासाठी आणि भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खाली PDF लिंक दिलेली आहे. 
  • अर्ज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करणे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि आधारकार्ड नंबर अचूक देणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती वेब साईटवर उपलब्ध नाही.
  • परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल शुल्क भरल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. इतर मार्गाने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज भरल्यानंतर परीक्षेची अपडेट ईमेल आयडीवर वेळोवेळी दिली जाईल. 
  • ऑनलाईन फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास 8956660336 हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे.
Satara DCC Bank Bharti 2024 अर्ज भरण्यासाठी लिंक्स व PDF जाहिरात 

अर्ज भरण्यासाठी आणि भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक्स दिलेल्या आहेत

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लीक करा 
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा 
Whasapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 

 

नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात PDF दिलेली आहे ती पूर्णपणे पाहून घेणे. 

भरतीची निवड प्रक्रिया 
  1. कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
  2. सादर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या 90 प्रश्नाच्या प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे 90 गुणांची राहील.
  3. ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील.
  • कागदपत्रे व पडताळणी : 
  • पद संख्येच्या १:3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या वेब साईटवर प्रसिद्द करण्यात येईल.
  • सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबधीत मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील.
  • मुलाखतीचे मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने वेब साईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. ते वेब साईटवरून डाउनलोड करून घेणे.
  • कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पडताळणी वेळेस मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
  • मुलाखत :
  • उमेदवाराची मुलाखत बँकेने गठीत केलेल्या समितीकडून घेण्यात येईल.
  • कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत 10 गुणांची राहील.
  • उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिला तर तो अंतिम निवडीसाठी पात्र राहणार नाही. 

Satara DCC Bank Bharti 2024

Satara DCC Bank Bharti 2024 महत्वाच्या सूचना 

निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती / कागदपत्रे खोटी सादर केल्यास निवड प्रक्रिया रद्द करण्यात येईल.

उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती अंतिम समजण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल. 

उमेदवाराने परीक्षेस आणि मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागले.

उमेदवाराने भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही.

उमेदवाराने भरलेला फॉर्म आणि परीक्षा शुल्क पावती बँकेच्या पत्त्यावर पाठवू नये.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि आधारकार्ड नंबर अचूक देणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी भरलेला फॉर्म आणि परीक्षा शुल्क पावती स्वतः जवळ जपून ठेवावी. 

FAQ’s

प्रश्न : सातारा डीसीसी बँकेत कोणती भरती आहे?
उत्तर : कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक / Junior Clerk आणि कनिष्ठ शिपाई / Junior Peon

प्रश्न : सातारा डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाईल वेबसाईट www.sataradccb.in किंवा www.sataradccb.com

प्रश्न : सातारा डीसीसी बँक भरतीची शेवटची अंतिम तारीख किती आहे?
उत्तर : 21 ऑगस्ट 2024

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि नवीन अपडेट माहितीसाठी आजच आपल्या Whatsapp ग्रुप आणि Telegram ग्रुप जॉईन करा. 

वरील बँक भरतीची Satara DCC Bank Bharti 2024 माहिती आपल्या जवळच्या लोकांना, मित्र आणि गरजू लोकांना ही माहिती नक्की शेअर करा.  तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. धन्यवाद || 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “Satara DCC Bank Bharti 2024 | जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर”

Leave a Comment