SSC GD Constable Bharti 2024 In Marathi : केंद्रीय गृह मंत्रालय मार्फत देशभरातून कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्या अंतर्गत तब्बल 39,481 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची शोधात असाल तर 39481 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबलसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
गृह मंत्रालय (MHA) द्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार कर्मचारी निवड आयोग/ SSC यांच्या अंतर्गत तब्बल 39481 पदांची भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विषयी बोलायचे झाले तर 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरतील. मित्रानो भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 39,481 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये विविध विभागामध्ये भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) केंद्रीय औधोगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP ), सशस्त्र सीमा बल (SSB), मध्ये ही मेगा भरतीची केली जात आहे.
वरील भरती कॉन्स्टेबल (जरनल ड्युटी) या पदांसाठी होत आहे तर सचिवालय सुरक्षा दल (SSF), आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (जरनल ड्युटी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये शिपाई या पदांसाठी भरती सुरु झाली आहे. शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, अर्ज शुल्क/फी, वेबसाईट आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
SSC GD Constable Bharti 2024 Last Date
अधिकृत जाहिरातीनुसार ऑनलाईन भरतीची अंतिम मुदत खाली देण्यात आलेली आहे.
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक | 05 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवट दिनांक | 14 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन फी भरण्याची शेवट दिनांक | 15 ऑक्टोबर 2024 |
संगणकावर आधारित तात्पुरते परीक्षा वेळापत्रक | जानेवारी – फेबुवारी 2025 |
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi रिक्त पदे
खाली देण्यात आलेल्या विविध विभागामध्ये कॉन्स्टेबल आणि शिपाई रिक्त पदे भरली जाणार आहे ते विभाग खालीलप्रमाणे
- बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
- केंद्रीय औधोगिक सुरक्षा बल (CISF)
- सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF)
- इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP )
- सशस्त्र सीमा बल (SSB)
- सचिवालय सुरक्षा दल (SSF)
- आसाम रायफल्स (AR) मध्ये रायफलमन (जरनल ड्युटी)
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)
SSC GD Constable Bharti 2024 श्रेणीनुसार पदांची संख्या
SSC GD Constable Bharti 2024 एकूण 39481 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली असून उमेदवाराच्या प्रवर्गानुसार/श्रेणीनुसार खाली किती जागा आहे त्या देण्यात आलेल्या आहे.
- पुरुष/ Male
Force | Male | Total | ||||
SC | ST | OBC | EWS | UR | ||
BSF | 2018 | 1489 | 2906 | 1330 | 5563 | 11306 |
CISF | 959 | 687 | 1420 | 644 | 2720 | 6430 |
CRPF | 1681 | 1213 | 2510 | 1130 | 4765 | 11299 |
SSB | 122 | 79 | 187 | 82 | 349 | 819 |
ITBP | 345 | 326 | 505 | 197 | 1191 | 2564 |
AR | 124 | 223 | 205 | 109 | 487 | 1148 |
SSF | 05 | 03 | 09 | 04 | 14 | 35 |
NCB | 0 | 01 | 05 | 0 | 05 | 11 |
Total | 5254 | 4021 | 7747 | 3496 | 15094 | 35612 |
- महिला/Female
Force | Male | Total | ||||
SC | ST | OBC | EWS | UR | ||
BSF | 356 | 262 | 510 | 234 | 986 | 2348 |
CISF | 106 | 71 | 156 | 74 | 308 | 715 |
CRPF | 34 | 20 | 53 | 19 | 116 | 242 |
SSB | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 |
ITBP | 59 | 59 | 90 | 21 | 224 | 453 |
AR | 9 | 21 | 16 | 06 | 48 | 100 |
SSF | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 |
NCB | 0 | 0 | 04 | 01 | 06 | 11 |
Total | 564 | 433 | 829 | 355 | 1688 | 3869 |
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi वयाची अट
SSC GD Constable भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल वय 23 वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 02/01/2002 पूर्वी आणि 01/01/2007 नंतर झालेला नसावा.
- किमान वय 18 वर्ष ते कमल वय 23 वर्ष
पात्र उमेदवारांसाठी श्रेणीनुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे ती सूट खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र | श्रेणी | वयाची सूट |
1 | SC /ST उमेदवारांसाठी | 5 वर्ष |
2 | OBC उमेदवारांसाठी | 3 वर्ष |
3 | Ex Servicemen उमेदवारांसाठी | 3 वर्ष |
4 | गुजरात दंगली किंवा 2002 च्या जातीय दंगलीत पीडित आश्रित | 5 वर्ष ते 10 वर्ष |
ही पण भरतीची माहिती नक्की वाचा⇓
IDBI Recruitment 2024 : पदवीधरांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच ऑनलाईन अर्ज करा.
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi अर्ज फी/शुल्क
गृह मंत्रालय (MHA) द्वारे तयार केलेल्या भरती योजनेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी/शुल्क भरावे लागले आयोगाने महिलांना, ST SC आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आलेली आहे.
SSC GD Constable अर्ज फी | |
श्रेणी | अर्ज फी |
इतर/सामान्य/OBC | रुपये 100 /- |
SC/ST/ महिला/माजी सैनिक | कोणतेही शुल्क नाही/शुल्कात सूट |
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता
SSC GD कॉन्स्टेबल भरतीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून त्यांची 10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
10 वी परीक्षा उत्तीर्ण
SSC GD Constable Bharti 2024 apply online
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
⇓ नवं नवीन अपडेटसाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा ⇓ | |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली भरतीची PDF जाहिरात नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
SSC GD भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC ची अधिकृत https://ssc.gov.in/ वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणताही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर ऑनलाईन अर्ज करा या टॅबवर क्लिक करावे आणि नंतर नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी पर्याय यावर क्लीक करा.
पात्र उमेदवाराकडे चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे पुढील यावर देण्यात येईल.
नंतर पुढे नोंदणी पेजवर आधार क्रमांक, वडिलांचे नाव, जन्मतारीख या सह इतर माहितीचा तपशील देणे आवश्यक आहे.
उमेदवाराच्या दिलेल्या ईमेल आयडी वर आणि मोबाइलवर एक OTP येईल तो टाकून भरतीसाठीचा फॉर्म ओपन होईल.
ईमेल आयडीवर आणि मोबाइलवर तुमचा नोंदणी क्रमांक आणि एक पासवर्ड येईल तो नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्ही भर्तीसाठीचा फॉर्म ओपन करू शकता.
पुढे उमेदवारांनी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करायची आहे.
नंतर ऑनलाईन अर्ज फी भरायची आहे अर्ज फी भरल्याशिवाय फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही.
पुढे सबमिट केलेला फॉर्म आणि ऑनलाईन भरलेली फी पावती याची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
भरतीसाठी निवड प्रक्रिया
SSC GD Constable भरतीच्या निवड प्रक्रियेनुसार चार टप्पे समाविष्ट करण्यात आलेले आहे जे पात्र उमेदवारांना भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि पात्र होण्यासाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे हे चार टप्पे खाली देण्यात आलेले आहेत.
- ऑनलाईन संगणक आधारित चाचणी
- शारीरिक मानक चाचणी
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी
- वैद्यकीय चाचणी

SSC GD Constable Bharti 2024 पगार/वेतन/मानधन
निवड केलेल्या उमेदवारांना SSC GD अधिसूचनेनुसार खाली नमूद केलेले वेतन दिले जाणार आहे
SSC GD Constable मासिक वेतन | |
पोस्ट | मासिक पगार |
BSF, CRPF, CISF, ITBP, SSF, SSB आणि रायफलमॅन | रुपये – 21,700 ते 69,100 /- |
SSC GD Constable Bharti 2024 ठळक मुद्दे
SSC GD Constable Bharti 2024 | |
विभाग | कर्मचारी निवड आयोग |
परीक्षेचे नाव | SSC GD Constable 2024 |
पोस्टचे नाव | SSC GD कॉन्स्टेबल व शिपाई सर्व सामान्य |
विभागाचे नाव | BSF, CISF, CRPF, SSB, NCB, ITBP, AR SSF |
रिक्त पदे | 39,481 |
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक | 14 ऑक्टोबर 2024 |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी |
पात्रता | दहावी उत्तीर्ण |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
FAQ’s
प्रश्न : SSC GD Constable भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : SSC GD अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायणसाठी उपलब्ध आहे.
प्रश्न : SSC GD Constable भरतीसाठी अंतिम मदत काय आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज भरायांसाठी अंतिम मदत 14 ऑक्टोबर 2024 आहे.
प्रश्न : SSC GD Constable भरतीसाठी इच्छुक उमेदवाराची पात्रता काय आहे?
उत्तर : पात्र व इच्छुक उमेदवाराची पात्रता कोणत्याही बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावी.
प्रश्न : SSC GD Constable भरतीसाठी किती वय आवश्यक आहे?
उत्तर : किमान वय 18 वर्ष ते 23 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
प्रश्न : SSC GD Constable मासिक वेतन किती आहे?
उत्तर : रुपये – 21,700 ते 69,100 /-
सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून नोकरीसाठी अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला join करा.
SSC GD Constable Bharti 2024 In Marathi भरती संदर्भातील काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||